Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतांच्या विवेकाची पताका वाहून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैद्न्यानिक दृष्टीकोन आणि विवेककारणाच्या सहाय्याने व्यापक समाज परिवर्तन करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला” असे उद्गार पैस रंगमंचचे उद्घाते, नाट्य लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रभाकर पवार यांनी काढले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखेच्या 32 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की आषाढी एकादशीस लाखो वारकरी पंढरपूर येथे जाऊन संतांच्या अभांगवाणीचा उदघोष करतात. या उद्घोशांमधून प्रतीत होणारा व अंधश्रद्धांवर केलेल्या प्रहाराचा योग्य अर्थ बुवाबाजीला दूर ठेवण्यासाठीतरी आपल्या जीवनात उतरवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे; अन हेच काम दाभोळकर करत…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संशोधकांसाठी समस्या हिच संधी असते. त्यातूनच इतिहासात आजवर अनेक मोठे अविष्कार घडले व मानवी जीवन सुकर झाले. प्रतिभावान संशोधक केवळ आयआयटी सारख्या संस्थांमध्ये भेटतात ही संकल्पनाही आता कालबाह्य झाली आहे. कारण, भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड ज्ञान आणि प्रतिभा भरलेले संशोधक समोर येत आहेत ज्यांनी मानवासमोरील जटील समस्यांवर संशोधन करून उपाय शोधले आहेत. त्यामुळे, भारताच्या प्रगतीसाठी सामंजस्य करार करायला हवेत, असे मत मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे संचालक (एमएनआयटी) प्रा.डाॅ.एन.पी.पाधी यांनी मांडले. ते एमएनआयटी जयपुर आणि येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामंज्यस्य करार प्रसंगी बोलत होते. यावेळी, एमएनआयटीचे संशोधन व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा (DP) अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही. गोरगरिबांची घरे बाधित होणार नाहीत. देवस्थानच्या जमिनींवर पडलेल्या आरक्षणांची तपासणी करुन रद्द केली जातील, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी आज सभागृहात दिले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नगर रचना विभागाने शहराचा प्रारुप विकास आराखडा दि. 15 मे 2025 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. दि. 14 जुलैपर्यंत हरकती-सूचना मांडता येणार आहेत. या आराखड्यावरुन शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या आक्षेपांसह पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातील भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या भागातील अंडरपासजवळ होत असलेली वाढती वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना आणि सेवा रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाची आढावा बैठक आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील ९.७ किमी लांबीच्या सेवा रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरण व देखभालीच्या कामांची सविस्तर चर्चा होऊन एक वर्षाच्या आत काम पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बैठकीत शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, सेवा रस्ते ही दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असून, त्यांची देखभाल व सुधारणा तातडीने आणि प्राधान्याने करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये…

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील मुळशी व मावळ तालुक्यातील सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करून त्यांचा शाश्वत विकास करण्याच्या मागणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निवेदन सादर केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवेळी खासदार श्रीरंग बारणे हेही उपस्थित होते. या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना संबंधित विषयानुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. आमदार जगताप यांच्यासमवेत वसंत साखरे, प्रकाश…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘जाती अन् धर्म माणसाने निर्मिले आहेत. या चौकटी भेदून माणुसकीची जपणूक सर्वांनी करावी!’ असे विचार ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी न्यू इंग्लिश स्कूल माण, मुळशी येथे व्यक्त केले. वै. मुरलीधर कंक मास्तर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिलासा संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण, मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. आषाढी एकादशीचे निमित्त साधून राधाबाई वाघमारे यांनी संत कान्होपात्रा यांचा ‘येते पंढरीला तुझ्या मी विठ्ठला l सुख दुःख सारे विसरायला ||ʼ हा अभंग सादर केला. प्रसिद्ध लेखक नारायण कुंभार, वेदान्तश्री प्रकाशनचे सुनील उंब्रजकर, न्यू इंग्लिश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘हिंजवडी आयटी पार्क’ला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आता राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. हिंजवडी आयटी पार्क यावर्षी पहिल्याच पावसात अक्षरश: ‘वॉटर पार्क’ झाला. वाहतूक कोंडी, पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव आणि वीज समस्यांमुळे या आयटी पार्कमधील आयटीयन्स आणि विविध कंपन्यांचे अधिकारी अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यामुळे आयटीयन्स आणि सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून ‘अनलॉग हिंजवडी’ असे स्वाक्षरी अभियान राबवले होते. या अभियानाला सुमारे 30 हजार आयटीयन्सनी पाठिंबा…

Read More

‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने प्रेक्षागृह दुमदुमले प्राधिकरण (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशीनिमित्त अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १५ निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात ‘अवघाचि विठ्ठलू’ हा भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक रंगांनी सजलेला अध्यात्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना अभंग व भक्तीगीतांचा सुरेल असा आस्वाद घेता येतो. यंदाही भक्ती-संगीताची ही परंपरा सुरू ठेवण्यात आली. आषाढी एकादशीचा हा उत्सव भक्ती, प्रेम, एकता आणि संस्कृतीचा मनाला भिडणारा अनुभव ठरला. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने प्रेक्षागृह दुमदुमून गेले होते. प्रारंभी सावळ्या विठ्ठलाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी उपमहापौर…

Read More

भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षात सर्वांसोबत उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून विलास मडिगेरी यांची ओळख आहे. वाढदिवस साजरा करताना देखील ते संस्कृती व सामाजिक भान जोपासता. वर्षभर त्यांच्याकडून अखंड २० वर्षांपासून सातत्याने राबविले जाणारे उपक्रमही वाखागण्याजोगे असतात. समाजकारण, राजकारणात नव्याने काम करू पाहणा-या सर्वांनी त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे, असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी काढले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांचा वाढदिवस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबीर, वैद्यकीय तपासणी, वृक्षारोपण, आश्रमशाळेत मुलांना अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित राहून विलास मडिगेरी यांना शुभेच्छा देताना आमदार जगताप बोलत…

Read More

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कुदळवाडी यादवनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी हनुमान मंदिर येथे आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी उपवास फराळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला. स्व. वै. वामन महाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव, कै. गुलाब नथु यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन  दिनेश यादव आणि सौ निशा यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. हा उपक्रम आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच, ईद्रांयणी महिला प्रतिष्ठान आणि दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.  पंढरपूरची वारी मंदिरातच अनुभवली! जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत…

Read More