- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थायलंडची राजधानी पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य रविंद्र केदारी यांनी पदकांची हॅटट्रिक पूर्ण करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण, २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल प्रकारात रौप्य आणि ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारात कांस्य मिळवत महाराष्ट्रासह विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रा.केदारींनी स्पर्धेत सर्वप्रथम २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल प्रकारात आव्हान देताना ६:२७.५ अशी वेळ नोंदवित रौप्य कामगिरी केली. या गटात त्यांचा भारतीय सहकारी सिद्धार्थ याने (६:२५.१) याने सुवर्णपदक पटकाविले तर सौदी अरेबियाच्या हिशामने…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कष्टाशिवाय ध्येय साध्य होत नाही!’ असा कानमंत्र संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल शेटे यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका, संत तुकारामनगर, पिंपरी येथे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना दिला. ग्रंथालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त लांडे, महेंद्र बाविस्कर, नीलेश अष्टेकर, सचिन अहिरराव आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची विशेष उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अतुल शेटे यांनी आपल्या…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचा प्रारंभ सोमवार, दिनांक ०२ जून २०२५ रोजी होणार आहे. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, प्लॉट क्रमांक ५१३, पेठ क्रमांक २७, संत तुकाराममहाराज उद्यानासमोर, प्राधिकरण, निगडी येथे दररोज सायंकाळी ठीक ०६:३० वाजता व्याख्यानाला सुरवात होईल. पंधराव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या मधुश्री व्याख्यानमालेत सोमवार, दिनांक ०२ जून रोजी डॉ. मानसी हराळे ‘आरोग्यम् धनसंपदा’ या विषयावर प्रथम पुष्पाची गुंफण करतील. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला प्रमुख समन्वयक सुहास पोफळे यांची अध्यक्ष आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे प्रमुख पाहुण्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली टीपी स्कीम रद्द करण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यामुळे प्रशासनाने कार्यवाही स्थगित केली. यामुळे मौजे चऱ्होली येथील ग्रामस्थ, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चऱ्होलीकरांनी भेट घेतली आणि टीपी स्कीम रद्द करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबाबत आभार व्यक्त केले. तसेच, आमदार महेश लांडगे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा केला. भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम कठोर भूमिका घेतल्याबद्दल आमदार लांडगे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी शहराचे माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता झपाट्याने सुधारत आहे. २०२३–२४ या शैक्षणिक वर्षात २८% विद्यार्थी शिकण्याच्या प्रारंभिक (बिगिनर) पातळीवर होते, तर २०२४–२५ मध्ये ही टक्केवारी केवळ १३ टक्क्यांवर वर आली आहे. याशिवाय प्रगत (अँडव्हान्स) पातळीवरील विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली असून त्यांची टक्केवारी ०.५ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यापर्यंत वाढली आहे. या बदलामागे ‘भारतीय गुणवत्ता परिषदे’ने (QCI) तयार केलेल्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीचा मोठा वाटा आहे. हे मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी करण्यात आले ज्यात इयत्ता १ ते १० मधील ४८ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. गणित, भाषा, विज्ञान व पर्यावरण या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचे सखोल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. बकरी ईद सणाचे महत्व लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती…
आज पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे होणार पारितोषिक वितरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहण्यासोबत फिल्म डिस्ट्रीब्युशन – पॅनल चर्चा, मुक्त मंच व ज्युरी चर्चा अशा महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विशेष सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये चित्रपट वितरण, ज्युरी प्रक्रिया, चित्रपट समीक्षण तसेच ओपन फोरमद्वारे प्रेक्षक व चित्रपटकार यांच्यातील संवाद या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये सुप्रसिद्ध फिल्म विश्लेषक, महोत्सव क्युरेटर अजय फुटाणे , ज्येष्ठ लेखक,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय तरुणांनी आता परदेशात जाण्याची गरज नाही. भारतात आता उद्योग, व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन आपण उद्योग, व्यवसायात पुढे गेले पाहिजे असे मार्गदर्शन अमेरिकेतील एकमेव मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी पुण्यात केले. गुरुवारी (दि.२९) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल आणि रुरल आंत्रप्रिन्युअर कनेक्ट इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात श्री ठाणेदार बोलत होते. यावेळी श्री ठाणेदार यांना महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांच्या हस्ते ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपल्याला शिकवल्या गेलेल्या इतिहासात मुघल गेल्यावर थेट ब्रिटिश आले आणि राज्य केले असे सांगितले जाते. पण ते चुकीचे आहे. दरम्यानच्या १०० ते १२५ वर्षात वेगवेगळ्या स्वरूपात ठिकठिकाणी राज्यकारभार सुरु होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्ष उत्कृष्ट कारभार चालवला. त्यांच्या कारभारात सामान्य माणूस सर्वप्रथम होता. अहिल्यादेवी महाराणी होत्या. त्यांच्या नावाने राज्यात अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तरुण पिढीला माहिती व्हायला हवे,” असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी पोलीस चौकी चे दुरुस्ती काम तातडीने करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाल्यामुळे ( पिंपळे गुरव डायनासोर गार्डन येथे असलेल्या नवी सांगवी पोलीस चौकी ) समोर भरपूर प्रमाणात पाणीसाठा होत होता त्यामुळे पोलीस चौकीमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना व पोलीस बांधवांना तो त्रास वारंवार सहन करावा लागत होता. त्यानंतर त्रस्त नागरिकांनी मेघराज लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर कामाची पाहणी स्व:ता मेघराज लोखंडे…
