Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) = आमदार अमित गोरखे यांनी स्वतः शिकलेल्या मनपा शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक व प्रेरणादायी क्षण अनुभवला. शासनाच्या ‘१०० शाळांना भेट’ या अभिनव उपक्रमांतर्गत निवड झालेल्या “स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर, काळभोर नगर” मनपा शाळेला भेट देण्यासाठी आमदार अमित गोरखे उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. “ही तीच शाळा आहे, जिथे मी विद्यार्थी म्हणून बसलो होतो, शिकलो होतो, घडलो होतो. आज आमदार म्हणून या शाळेत परत आलो, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व भावनिक क्षण आहे,” अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आठ टॅंकर पालखी सोहळ्यासोबत पाठविण्यात येत आहेत. संत महंतांच्या हस्ते टँकरचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. वारीसाठी विशेष सहकार्य विजय भोसले , गणेश शेलार यांनी मोलाचे योगदान दिले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, दिंडी क्र.18 कै. ह.भ.प. धोंडूजी बुवा चिझघरकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.रामकृष्ण प्रासादिक, दिंडी क्र. ९ ह. भ. प. भागवत महाराज बोळेगावकर, दिंडी क्र. ३८७ स्वयंभू श्री राम प्रभू, दिंडी…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघांचा’ पहिला वर्धापन दिन ‘१९ ग्रँड वेस्ट सोसायटीच्या’ आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जेष्ठ नागरिक संघात एकूण १०९ नोंदणीकृत प्राथमिक सदस्य आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सिताराम आरुडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन, सल्लागार चंद्रकांत पाठक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर सचिव ईश्वर शिवणे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून गणेश वंदनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.. सुमधुर मराठी व हिंदी गाणी, अभंग, मनमोहक नाट्यगीते, नेत्र दीपक नृत्य, हास्य रसात बुडवून टाकणारे कलात्मक अ‍ॅक्ट असे विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम या स्नेहमिलनाच्या निमित्ताने सादर करण्यात आले. देश व राज्य संरक्षण सेवेतून निवृत्त झालेल्या सदस्यांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले स्वागत फलक…, विद्यार्थ्यांना खाऊ आणि पुष्प देत शाळेत स्वागत करणारे शिक्षक…, नवीन करकरीत पाठ्यपुस्तकांचे करण्यात आलेले वाटप…, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमण्यासाठी ठेवण्यात आलेली विविध अभ्यासपूर्ण खेळणी…या प्रसन्न वातावरणात आज (सोमवारी) रहाटणी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कन्या शाळा क्र.५५ मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘ग’ प्रभागचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे यांच्या उपस्थितीत इयत्ता १ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, खाऊ आणि गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, आज शाळेच्या नवीन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी बालचमुंचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेविषयी आपुलकी आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘माय फर्स्ट डे ऍट स्कूल’, तसेच ‘छत्रीतून अक्षरांचा पाऊस’ ही संकल्पना राबविण्यात आली. शाळेमध्ये प्रवेश करणारे बालक व त्यांना शाळेत सोडायला आलेले पालक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अरविंद सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, प्रशालेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका इशिता परमार,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार गट आता मैदानात उतरला आहे. पक्षाच्या आगामी रणनितीची आखणी आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी आज दि.१७ जून २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली. सिल्व्हर बॅन्क्वेट हॉल, ताथवडे येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभणार आहे. यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि राहुल कलाटे यांचे गट आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातून…

Read More

आकुर्डी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी येथे दाखल होत असून, या पार्श्वभूमीवर हजारो वारकरी बांधवांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, मंडप उभारणीसाठी परवाना मिळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी यासंदर्भात मनपा आयुक्त शेखर सिंह व पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे विनंती केली असून, “अन्नदानासाठी आवश्यक असलेले मंडप परवाने देताना नियमावली तात्काळ शिथील करावी, जेणेकरून हजारो वारकरी बांधवांना योग्य सुविधा मिळतील” अशी मागणी त्यांनी केली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस..यानिमित्त पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक 51 येथे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्याना  फुले देऊन  स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित प्राथमिक शाळेतील मुलांचे पहिले पाऊल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची मा .विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. तसेच  विठ्ठल उर्फ नाना काटे   हस्ते प्रथम दिवसाचे आकर्षण असणारी शालेय पाठयपुस्तकांचे व  शालेय वस्तूंचे किट तसेच गणवेश वाटप यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या संगणक विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता  नीलकंठ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आरंभ सोशल फाउंडेशन आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबीर समारंभ  रविवार दि.१५ जून २०२५ रोजी  आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे उत्साहात पार पडला. पिंपरी चिंचवड शहरातील चारशेहून अधिक दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शहराचे माजी उपमहापौर तुषार हिंगे, आरंभ फाऊंडेशनच्या संचालिका सौ सोनाली तुषार हिंगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टॅब, स्मार्ट वॉच, बॅग आणि प्रशस्तिपत्रक असे बक्षिसांचे स्वरूप होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून युवा पत्रकार व मित्र सौमित्र पोटे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी सदस्य सदाशिव खाडे, भाजपा युवा मोर्चा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सह देशभरामध्ये काम करणाऱ्या घरेलू कामगारांचे कामगारांचे जीवन असुरक्षित त्यांच्या कामाला कायदेशीर हक्क अधिकार प्राप्त होत नाहीत, त्याचबरोबर घरेलू कामगार महिलांचे आरोग्याचे प्रश्न,अपघाती विमा यासह किमान वेतन व पिळवणूक टाळण्यासाठी कायदा होणे महत्त्वाचा आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने २९ जानेवारी रोजी घरेलू कामगारांचा केंद्रीय कायदा करावा असे आदेश केंद्र सरकारला दिले मात्र आता ५ महिने झाले सरकार चालढकल करत असून हा कायदा त्वरित मंजूर करून घरेलू कामगारांना सुरक्षा द्यावी यासाठी लढण्याचा निश्चय सूर घरेलू कामगार दिनानिमित्त आयोजित घरेलू कामगार मेळाव्यात एकमुखाने करण्यात आला. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ, घरेलू…

Read More