Author: maharashtrabreakingnews.com

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — सुप्रसिद्ध अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थापक सयाजी शिंदे (दादा) यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात जैवविविधतेसाठी देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी सोमवारी विशेष बैठक पार पडली. या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा काळ वृक्षारोपणासाठी अतिशय अनुकूल मानला जातो. नैसर्गिक पाणी उपलब्ध असल्याने नवीन रोपे लवकर रुजतात आणि परिसरातील वनस्पती व प्राण्यांची जैवविविधता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. वारकऱ्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी सर्व यंत्रणांनी समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. पिंपरी चिंचवड शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आगमन होणार असून यादिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये २० जून रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्याच्या स्वागताची महापालिकेकडून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने आष्टा, तालुका वाळवा येथे येत्या २८ जूनला मराठी-पाली भाषा साहित्य संमेलनाचे आयोजन माजी ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे. या एकदिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी   कृषिभूषण सुदाम भोरे आणि उद्घाटक म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ तर ज्येष्ठ विचारवंत  सुनीलकुमार लवटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, महेंद्र भारती, प्रभाकर वाघोले, पुरुषोत्तम सदाफुले याप्रसंगी उपस्थित होते.

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -त्रिरत्न बौद्ध महासंघ, पिंपरी केंद्राच्या वतीने नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहार चे उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात उत्साहात पार पडले. या विहाराच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी माननीय आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला होता. या धम्मविहाराची मूळ संकल्पना सन १९९२ मध्ये साकारण्यात आली होती. तब्बल ३३ वर्षांनंतर, नव्या स्वरूपात व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा धम्मविहार पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी नव्या रुपात खुला करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले, “माझ्या आमदार निधीतून बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या बौद्ध विहारासाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाले, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवाचे आहे. मागील ३३…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्सर्जन क्षेत्रे (लो इमिशन झोन्स – एल.ई.झी) योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीवर आधारित तांत्रिक कार्यशाळेचा शुभारंभ आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व ब्रिटिश उच्च उपायुक्त जेमी स्कॅटरगुड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, कार्यकारी अभियंता सुनिल पवार,हरविंदसिंग बन्सल, सोहम निकम, युके पॅक्ट प्रकल्प अधिकारी कनुप्रिया शर्मा, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या लीह रॅफर्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘’आता थांबायचं नाय’’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करून पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना प्रेरणा देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्व रूजविण्याचे जे काम केले आहे ते कौतुकास्पद असून शिक्षणासाठी झगडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल असे गौरवद्गार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी काढले. पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्याच्या वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. अशाच एका उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सफाई सेवकांसाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आज पिंपरी येथील विशाल सिनेमा येथे आयोजित करण्यात आले…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील २४ शाळा लवकरच आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज ‘पुणे मॉडेल स्कूल’ (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत असून, त्यासाठी एकूण २० कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. या २४ शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या, प्रवेशद्वार, व्यासपीठ, पदपथ, हॅंडवॉश स्टेशन, शौचालये आणि संरक्षक भिंती अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. *मावळ तालुक्यातील आदर्श शाळांची यादी व निधी (रु. लक्षात):* १) आढले बु – ९१.२१ २) शिवणे – १०९.२२…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात लक्षणीय यश मिळाले त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले, अनेक ठिकाणी विजय प्राप्त झाला तर काही ठिकाणी थोडक्यामध्ये अपयश आले. महाराष्ट्रातील कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी त्यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करून त्यांना ऊर्जा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले आहे. या पुणे येथे झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील कष्टकरी, असंघटित व कंत्राटी कामगारांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्यांवरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितांमुळे कामगारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने  सोलापूर येथे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात  प्रकाश अण्णा शेंडगे   आमदार जत यांचे हस्ते आकुर्डी येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या शिक्षिका लता अण्णा नवले (  शितल भानुदास औटी ) यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील डॉ. केतन भास्कर रिकामे यांना ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोरकडून एस्ट्रोफिजिक्समध्ये पीएच. डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. केतन रिकामे हे बंगलोर येथील रामण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ब्लॅकहोल आणि अवकाशीय घटकांमधून येणाऱ्या क्ष किरणांचा अभ्यास करण्यासाठी उपकरण बनवण्यावर संशोधन करत आहेत. या उपकरणाला एक्सरेपोलरोमीटर म्हणतात, आणि हे तयार उपकरण केलेल्या टीममध्ये डॉ. केतन यांचा सहभाग होता. सदरचे उपकरण भारताचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून दिनांक जानेवारी २०२४ रोजी प्रक्षेपित झालेल्या *XPosat* या भारतातील पहिल्या व जगातील दुसऱ्या उपग्रहामध्ये बसविण्यात आले आहे. यामध्ये डॉ. केतन यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर काम केले. या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील…

Read More