Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता यामुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या . आम्ही याला कडाडून विरोध दर्शवित त्वरित रद्द करण्याची मागणी केली दि. १९ जून रोजी केली होती आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदीचे दोन्ही निर्णय रद्द करीत असल्याची घोषणा केली हा महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या जनशक्तीचा विजय असल्याचे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, त्रिभाषा धोरणांतर्गत इयत्ता पहिल्यापासूनच तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी शिकवली जाणार आहे. “हिंदीची सक्ती केली जाणार नाही” असे सरकारने यापूर्वी जाहीर…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ‘गझललेखनाचे तंत्र शिकता येते; पण गझलियत ही शिकवून येत नाही!’ असे विचार गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी चिंचवड येथे (शनिवार, दिनांक २८ जून) समिधा गझल मंच, पुणे या संस्थेचे उद्घाटन करताना व्यक्त केले. ज्येष्ठ गझलकार प्राचार्य सतीश देवपूरकर, म. भा. चव्हाण, गझल समीक्षक डाॅ. अविनाश सांगोलेकर आणि समिधा गझल मंच, पुणेचे संस्थापक – अध्यक्ष डाॅ. प्रशांत पाटोळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन आणि गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. डाॅ. प्रशांत पाटोळे यांनी प्रास्ताविकातून, ‘गझल लिहिणारे विपुल कवी असूनही गझललेखनाच्या मंत्रासोबतच गझलियत शिकवणाऱ्या संस्थांची वानवा आहे. त्यामुळे कवी आणि श्रोते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेने १ जुलै २०२५ पासून मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक व्यापक स्वरुपात राबवण्याचे नियोजन केले आहे. वारंवार आवाहन करून तसेच जप्तीची नोटीस देऊन देखील कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कराचा भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास १० टक्के सवलत देण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेने ३० जून २०२५ पर्यंत विविध कर सवलती जाहीर केल्या आहेत. आता…

Read More

माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त रहाटणीतील आनंद बुद्ध विहार येथील तक्षशिला ग्रंथालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यासाठी आमदार शंकर जगताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यापूर्वी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आनंद बुद्ध विहार याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले होते. त्याच ग्रंथालयात या अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले. या अभ्यासिकेसाठी आमदार जगताप यांच्या वतीने ५०० स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आंतरराष्ट्रीय ज्युनियर रोल बॉल विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या, पिंपरी-चिंचवडची कन्या प्रांजल जाधव हिचा पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कासारवाडी येथे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. नैरोबी, केनिया येथे २२ ते २९ जून दरम्यान झालेलया “ज्युनियर रोल बॉल विश्वचषक २०२५” स्पर्धेत भारतीय महिला संघाने जागतिक विजेतेपद पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले असून, या संघाची कर्णधार म्हणून प्रांजल जाधवने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे, या संघाची कर्णधार प्रांजल जाधव ही पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी असून, तिच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने अभिमानाने मान उंचावली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ प्रगतीच केली नाही, तर जागतिक पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान म्हणजे या ११ वर्षांच्या अतुलनीय वाटचालीचा गौरव आहे.” “आज भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडत आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक स्तरावर काम केले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे केवळ एक घोषवाक्य नसून, ते मोदी सरकारच्या कारभाराचे आणि भारताच्या विकासाचे मूलभूत तत्त्व आहे. पुढील काळातही देशाची ही विकासाची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांवर उपाययोजनांची मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटीयन्स आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी. हिंजवडीसह सात गावांचा समावेश आणि चाकण-आळंदी-खेड अशी नवी महापालिका निर्मितीबाबतच्या प्रस्तावावरही निर्णय व्हावा. आयटीयन्सच्या भूमिकेशी आम्ही पूर्णत: सहमत आहोत आणि सोबत आहोत. त्यामुळे आगामी पावसाळी आधिवेशनामध्ये या मुद्यावर राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे. एमआयडीसी, पीएमआरडीए, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख देशभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करणारे हिंजवडी आयटी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘जगात आई आणि बाप ही फक्त दोनच दैवते आहेत!’ असे विचार सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांनी कोकाटे  पिंपळेगुरव येथे (शुक्रवार, दिनांक २७ जून ) व्यक्त केले. महाकवी कालिदासदिनानिमित्त  शब्दधन काव्यमंच आयोजित ‘आई – बाप’ कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल दीक्षित बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि श्री साई नेत्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते गौतम डोळस, उदय ववले यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिल दीक्षित पुढे म्हणाले की, ‘ज्यांच्याकडे काहीही मागायला नवस करावा लागत नाही, अशी आई – बाप ही जगातील फक्त दोनच दैवते आहेत. जेव्हा सगळे जग आपल्या विरोधात जाते, तेव्हा मायबापच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडिआय) पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्यातून मिळणारा वाढता सहभाग लक्षात घेता, स्पर्धेची अंतिम मुदत आता ३० जून २०२५ पर्येंत वाढविण्यात आली आहे. हरित सेतू हा पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, उत्तम पदपथ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन आणि पर्यावरणस्नेही नागरी रचना, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी व एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जागतिक दर्जाचा डिजिटल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळा दिनांक १६ जून रोजीपासून उत्साहात सुरु झाल्या. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुध्दा करण्यात आले. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमातून शालेय व आवश्यक साहित्यांचे वाटप सुरु केले असून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असून शाळांकडून साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येऊन सदर प्रक्रिया जलदपणे राबविण्यात येत आहे. तब्बल १४ दिवसांमध्ये १५ हजार विद्यार्थ्यांना…

Read More