Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी विधिमंडळात कडक कायदे करण्यात यावे, अशी मागणी  चिंचवड विधानसभा विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसंपासून वैष्णवी हगवणे या युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून पुन्हा एकदा राज्यातील महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि हुंडाबळीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना समाजातील एक गंभीर समस्या बनल्या आहेत. ही अमानवीय प्रथा आणि हिंसाचार थांबवण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये तातडीने कठोर आणि प्रभावी कायदे तयार करणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरात भाजपतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पिंपळे सौदागर, जुनी सांगवी आणि काळेवाडी येथे ‘गंगा पूजन’ आणि ‘नदी घाट स्वच्छता अभियान’ राबवून अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी आणि धार्मिक कार्याला स्मरण करण्यात आले. या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, कार्यक्रमाचे संयोजक विजय उर्फ शीतल शिंदे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, गोरक्षनाथ झोळ, मनोज ब्राह्मणकर, संजय भिसे, कुंदाताई भिसे, संदीप काटे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर धर्म आणि समाजसेवेला प्राधान्य दिले होते.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अभिजात मराठीची संगीत व गद्य नाट्य परंपरा अशी व्यापक संकल्पना घेऊन ‘रुद्रंग’ च्या कलावंतांनी सादर केलेला ‘लागले खूळ कलावंताला’ हा प्रयोग म्हणजे सर्वांग सुंदर निर्मिती होती. त्यामुळे माझी आजची संध्याकाळ चिरस्मरणीय झाली!’ असे गौरवोद्गार सांगली आकाशवाणी केंद्रावरील निवृत्त ज्येष्ठ निवेदक आणि यूट्यूबर दत्ता सरदेशमुख यांनी कॅप्टन कदम सभागृह, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. रुद्रंग या संस्थेच्या अकराव्या वर्धापधन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून दत्ता सरदेशमुख बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांची विशेष उपस्थिती होती. राजेंद्र घावटे म्हणाले की, ”लागले खूळ कलावंताला’ हा प्रयोग म्हणजे मंत्रमुग्ध करणारा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात नियमितपणे शास्तीसह मालमत्ता कर भरलेल्या नागरिकांचा अन्याय दूर करून, त्यांनी भरलेली अगावू रक्कम दरवर्षीच्या करामध्ये समायोजित न करता थेट एकरकमी परत द्यावी, अशी ठाम मागणी माजी नगरसेवक अतुल शितोळे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या हद्दीत औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले असून, त्यावर पूर्वी शासन निर्णयानुसार शास्तीसह मालमत्ता कर आकारण्यात येत होता. मात्र, दिनांक ३ मार्च २०२३ रोजी नगरविकास विभागाने एक निर्णय घेतला आणि सर्व अवैध बांधकामांवरील शास्ती रक्कम माफ करण्यात आली. या निर्णयामुळे अनेक नागरिकांनी पूर्वी भरलेली शास्तीसह कररक्कम महापालिकेकडे जमा राहिली आहे. सांगवी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश…

Read More

पीसीसीओईमध्ये ‘क्षितिज – २०२५’ शोकेस प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शैक्षणिक काळात विद्यार्थी अनेक प्रकल्प सादर करतात. सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून तयार केलेल्या प्रकल्पांना व्यावसायिकतेची जोड दिली तर आर्थिक विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने ‘क्षितिज २०२५’ या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. क्षितिजमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी समाविष्ट असलेल्या काही मोजक्या प्रकल्पांमधील काही प्रकल्प पेटंट मिळवून व्यावसायिक स्वरूपात रूपांतरित केले जातील, असे प्रतिपादन कॉमसेन्स टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य एआय अधिकारी सागर बाबर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील पेठ क्र. १२ भोसरीमधील गृहयोजना क्र. १ व २ मधील १ व्यापारी दुकान (गाळा) आण‍ि पेठ क्र. ४ (मोशी) बोराडेवाडीतील दुकान क्र. ६ चा ई-लिलाव करण्यात येत आहे. सदर दुकान अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्ष‍ित आहे. या २ दुकानांच्या ई-लिलावासाठी इच्छुक नागरिकांकडून दि.२३.०५.२०२५ पासून दि.१२.०६.२०२५ रोजी सायंकाळी ५ पर्यंत Online अर्ज मागवण्यात येत आहे. Online अर्ज भरण्यास https://eauction.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. यासाठी नागरिकांनी मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्र. महानगर आयुक्त दीपक सिंगला (भा.प्र.से.) यांनी केले आहेत. अधिक माहितीसाठी Helpline No.- ०२०-२७१६६०००

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७१ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ७, १३, ७, ९, २, १५, ४…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो, असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू)  प्र-कुलपती  डॉ. भाग्यश्री पाटील   यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना व्यक्त केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू ), (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, येथे 26 मे 2025 रोजी विद्यापीठाच्या सभागृह्यामध्ये 16 वा पदवीप्रदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला  अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणाचे    महेश मुरलीधर भागवत,   डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे चे कुलपती …

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पुण्यातील  संतोष जगदाळे आणि  कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आज आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना कार्यालय प्रमुख सुधीर जोशी, तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काल या शहीद कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक शिवसेना यंत्रणेला जबाबदारी सोपवली होती. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या कायदेविषयक डिप्लोमा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त पदाचा पदभार दीपक सिंगला यांच्याकडे देण्यता आला आहे. ते पीएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त आहेत. आयुक्त डॉ. योगेश म्हसे हे सुटीवर असल्याने त्यांच्या जागेवर तात्पुरती म्हणून त्यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. आयुक्त हे 26 मेपासून 6 जूनपर्यंत सुटीवर आहेत. या कालवधीत आता आयुक्त म्हणून सिंगला हे काम पाहणार आहेत. त्याबाबतचा आदेश नगर विकास विभागाचे अवर सचिव अजयसिंग पाटील यांनी काढले आहेत. सिंगला यांच्या मेट्रो, प्रधान मंत्री आवस योजना आणि बांधकाम विकास परवानगीचे काही अधिकार आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीत मावळ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबादारी होती. त्यांनी…

Read More