ताज्या घडामोडीपिंपरी

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सादरीकरणासाठीची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवली

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडिआय) पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्यातून मिळणारा वाढता सहभाग लक्षात घेता, स्पर्धेची अंतिम मुदत आता ३० जून २०२५ पर्येंत वाढविण्यात आली आहे.

हरित सेतू हा पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, उत्तम पदपथ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन आणि पर्यावरणस्नेही नागरी रचना, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी व एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जागतिक दर्जाचा डिजिटल प्लॅटफॉर्म

ही स्पर्धा एका जागतिक दर्जाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पार पडत असून, पारदर्शक आणि निष्पक्ष मूल्यांकनासाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत. योग्य परीक्षण, भूमिका आधारित प्रवेश, गुणपद्धती, हितसंबंध व्यवस्थापन, आणि थेट लॉग ट्रॅकिंग यामुळे सहभागींसाठी स्पर्धा अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक ठरत आहे.

स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या परीक्षक मंडळामध्ये डिझाईन, शहरी नियोजन, ब्रँडिंग आणि नागरी संरचना क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी एलिफंट डिझाईनच्या सह-संस्थापक अश्विनी देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेचा निकाल १७ जुलै २०२५ रोजी घोषित केला जाणार आहे.

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेचे नवीन वेळापत्रक

• अंतिम सादरीकरणाची तारीख – ३० जून २०२५ (रात्री ११.५९ पर्यंत)

• निकाल जाहीर – १७ जुलै २०२५

पारितोषिक रक्कम: एकूण ६ लाख रक्कम

(प्रथम – ३ लाख, द्वितीय – २ लाख, तृतीय – १ लाख + विशेष ज्यूरी उल्लेख)

परीक्षक मंडळ:
• अश्विनी देशपांडे (अध्यक्ष) – सह-संस्थापक, एलिफंट डिझाईन

• बापूसाहेब गायकवाड – सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

• आर्किटेक्चर प्रसन्ना देसाई – संचालक, पीव्हीपी आर्किटेक्चर कॉलेज

• कश्मीरा मेधोरा दुबाष – उपसंचालक, आयटीडीपी इंडिया

• चंद्रशेखर बडवे – संचालक, लोकस डिझाईन

• पूर्णिमा बुरटे – संस्थापक, डिझाईन ऑर्ब

• ऋग्वेद देशपांडे – संचालक, सेतू अ‍ॅडव्हर्टायझिंग

• रंजनादेवी दाणी – वरिष्ठ प्राध्यापक, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन

नोंदणी आणि सादरीकरणासाठी संकेतस्थळ:

www.adiawards.org

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button