- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
महानगरपालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे – सह आयुक्त मनोज लोणकर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. कोणत्याही पदावर कार्य केले असले तरी प्रत्येक कर्मचाऱ्याचा अनुभव, त्यांची कार्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव यामुळेच महापालिकेला आज नावलौकिक प्राप्त झाला आहे. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्याचा एक नवा टप्पा आहे. या काळात आपण आपल्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवावा, आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासत आनंदी व समाधानकारक आयुष्य जगावे, असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर…
हिंदूंनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र यावे,अजय बुवा रामदासी महाराज या “तुम्ही-आम्ही सकळ हिंदू, बंधू-बंधू” या विचारानेच जाती-पातीच्या भिंती पाडल्या जातील- मिलिंद महादेव कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)–हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण हेतुपुरस्सर दिले गेले नाही, त्यामुळे स्वधर्माबद्दलचा अभिमान कमी झाला आणि समाज विखुरला असून त्यामुळे हिंदूंनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन सज्जनगडाचे महंत अजय बुवा रामदासी महाराज यांनी हिंदू समाजाला केले.पूर्णानगर आणि शिवतेजनगरच्या पावन भूमीत प्रथमच सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य ‘विराट हिंदू संमेलनाचे’ आयोजन पंडित दीनदाळ उपाध्याय क्रीडा संकुलन,शनी मंदिर मैदान येथे (दि.२९) करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या विराट हिंदू संमेलनाला हजारो हिंदू बांधव व भगिनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. “गांधर्व मंचाला जगभर ओळख आहे; मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,” असे विधान त्यांनी केले. या वक्तव्यानंतर उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप नोंदवत आयुक्तांना प्रश्न विचारले व नाराजी व्यक्त केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान गंधर्व मंच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संतपीठ परिसरात होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त, संत तुकाराम…
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी पंचायत समिती मावळ येथे सर्व विभागांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीत ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे, तसेच वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्राच्या आढाव्यात शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता राखणे, शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक…
तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांच्यासह खासदार, आमदारांची चौकशीची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला कर्जबाजारी करण्यात आली आहे. आर्थिक पत घसरल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रतिष्ठा खालावली आहे. निधी नसल्याने ठेकेदारांची बिले देण्यास विलंब केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महापालिकेस कर्जाच्या खाईत लोटणार्या तसेच, महापालिकेची तिजोरी लुटून रिकामी करणारे तत्कालिन आयुक्त शेखर सिंह, निवृत्त शहर अभियंता मकरंद निकम तसेच, महापालिकेच्या कारभारावर देखरेख ठेवणार्या शहरातील खासदार, आमदारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) नेते सचिन अहिर…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग ) – आर्थिक क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १६ एप्रिल रोजी मुंबई येथे कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित या बैठकीत बँकिंग, विमा व आर्थिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये नोबो (NOBW), ग्रामीण बँक कर्मचारी/अधिकारी संघटना, सहकारी बँक संघटना, एलआयसी, नॅशनल इन्शुरन्स आदी संघटनांचा समावेश होता. बैठकीत भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, जनरल सेक्रटरी किरण मिलगीर, उपाध्यक्ष सुधांशु रानडे यांनी मार्गदर्शन…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )– पुण्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेत ठामपणे आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार हेमंत रासने यांनी दिले. भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने शनिवार पेठेतील विश्वकर्मा भवन येथे आयोजित कार्यक्रमात आमदार रासने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी कामगार क्षेत्रातील विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच कायम सफाई कामगारांच्या घरकुल व मालकी हक्काच्या प्रश्नांवर विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवल्याबद्दल आमदार रासने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बैठकीत…
स्व. श्री फकीरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजोथेरपीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्व. आण्णासाहेब मगर यांनी स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख झाली आहे. या नगरीच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी शहरात सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. स्व. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मधील स्नेह संमेलनातून उद्याचे मोठे कलाकार घडतील असा विश्वास पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला. स्व. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, निगडी येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “अंतर्नाद – २०२६” ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी…
– देशातील नामांकित कंपन्यांकडून निविदा दाखल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड ते राजगुरूनगर खेड दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, कामगार आणि उद्योजक त्रस्त असलेल्या भीषण वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजित नाशिक फाटा ते खेड या ३० किमी लांबीच्या ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२६ मध्ये या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत राबवण्यात येत असून, यासाठी सुमारे ७ हजार ८२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी इंटरप्राईजेस लि., जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. आणि प्रकाश…
थेरगावचा इतिहास ते शिवचरित्र संकलन; बारणे यांची उल्लेखनीय वाटचाल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, कवी व लेखक संभाजी बाळासाहेब बारणे यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे यांची भेट घेत शहराच्या वैभवावर आधारित आपल्या कवितासंग्रहाचे पुस्तक त्यांना भेट दिले. शहराच्या संस्कृती, विकास आणि ओळख यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या या कवितासंग्रहाचे महापौरांनी मनापासून कौतुक केले. यावेळी संभाजी बारणे यांनी सध्या सुरू असलेल्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ५५१ शिवचरित्रांचे संकलन पूर्ण केल्याचे सांगितले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी बारणे यांच्या जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि…
