Author: maharashtrabreakingnews.com

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भरधाव वेगातील क्रेनने धडक दिल्यामुळे एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी (दि.१८) घडली. नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. अधिकच्या माहितीनुसार, ते देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइल वरून पोलिसांनी त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला आहे.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम निरोगी राहावे यासाठी विश्व हिंदू परिषद अनेक वर्षांपासून पंढरपूर पर्यंत अनेक व्यवस्थेसह डॉक्टर, नर्सेस, ऍम्ब्युलन्स, स्वयंसेवक आदी टीम सह वारकऱ्यांना सर्व प्रकारची औषधी सेवा देत असते. ‘मधुकर बच्चे युवा मंच’, ‘चैतन्य फार्मा ग्रुप’ व ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ यांच्या वतीने गेली १६ वर्षे सातत्याने लोकसहभागातून मोठ्या प्रमानात औषधे दिली जातात. या वर्षी देखील जास्तीत जास्त औषधे देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसहभागातून जमा केलेली हि सर्व औषधे विश्व हिंदू परिषेधेकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम चिंचवड केशवनगर येथील’ यशस्वी क्लासेस हॉल’ येथे पार पडला. या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू…

Read More

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. तुकोबांची पालखी पारंपरिक रीतिरिवाज आणि अभंगगजरांच्या साथीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवली आहे. पावसाच्या सरींनी वातावरण अधिक मंगलमय केलं असून, आजचा मुक्काम इनामदार वाड्यात होणार आहे. उद्या पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होणार असून, वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने अवघं देहू भक्तिरसात न्हालं आहे. लाखो वारकरी भक्तीच्या ओढीने सहभागी झाले असून, पंढरपूरची वारी सुरू झाली आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग newj) – ‘विज्ञानाच्या अति आहारी गेल्यामुळे आईचा पदर आता पूर्वीसारखा राहिला नाही; तसेच समाजात या पदराचा आदरही कमी झाला आहे!’ अशी खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डाॅ. लक्ष्मण शिवणेकर यांनी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी व्यक्त केली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय लोक अदालतीतील न्यायाधीश ॲड. रमेश उंबरगे लिखित ‘आईच्या मायेचा स्पर्श’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना डाॅ. लक्ष्मण शिवणेकर बोलत होते. सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब आंदळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे, सामाजिक कार्यकर्ते महेश स्वामी, साहाय्यक पोलीस आयुक्त बाळकृष्ण अंबुरे, शिवलिंग ढवळेश्वर, श्याम मोरे,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘गिरीश प्रभुणे हे कर्मतपस्वी असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शन करणारे आहे!’ असे गौरवोद्गार रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. पंडित विद्यासागर यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय पिंपरी येथे  व्यक्त केले. कलारंजन प्रतिष्ठान आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार करताना डाॅ. पंडित विद्यासागर बोलत होते. महाराष्ट्र ग्रंथालय सेवानिवृत्त उपसंचालक बाबुराव हंद्राळे, भटक्याविमुक्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गायकवाड, उपमुख्याध्यापक अविनाश यादवाडकर, प्रा. माधव राजगुरू, प्रा. बाळकृष्ण माडगूळकर, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आणि कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, भक्ती – शक्ती प्रासादिक दिंडी, भारतीय भूतपूर्व सैनिक संघ आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते ७:३० या कालावधीत प्राधिकरणामध्ये प्रथमच संस्कृतीचा वारी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, निगडी प्राधिकरणात हा सोहळा संपन्न संपन्न होणार असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठांचा मानसपुत्र चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी केले आहे.

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव अंतर्गत अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील नवोदित विद्यार्थ्यांचे विधिवत औक्षण करून ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजाता गायकवाड, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक शरद काळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज शिंदे, उदय देशपांडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रधानाचार्य पूनम गुजर, वर्गशिक्षका स्वप्ना झिरंगे, सतीश अवचार यांची उपस्थिती होती. अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम् मधील शिक्षणाचे महत्त्व तसेच गुरुकुलम् मध्ये राबविण्यात येणारे उपक्रम याविषयी माहिती दिली. सुजाता गायकवाड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा विकास सुनियोजित विकास करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संभ्रम करण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिला. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप,…

Read More

केडगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्याच्या काळातील शिक्षण व्यवस्था, जातीयता, विषमता आणि विकासाच्या नावाने रंगवलेले चित्र समाजाच्या हिताचे नाही.जोपर्यंत शेतकऱ्यांची पोरं सत्तेत येत नाही, तोपर्यंत पिळवणूक थांबणार नाही. साहित्यातून समाज मन घडविण्यासाठी लेखणीची तलवार संघर्षासाठी सज्ज ठेवली पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दि.१४ व दि.१५ रोजी दोन दिवशीय आयोजन करण्यात आले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – भोसरी विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ घडवत माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय कल बदलला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित गव्हाणे यांच्यासह एकूण ३७ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट) अधिकृत प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अनेकांच्या विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने भोसरी मतदारसंघात सत्ताधारी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, जनतेच्या कौलात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरच त्यांच्या पुन्हा अजित पवारांच्या गटात येण्याची शक्यता व्यक्त केली जात…

Read More