- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन हुंडा विरोधी तसेच लग्नातील अनिष्ठ व नवीन आरूढ होत चाललेल्या प्रथे विरुद्ध एकत्र येऊन आपल्या पिंपरी चिंचवड शहरात तसेच राज्यभर विविध माध्यमातून लढा देण्याचे ठराव पास करण्यात आला. संपूर्ण राज्यभरातील तेली समाजातील काम करणाऱ्या सर्व संघटना राजकीय नेते, समाजातील कार्यकर्ते मान्यवर तसेच वधुवर मेळावा आयोजित करणाऱ्या सर्व संघटना याना प्रत्येक्ष भेटून पत्राद्वारे किंवा आव्हान द्वारे हुंडा विरोधी तसेच लग्नातील अनिष्ठ व नवीन आरूढ होत चाललेल्या प्रथे विरुद्ध हि चळवळ उभी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. याची सुरवात महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरातील संताजी सेवा प्रतिष्ठान व प्रदेश तेली महासंघ द्वारे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील पत विक्रेत्यांचे सन २०२२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ठेकेदाराच्या चुकांमुळे दोन वर्षे विलंब झाला, आता प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत तर काही ठिकाणी हे थांबवण्यात आलेले आहे . फेरीवाला प्रमाणपत्र त्वरित वाटपास सुरुवात करण्यात यावी तसेच फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्वरित बैठकीचे आयोजन करण्यात करावे या मागणीसह कामगार नेते काशिनाथ नखाते यांचेसह शहर पथ विक्रेता समिती सदस्यांनी आज समितीचे अध्यक्ष आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहरातील १५ हजार विक्रेत्यांपैकी ८ हजारापेक्षा अधिक विक्रेत्यानी ओळखपत्र व परवाना शुल्क १४०० रुपये प्रमाणे भरले आहेत मात्र केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रमाणपत्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने पिंपरी येथील मोरवाडी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मुंडे साहेबांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. काटे म्हणाले, “गोपीनाथजी मुंडे हे फक्त एक नेते नव्हते, तर ते सामान्यांचे, वंचितांचे आणि महाराष्ट्राच्या मातीतील सर्वसामान्यांचे खरे आधारस्तंभ होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले. त्यांचे विचार आणि…
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाची आमदार शंकर जगताप यांनी केली पूर्तता वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड दत्तमंदिर रस्त्याच्या रुंदीकरण, सुशोभीकरण आणि नागरिकसुविधा विकासासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याणकारी संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून एक अत्यंत फलदायी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रस्त्याच्या प्रस्तावित डिझाईनबाबत सविस्तर चर्चा झाली आणि विविध सुधारणा सुचवण्यात आल्या. या उपक्रमामागे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची संकल्पना असून, विकास आराखड्यात सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग असावा, हा त्यांचा स्पष्ट उद्देश आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या रस्त्याच्या विकासासंदर्भात आमदार शंकर जगताप यांनी निवडणूक काळात नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली आहे. त्यांनी सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘कॉफी विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिकेने महिला सबलीकरणासाठी सुरू केलेल्या थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिला आज सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही केंद्रातील महिलांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी संवाद साधला. कोरोना महामारीमध्ये विधवा झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेने थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू केले आहे. तसेच भोसरी येथे महिला सबलीकरणाच्या उद्देशाने केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातील महिलांना थेट आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाजविकास अधिकारी संतोषी चौरगे, समुह संघटक वैशाली खरात,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्रिरत्न बौद्ध महासंघ, पिंपरी केंद्राच्या वतीने नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहार चे उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात उत्साहात पार पडले. या विहाराच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी माननीय आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला होता. या धम्मविहाराची मूळ संकल्पना सन १९९२ मध्ये साकारण्यात आली होती. तब्बल ३३ वर्षांनंतर, नव्या स्वरूपात व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा धम्मविहार पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी नव्या रुपात खुला करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले, “माझ्या आमदार निधीतून बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या बौद्ध विहारासाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाले, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवाचे आहे. मागील ३३…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्व यंत्रांनांनी समनव्य साधून पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत. नालेसफाईला गती द्यावी. उरण शहरात समुद्राचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेथे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. रेल्वे स्थानकाच्या आढावा घेतल्यानंतर आता खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. सोमवारी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत उरण येथील पंचायत समितीत आढावा बैठक झाली. सिडको, सार्वजनिक बांधकाम, जेएनपीटी, तहसील, वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उरणचे तहसीलदार उद्धव…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा असून ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीत हा भाव प्रतीत होतो!’ असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी पिंपळे सौदागर येथे व्यक्त केले. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे लिखित ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीला स्मृतिशेष चमेली भाऊराव स्मृती कादंबरी पुरस्काराने सन्मानित करताना सासणे बोलत होते. ज्येष्ठ अनुवादक प्रा. डॉ. विलास साळुंखे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, पीतांबर लोहार, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, स्वाती लबडे, चमेली भाऊराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत हिंगोणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत सासणे पुढे म्हणाले की, ‘मराठीतील कादंबरीलेखन हे रंजनात्मक, कलात्मक, वास्तववादी, अतिवास्तववादी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतो. वर्षभर राबवल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम माझ्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. कारण आपल्या पुढील पिढीचे, आपल्या समाजाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा मनस्वी आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो, अशा भावना शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी व्यक्त केल्या आहेत. यमुनानगर, निगडी सेक्टर 22 येथील दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम अपंग विद्यालय यमुनानगर निगडी येथे पार पडला. यामध्ये दहावी, बारावी परीक्षा पास झालेले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात पुण्यातील प्रतिष्ठित व उच्चभ्रू परिवारातील वैष्णवी हगवणे हुंडा व त्यातून हत्या की आत्महत्या प्रकरण गाजत असताना पुण्यातील आयटी हब असणाऱ्या हिंजवडी येथील लग्नात चारचाकी गाडी, १५ तोळे सोने, तसेच इतर महागड्या वस्तू देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ होत आहे. याबाबत राज्य महिला आयोगाकडे व पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आपला छळ सुरूच असल्याची माहिती ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी ऐश्वर्या यांचे आईवडील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना ऐश्वर्या हुलावळे (माहेरचे नाव ऐश्वर्या बबन गव्हाणे) यांनी सांगितले, की पती आदित्य अरुण…
