Author: maharashtrabreakingnews.com

– प्रशासकीय कामात ई-ऑफिस, ‘एआय’ आणि ‘ब्लॉकचेन’चा प्रभावी वापर! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घवघवीत यश संपादन केले आहे. या मोहिमेत पुणे विभागात प्रथम, तर संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक पटकावत ‘पीएमआरडीए’ने आपल्या कार्यक्षमतेची मोहोर उमटवली आहे. मुंबईत आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पीएमआरडीए’चा गौरव करण्यात आला. राज्य शासनाने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. याअंतर्गत राज्यातील ९७ महामंडळे, प्राधिकरणे आणि शासकीय संस्थांचे कडक निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात…

Read More

​चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभरात मतदार याद्यांचे पुननिरीक्षण म्हणजेच ‘एसआयआर’ (SIR) अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ‘बीएलए-१’ (विधानसभा प्रमुख) पदी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते नामदेव जनार्दन ढाके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे या निवडीची घोषणा केली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे चिंचवड परिसरातील पक्ष संघटनेला मोठी ताकद मिळणार आहे. ​भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मतदार याद्यांचे सक्षमीकरण आणि अचूकता तपासणे हे पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे अभियान आहे. या मोहिमेसाठी नामदेव ढाके यांच्याकडे चिंचवड विधानसभा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढती नागरी वसाहत आणि त्यानुसार वाढणाऱ्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेता, या भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे यांनी श्री.विनोय चौबे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. सध्या पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना कोणत्याही पोलीस संबंधित कामासाठी सांगवी पोलीस स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. दोन्ही ठिकाणांमधील अंतर, वाढती वाहतूक कोंडी, तसेच मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविणे, कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा इतर सेवांसाठी मोठा वेळ व श्रम खर्च करावा लागत आहे. विशेषतः महिलां, ज्येष्ठ नागरिक आणि…

Read More

भाऊसाहेब भोईर यांचे प्रतिपादन; नटराज पूजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २७ मार्च रोजी ‘जागतिक रंगभूमी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील नटराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर नाट्य परिषदेच्या कार्यालयात विधीवत नटराज पूजन करून रंगभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष माननीय श्री. भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी उपस्थित नाट्यकर्मी आणि रसिकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर  सुहास जोशी,  किरण येवलेकर, गौरी लोंढे,  संतोष रासने,  राजेंद्र बंग,  मुकेश घोडके,पंकज चव्हाण, मनोज डाळींबकर, फिरोज मुजावर, जुबेर शेख यांसह सांस्कृतिक क्षेत्रातील…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने  लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचे प्रकाशन (शुक्रवार, दिनांक २७ मार्च) न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयात करण्यात आले. पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्षस्थानी  कु. मिसबाह शफिक खान ( इयत्ता ११ वी)  होत्या. प्रमुख अतिथी कु. रेश्मा राकेश प्रजापती ( इयत्ता ११ वी) कु. अर्पिता भाऊराव पवार ( इयत्ता ९ वी )  या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित – दीक्षित, न्यू इंग्लिश स्कूल, माण  विद्यालयाचे मुख्याध्यापक  अंबादास रोडे, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, लेखिका कल्पना बंब व्यासपीठावर विद्यार्थ्यांसमवेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त 31 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘अहिंसा पुरस्कार’, अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा आणि भक्ती संध्या अशा उपक्रमांचा समावेश आहे. महासंघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून शाकाहाराचा प्रसार करणाऱ्या व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘अहिंसा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. यापूर्वी अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे, बाबासाहेब पुरंदरे, उल्हासदादा पवार, शेखर गायकवाड, गुरु गोविंद गिरी महाराज आदी मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी अध्यात्मिक क्षेत्रात कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर, वास्तुशास्त्र व समाजसेवा…

Read More

‘महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६’ चे रविवारी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते  होणार उद्धाटन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार स्पर्धा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पिंपरी चिंचवड अमेच्यूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ चे आयोजन चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार, २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत चिंचवड येथील केशवनगर परिसरातील कल्याण प्रतिष्ठान येथे रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर उद्या रविवारी २९ मार्चला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री वर्धमान स्थानक जैन श्रावक संघ व विशाल संघ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात रक्तदानासोबतच नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून भगवान महावीर यांच्या अहिंसा व…

Read More

वडगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वडगाव शहराच्या वाढत्या नागरिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना’ अंतर्गत ३९ कोटी ३३ लक्ष रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संस्कृती जलशुद्धीकरण केंद्र’ (WTP – 2 MLD) चे लोकार्पण उत्साहात पार पडले. या योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात तब्बल ८४ किमी लांबीचे पाईपलाईन जाळे उभारले जात असून, नूतनीकरण केलेल्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पांमधून दररोज सुमारे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वडगावकरांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे. डेक्कन हिल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील ज्येष्ठ कवयित्री आणि गझलकारा मीना शिंदे यांना गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या; तसेच साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रास्ताविकातून ज्योत्स्ना चांदगुडे यांनी, ‘मीना शिंदे सुमारे पस्तीस वर्षांपासून आशयघन कविता आणि गझल लिहीत आहेत. त्या कवितांच्या सन्मानार्थ ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ प्रदान करून त्यांना सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद…

Read More