हुंडाबळी व महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कडक कायद्यांची मागणी – सुजाता नखाते यांचे अंबादास दानवे यांना निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी विधिमंडळात कडक कायदे करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसंपासून वैष्णवी हगवणे या युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून पुन्हा एकदा राज्यातील महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि हुंडाबळीचा विषय चव्हाट्यावर आला आहे.
हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना समाजातील एक गंभीर समस्या बनल्या आहेत. ही अमानवीय प्रथा आणि हिंसाचार थांबवण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये तातडीने कठोर आणि प्रभावी कायदे तयार करणे अत्यावश्यक आहे.
एका धक्कादायक सर्वेक्षणानुसार एकट्या महाराष्ट्रात मागील तीन वर्षांमध्ये सुमारे 20 हजारांहून अधिक महिलांना या हुंडाबळीमुळे तसेच कौटुंबिक अत्याचारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर आकडेवारी असून महिलांवरील शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अत्याचारामुळे त्यांचे मूलभूत हक्क धोक्यात येत आहेत. यामुळे समाजात महिलांमध्ये असुरक्षितता वाढत आहे.
केस ही फास्टट्रॅक कोर्टात चालवून या घटनेतील दुर्दैवी वैष्णवी हगवणे हीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. व तिला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आपण विधिमंडळात आवाज उठवावा.
या वेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख संजोग वाघेरे, दस्तगीर भाई मनियार, रोमी संधू, हरेश आबा नखाते, संदीप भालके, युवराज कोकाटे, भावेश देशमुख, दिलीप भोंडवे, बाबासाहेब भोंडवे, मोहन बारटक्के, श्रीमंत गिरी, नितीन दर्शले, राजाराम कुदळे, किरण दळवी, गोरख पाटील, अनिता तुतारे शिवसेना शहर संघटिका रूपाली आल्हाट,उपशहर प्रमुख ज्योती भालके, विभाग प्रमुख तसलीम शेख आदी उपस्थित होते.















