- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
नैसर्गिक ओढे – नाल्यांचा प्रवाहरोखणाऱ्यांविरोधात नोंदवले गुन्हे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीतील आपत्कालीन पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या तसेच ओढे – नाल्यांवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्या विरोधात पीएमआरडीएने हिंजवडी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंदवले आहे. संबंधित जागा मालक आणि त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांनी संगणमताने ओढे – नाल्यातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेल्या पात्रात अनधिकृतपणे बांधकाम केल्याने त्यांच्यावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ही मोठी कारवाई करण्यात आली. हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे – नाल्यांभोवती अनाधिकृतपणे बांधकाम तसेच पाण्याचा प्रवाह अडवल्यासह परस्पर इतरत्र वळल्याने काही दिवसापूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या अनुषंगाने हिंजवडी येथील नाल्यां लगत / नाल्याच्या पात्रात…
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी खंडोबा माळ चौक पर्यन्त च्या सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असल्याने सदर सेवा रस्ता हा खड्डे मुक्त करण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा महेश काटे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकनगर, तुळजाई वस्ती, बाजाक ऑटो कॉलनी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी हातात घंटा घेऊन रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, झोपलेल्या प्रशासनाचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. घंटेच्या आवाजांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाच्या वेळी केंद्रीय महाविद्यालय मा.प्राचार्य प्रकाश वाघमारे,आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री.आण्णा कुराडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) आणि मध्यस्थी व प्रलंबित प्रकरण व्यवस्थापन समिती (MCPC) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत “Mediation For The Nation” अर्थात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” ही विशेष ९० दिवसांची राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश न्यायालयात प्रलंबित असलेल्या योग्य प्रकरणांचा सामोपचाराद्वारे जलद आणि समाधानकारक निपटारा करणे हा आहे. या मोहिमेंतर्गत तालुका न्यायालयांपासून उच्च न्यायालयांपर्यंत हजारो प्रकरणांवर मध्यस्थीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे. पिंपरी न्यायालयात विशेष आयोजन पिंपरी न्यायालयात या मोहिमेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी न्यायाधीश श्रीमती एस. एस. चव्हाण यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या वाकड परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांच्या आणि आयटी अभियंता वर्गाच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरत आहे. भुजबळ चौक, भूमकर चौक, ताथवडे,पुनावळे या भागांतील रस्त्यांवर तसेच महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असून अपघातांचाही धोका वाढला आहे. या भागातून दररोज हजारो वाहनचालक, आयटी अभियंते स्थानिक नागरिक प्रवास करतात. पण रस्त्यांची ही अवस्था पाहता थोड्या अंतराचा प्रवास करण्यासाठीही नागरिकांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. परिणामी, नागरिकांचा अमूल्य वेळ आणि मानसिक स्वास्थ्याचे गंभीर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्यात आहे. त्याअनुषंगाने शुकवारी (दि.४) दुपारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिली चाचणी धाव घेण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली असून या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे. या २३.३ कि.मी लांबीच्या…
नाशिक महानगरपालिका पथकाने घेतली पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांची व प्रकल्पांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात शहरात विविध विकास कामांचे मॉडेल उभे राहिले आहे. तसेच शहरातील नागरी समस्यांवर दीर्घकालीन आणि समतोल उपाययोजना तयार करण्यात आलेल्या विकास कामाचे मॉडेल जाणून घेण्यासाठी रस्ते रचना व एनएमटी प्रकल्पांसाठी तांत्रिक अनुभव व, विनिमय व अभ्यास या तीन दिवसीय दौऱ्याअंतर्गत नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अभ्यास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींविषयी विधानपरिषदेत आवाज उठवत, भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी या चिंताजनक विषयावर शासनाचे लक्ष वेधले. पुणे शहरासह राज्यातील अनेक भागांत अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असून, सोशल मीडियाच्या अनियंत्रित प्रभावामुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे, असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडले. गोरखे म्हणाले की, गुन्हेगारी रील्स, हिंसक स्टेटस आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या व्हिडिओंमुळे अनेक अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रसिद्धी वाटू लागली आहे. शिक्षण, क्रीडा आणि संस्कार यासाठीचं वय असताना ही मुले चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.” त्यांनी अधोरेखित केलं की, गुन्हेगारीला ‘स्टाईल’ किंवा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माल वाहतूकदार व्यवसायिकांना चुकीच्या पद्धतीने “ई चलन” द्वारे दंडात्मक कारवाई करून त्रास दिला जातो. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मंगळवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक व्यवसायिकांनी स्व इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. याची तीव्रता आज आणखी वाढली असून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील ७५ टक्के व्यावसायिकांनी देखील चक्काजाम आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. ज्याप्रमाणे बस प्रवासी वाहतूकदार व्यवसायिकांना राज्य सरकारने आज जीआर काढून दिलासा दिला आहे, तसा जीआर मालवाहतूक व्यवसायिकांसाठी काढावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSRDC) या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. या कामांना राज्याचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने विशेष प्राधान्य दिले असून, दोन स्वतंत्र भागांमध्ये ही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. हडपसर-यवत सहापदरी महामार्गासाठी ३,१४६.८५ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, या रस्त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक प्रवाहाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत चारपदरी आणि पुढे सहापदरी रस्त्यासाठी ३,१२३.९२ कोटी रुपयांची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNTDA) आरक्षित जागांवर गेल्या ४० ते ५० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क मिळावा यासाठी चिंचवडचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. शासनाने या संदर्भात तातडीने विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. 40 -50 वर्षापासून ताबा , पण मालकी नाही १९७२ साली पिंपरी-चिंचवड परिसरात विविध शेतजमिनी व जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. १९८०–९० च्या दशकात स्थानिक शेतकऱ्यांनी त्या जागांवर गुंठा-दोन गुंठा प्लॉटिंग करून कामगार व अल्प-मध्यमवर्गीय नागरिकांना जागा विकल्या. त्या जागांवर…
