Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त एकनाथ उगले आणि रवींद्र रायकर यांचा सन्मान    (Vishwakarma Meritorious Worker Awardees Eknath Ugle and Ravindra Raikar honored) महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांच्यावतीने पद्मश्री आणि पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या  हस्ते राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या ठिकाणी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि कार्याध्यक्ष राजेंद्र वाघ आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी अण्णा हजारे यांनी सोबत असलेल्या कुमारी वैष्णवी उगले यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात असे म्हटले “स्री पणाचे गाठोडे बाजूला ठेवून देशकार्यात पुढे आले पाहिजे.आजचा युवक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना युवा सेना सेनेच्या शिरूर लोकसभा (भोसरी आळंदी खेड) अध्यक्षपदी अजिंक्य सुलभा रामभाऊ उबाळे यांची निवड झाली. या निमित्ताने मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार महासंसदरत्न  श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तमाम शिवसैनिक उपस्थित होते. या नव्या नेमणुकीच्या निमित्ताने मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार व महासंसदरत्न  श्रीरंग बारणे यांनी अजिंक्य उबाळे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले की, “युवा सेनेतील ही नवीन नियुक्ती पक्षाची ध्येयधोरणे अधिक बळकट करेल आणि तरुणाईत शिवसेनेची ऊर्जा आणखी वृद्धिंगत होईल.” या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात सर्वांनी नविन नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पावसाळ्यात लोणावळा, कार्ला, आंदर, पवन, नाणे मावळात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. पर्यटकांना सुविधा द्याव्यात. त्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पार्किगच्या जागेत पाणी साचते. तिथे मुरुम टाकून दुरुस्ती करुन घ्यावी. पोलिसांनी पर्यटकांना केवळ धाक दाखवू नये. पर्यटकांना सुविधा द्यावी. चुकीचे कृत्य करणाऱ्या पर्यटकावर कारवाई करावी. अतिउत्साही पर्यटक धबधब्याखाली पाण्यात उतरतात. त्यासाठी कर्मचारी वाढवावेत. वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे हे विधानसभानिहाय बैठक घेत आहेत. त्यानुसार मावळ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक गुरुवारी वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य व स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीची नियोजन बैठक दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीस महापालिका उपआयुक्त सचिन पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीस महापालिकेचे माजी नगरसदस्य जयंत बागल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , सहाय्यक आरोग्याधिकारी किशोर दरवडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ३० जून २०२५ पूर्वी मालमत्ता कर भरून महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन कर भरल्यास, त्यांना थेट १० टक्क्यांपर्यंत कर सवलत दिली जात आहे. तसेच, महिलांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांवर ३० टक्क्यांपर्यंत करसवलत दिली जात असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महापालिकेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्ता, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना सामान्य करात सवलत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची, तसेच पालखी मार्गाची पाहणी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केली. या पाहणी दौऱ्यावेळी सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली  गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी पिपंरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) युवक शहर उपाध्यक्ष श्री. मजहर शोर मोहम्मद खान यांचा समर्थकांसहित काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. समवेत सुभेदार मोहम्मद आलम हुसैन, रुक्साना खान, बायणा पठाण, पीर मोहम्मद बशीर पठाण, मोमीन जहागीर तांबोळी, यूसुफ बाबू सय्यद, मोहम्मद अली गुलाब शेख, अब्दुल रज्जाक शेख, जिलानी अल्लाबक्ष शेख, अब्दुल्ला उमर तांबोळी, हुझेफ अकबर पिंजारी, फिरोज आदम पठाण, जावेद इमाम शेख, मजहर खान, फिरोज मुलाणी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर…

Read More

रहाटणी फाटा येथे ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यापासून नागरिकांची सुटका आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा पुढाकार रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – रहाटणी फाटा येथील उतारामुळे काळेवाडी फाटा येथून ड्रेनेजमार्गे येणारे घाण पाणी तसेच रहाटणी फाटा चौकातील स्वच्छतागृहाची ड्रेनेजलाईन चोकोप होऊन सर्व घाण पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरून सगळीकडे दुर्गंधीचे वातावरण तयार होत असल्याने स्थानिक रहिवाशांचा अक्षरशः श्वास कोंडला होता. मात्र आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने चोकोप काढून ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकल्याने येथील रहिवाशांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे. रहाटणी फाटा येथील मुख्य चौकातील ड्रेनेज लाईन चोकोप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्थेचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. पतसंस्थेचा  राज्याचे उपमुख्यमंत्री  ना. अजित पवार यांच्या हस्ते उ‌द्घाटन झालेल्या लक्ष्मीनगर पतसंस्थेचा २२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पतसंस्थेच कामकाज २७ लाखांच्या खेळत्या भांडवलावर सुरु झालेल्या संस्थेने आज २४ कोटींच्या ठेवी व १८ कोटींचे कर्ज वाटप करून ४५ कोटींकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. पतसंस्थेच्या स्थापनेपासुन संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ असुन थकबाकी नाममात्र आहे. संस्थेच्या वतीने मानाचा सहकार भुषण पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मा. शशिकांत ऊर्फ बबनराव खंडु झिंझुर्डे यांना देण्यात आला. पतसंस्थेच्या वाढीचा आलखे पाहुन व कामकाजाचा आढावा घेवुन त्यांनी संस्थेची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते. वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी मुंबई महापालिकेची अंतिम केलेली प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. नगर…

Read More