- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहर परिसरात नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्या सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियोजन करावे, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. गुरुवारी (दि.२६) पीएमआरडीए कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पीएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकास कामांबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. नागरी सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण आहे. त्यामुळे या समस्येकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांसह मिसिंग लिंक, औद्योगिक…
मंगरूळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मंगरूळचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका भाषणात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. लोणीकर यांनी आपल्या भाषणात मतदारांवर उपकाराची भाषा वापरत अहंपणाचा दृष्टिकोन दाखवला, ज्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी लोणीकर यांनी जगाच्या पोशिंदाची माफी मागावी आणि पक्षाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोणीकर यांनी आपल्या भाषणात म्हटले, “येथे बसलेल्या कार्ट्याच्या कुटुंबाला आम्हीच पैसे दिले, तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही दिले, माईचा पगार, बापाची पेन्शन मी दिली. नरेंद्र मोदींनी ६ हजार तुझ्या बापाला पगार दिला, तुझ्या आईला, बहिणीला, बायकोला, लाडक्या बहिणीचे मी…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या विविध राज्यांत आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला डॉक्टरांचा गौरव करणारा “मेडी आयकॉन – भारत इंटरनॅशनल २०२५” पुरस्कार सोहळा वाकड, पुणे येथे अत्यंत भव्यतेने पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया राहतकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिला डॉक्टरांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना समाजातील परिवर्तनाचे शिल्पकार ठरवले. या कार्यक्रमाचे आयोजन “मेडीक्वीन भारत इंटरनॅशनल” या संस्थेने केले होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांनी शुभेच्छा संदेश पाठवून सर्व पुरस्कार्थी डॉक्टरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात विविध राज्यांतील नामवंत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि हरियाणा येथील डॉक्टरांचा समावेश होता. काही…
तळेगाव दाभाडे येथे अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात उलगडला भटके-विमुक्तांचा अनुभवसिद्ध ज्ञानकोश तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भटके-विमुक्त समाज हा भारतातील अनुभवसिद्ध ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्या जीवनशैलीत, श्रमात, भाषांमध्ये, परंपरांमध्ये उपनिषदासारखं सखोल ज्ञान आहे. प्रत्येक जातीचा इतिहास लिहिला तर ज्ञानाची शेकडो उपनिषदे लिहिता येतील,” असे ठाम मत ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित समारंभात प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांनी त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक प्रवासाची प्रकट मुलाखत घेतली. संवादात प्रभुणे यांनी आपल्या कार्याचा आणि अनुभवाचा विस्तृत पट उलगडला. व्यासपीठावर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -:बहुजनांच्या उद्धारासाठी व समाजातील विषमता नष्ट करून समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले असे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचा 9 वा नामकरण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी वरील प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय सचिव एल.एस. कांबळे सर, तसेच बेद मुत्था ( शालेय पोषण आहार वितरक), प्रशांत शर्मा ( प्रबंधक – CSR Fund, CIE India Ltd.), योगेश बाविस्कर ( प्रेसिडेंट – CIE), …
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या साहित्य अकादमी व तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे ‘लोकरंगभूमी आणि अभिजात मराठी’ विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद इंद्रायणी महाविद्यालयाच्या कांतीलाल शहा सभागृहात येत्या २८ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा होणार आहे. या परिसंवादाचे उद्घाटन पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील असणार आहेत. स्वागत साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नायर, तर प्रास्ताविक इंद्रायणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षाच्या कालखंडात भारताच्या वंचित घटकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. भारताचा अमृत काळ – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यासारख्या अनेक गोष्टींवर मोदी सरकारने यशस्वीपणे कार्य केले. मोदी सरकारच्या माध्यमातून देशात घडवून आणलेले ऐतिहासिक बदल, गरिबांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा, तसेच “विकसित भारत” या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारा हा काळ देशासाठी सुवर्णकाळ आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची सेवा ते सूशासन यशस्वी 11 वर्ष या विषयावर आयोजित केलेली विकसित भारत संकल्प सभा प्रभाग क्रमांक 9 नेहरूनगर, इंद्रायणी…
स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींची बैठक घ्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दवाढ, तसेच चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शहर विकास क्षेत्रातील तज्ञांसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले असून, संबंधित भागातील स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ अधिकारी आणि नागरी संघटनांसोबत सविस्तर सल्लामसलत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे व गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांनी सादर केलेल्या अप्रतिम तालरचनेतून आणि बंदिशीतून रसिक चिंब झाले. तर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सादर केलेल्या बंदिशीच्या आविष्काराच्या मंगलदीपाने वातावरण उजळून निघाले. पिंपरी चिंचवड महापालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या बहारदार सोहळ्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. या वर्धापन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात झाले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त पंकज पाटील, निलेश भदाणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील,…
रस्त्यावर पडलेले झाड हटवत वाहतूक केली सुरक्षित पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाची तत्परता
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने मंगळवार (२४ जून) रोजी चिंचवड परिसरातील एका रस्तावर पडलेले झाड हटवत अवघ्या काही वेळात रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे. या मोहिमेदरम्यान एक प्रशिक्षणार्थी जवान किरकोळ जखमी झाला आहे. चिंचवड परिसरात चिंचवड स्टेशनच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास झाड कोसळले होते. त्यामुळे या रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आकुर्डी प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चेन सॉच्या साहाय्याने झाड व्यवस्थित कापून बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. प्रमुख अग्निशामक विमोचक संजय महाडीक यांच्या…
