- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष ‘युवा प्रेरणा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी 4 वाजता, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विक्रांत पाटील, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व इतर मान्यवर देखील उपस्थित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी, आरंभ लॉन्स, काळेवाडी येथे भव्य महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिक, विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या मेळाव्यात सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक आणि कीर्तनकार प्रा. दिगंबर ढोकळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या लोककल्याणकारी प्रशासनावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचे ओजस्वी विचार ऐकून उपस्थित भारावून गेले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा महिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme अखेर रद्द करण्यात आली. प्रशाससनाने आज तशी घोषणा केली आणि आगामी सर्वसाधारण सभेत त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा विजय झाला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये TP Scheme राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही Scheme लादण्याचा प्रयत्न सुरू होता. या TP Scheme ला तीव्र विरोध करण्यात आला. दरम्यान, भाजपा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सततच्या खंडित होणाऱ्या विजपुरवठयामुळे उद्योजक अडचणीत सापडले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणचे अधिक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक भोसरी महावितरण कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता देवकर साहेब, उपकार्यकरी अभियंता माने, भगत, सहाय्यक अभियंता झोपे, पलके, आकुर्डी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव, सहाय्यक अभियंता देशपांडे मॅडम, दिवटे तसेच प्राधिकरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सरोदे सहाय्यक अभियंता बनसोडे तसेच उद्योग क्षेत्रातून पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे, उद्योजक संदीप सावंत, नाईक, सिरसाट, अकोलकर, अभिजीत शितोळे, साहू, कौस्तुभ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रहाटणी प्रभागात निर्माण झालेल्या अडचणी आणि समस्यांची माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पाहणी केली. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिभुवन यांनी प्रभागाचा आढावा घेत प्रभागातील सर्व अडचणी आणि समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. बाबासाहेब त्रिभुवन यांनी दोन दिवसांपासून संपूर्ण रहाटणी प्रभागात जाऊन पावसामुळे उदभवलेल्या समस्यांची पाहणी केली. यामध्ये प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, लोकनेते गोपीनाथ मुंडे फलक चौक याठिकाणी उखडलेले ब्लॉक दुरुस्त करणे, तुंबलेले ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, जागोजागी साचलेला कचरा साफ करणे, नादुरुस्त स्ट्रॉम वॉटर लाईन…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ मे २०२५ याकाळात ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवा दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आणि चिंचवड मधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. तर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मासिक पाळीविषयी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनभिज्ञता आणि गैरसमज हे महिलांसाठी घातक ठरतात. योग्य माहितीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा संसर्ग,गर्भाशयासंबंधी विकारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मासिक पाळीविषयी न्यूनगंड न बाळगता निसंकोचपणे चर्चा केली पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने हाती घेण्यात येत असतात, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.२०१४ पासून सुरू झालेली ही जागतिक मोहीम आहे. यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मासिक पाळीबाबतचा गैरसमज दूर करणे हा आहे. बुधवारी (२८ मे) जागतिक मासिक…
पिंपरी,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे २९ व ३० मे रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (गुरुवार) दुपारी १२ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर,संत तुकारामनगर येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 29 मे 2025 ते शनिवार दिनांक 31 मे 2025 असा तीन दिवसांचा जयंती महोत्सव घेण्यात येणार आहे. या जयंती महोत्सवात गुरुवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत “खेळ रंगला पैठणीचा” हा खास महिलांसाठी चा कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच आयोजित वीस कलाकारांचा यशोगाथा अहिल्यादेवींची हा शाहिरी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 29 मे रोजीच सायंकाळी सहा…
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड परिसरातही अवकाळी पावसाने जोर धरलेला असताना, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला. या पाहणी दौऱ्यादरम्यान पावसामुळे झालेली हानी, साचलेले पाणी, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांची स्थिती आणि स्ट्रॉम वॉटर लाईनचे अपूर्ण काम अशा विविध मुद्द्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. आ. शंकर जगताप यांनी नवी सांगवी व जुनी सांगवी परिसरातील नाले, स्ट्रॉम वॉटर लाईन व रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची स्थिती जाणून घेतली. एम.एस. काटे चौक, इंद्रप्रस्थ चौक येथील नाल्यांच्या स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता व प्रवाह सुरळीत…
