Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ईद- उल – अजहा ( बकरी ईद ) हा सण हजरत अलैहिस्सलाम यांनी दिलेल्या त्यागाच्या आदर्शावर आधारित असून आपण त्यांच्या त्याआत्मबलिदानाच्या प्रेरणेतून समाजासाठी निःस्वार्थ सेवा मदत आणि एकोप्याचा संदेश घ्यायला हवा .बकरी ईदचा खरा उद्देश गरजू पर्यंत अन्न पोहोचवणे. जात- पात ,धर्म न पाहता माणुसकीची जपणूक करणे , आपापसात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे आहे .ृहा संदेश पिंपरी चिंचवड शहरातील मौलाना करवी मुस्लिम बांधवांना ईदच्यानमाज पठनाच्या वेळी आज बकरी ईद सणाच्या निमित्त देण्यात आला. आपापसात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा संदेश मौलाना करवी नमाज पठणाच्या वेळी पिंपरी चिंचवड शहरात देण्यात आला.पिंपरी चिंचवड…

Read More

पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख संविधान उद्देशिका वाटप करण्यात येणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातील प्रत्येक कलम हे मानवी मूल्यांचे रक्षण करणारे आहे, “आम्ही भारताचे लोक” या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शब्दातच देशाला एकता,अखंडता व समानतेत गुंफले आहे. प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे,याशिवाय आपले मत व्यक्त करण्याचा, आपल्या मनाप्रमाणे नोकरी,उद्योग,व्यवसाय करण्याचाही अधिकार दिलेला आहे. आपल्या संविधानामुळे देशात प्रत्येक जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. याच एकतेच्या जोरावर भारताने विविध क्षेत्रात प्रगती करत जागतिक स्तरावर आपल्या देशाचे स्थान उंचावले आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व कासारवाडी येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या उपक्रम संकल्पनेनुसार राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले होते,त्याअनुषंगाने पिंपरी येथील मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आलेला होता. कार्यक्रमास पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे,एम टेक इंजीनियरिंग कंपनीचे संचालक मनीष कोल्हटकर, स्टार्टजिक बिझनेस डेव्हलपमेंट एलिकॉन कास्ट अलॉय लिमिटेड कंपनीचे हर्षवर्धन गुने हे प्रमुख पाहुणे म्हणून तर,इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे,एम टेक इंजीनियरिंग कंपनीचे संचालक मंदार किरणे तसेच ऐश्वर्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरामध्ये यंदाचा सार्वजनिक कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरा होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी, प्राधिकरणातील खान्देश मराठा मंडळ सभागृहात विविध खान्देशी समाज मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक कानबाई उत्सव आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व समाज बांधवांना समान जबाबदारी देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यावर भर देण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात खान्देशी समाजाचा प्रभाव वाढावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच, यंदाचा सार्वजनिक कानबाई उत्सव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेवराव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच, या सार्वजनिक उत्सवासाठी खान्देशातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची कानबाई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यामध्ये मोशी येथे कत्तलखाना प्रस्तावित केला होता. या आरक्षणास स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि सकल हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सदर आरक्षण बदल करुन, त्याच ठिकाणी गोशाळा उभारण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिक, भूमिपुत्र, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मौजे मोशी येथील नवीन गट नं. 325 (जुना गट नं. 323) या गावच्या हद्दीत कत्तलखान्यासाठी जागा आरक्षीत केली आहे. याला स्थानिक नागरिक, हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विरोध केला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला, सांडपाण्यासह इतर कचरा वाहून येतो. त्यामुळे हे पाणी काही प्रमाणात गढूळ असते. मात्र महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संघटनेच्या नियमांप्रमाणे शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पाणी नागरिकांना वितरित केले जाते. पाण्याची चव व वास बदललेला जाणवत असला तरी ते पाणी पूर्णतः पिण्यायोग्य आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. तसेच पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला मावळमधील पवना व आंद्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्यातील चार महिने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राज्यातील झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकीकरणामध्ये अनेक वेळा श्रमिक वर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार दुर्लक्षित केला जातो. अशाच अन्यायग्रस्त कामगारांच्या न्यायहक्कासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या कार्यालयात झालेल्या विविध औद्योगिक कंपन्यांवरील बैठकींमध्ये अन्यायग्रस्त श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज हॉटेल कलासागर पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी दिली. यावेळी भोसले म्हणाले की,राज्यभरातील अनेक कंपन्यांमध्ये पर्मनंट नोकऱ्या रद्द करून कंत्राटी, हंगामी स्वरूपात कामगारांना नियुक्त केले जात आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांचे आयुष्य विस्कळीत होत असून, न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या…

Read More

कामगार अन्यायावर उपाध्यक्ष बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकीकरणामध्ये अनेक वेळा श्रमिक वर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार दुर्लक्षित केला जातो. अशाच अन्यायग्रस्त कामगारांच्या न्यायहक्कासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या कार्यालयात झालेल्या विविध औद्योगिक कंपन्यांवरील बैठकींमध्ये अन्यायग्रस्त श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज हॉटेल कलासागर पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी दिली. यावेळी भोसले म्हणाले की,राज्यभरातील अनेक कंपन्यांमध्ये पर्मनंट नोकऱ्या रद्द करून कंत्राटी, हंगामी स्वरूपात कामगारांना नियुक्त केले जात आहे. त्यामुळे…

Read More

शिवसैनिकांचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर तात्काळ कार्यवाही; भूमिपुत्र, शेतकऱ्यांना दिलासा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme तातडीने रद्द करण्यात यावी. यासाठी प्रशाससनाने केवळ घोषणा न करता तातडीने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवून TP Scheme रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात यावे. असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये TP Scheme राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही Scheme लादण्याचा प्रयत्न सुरू होता. या TP Scheme ला तीव्र विरोध करण्यात आला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपळे निलख येथील अंगणवाडीत एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अंगणवाडीतील लहानग्यांना पाटी, पेन्सिल, डस्टर, कलर,आणि खाऊ भेट देण्यात आला. तसेच अंगणवाडीला एक नवीन फळा भेट देऊन शिक्षणासाठी उपयुक्त साधनांची जोड देण्यात आली. छोट्या वयातच ज्ञानाचं शस्त्र हाती देणं म्हणजे शिवरायांना खरी आदरांजली असल्याचा विचार यामागे होता. बालवयात शिक्षणाची गोडी लावणं, हीच खरी संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिक्षण हा मूलभूत हक्क होता, आणि आजच्या काळातही तो विचार जपला गेला पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. रविराज काळे यांनी सांगितले…

Read More