- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सभापती अभिषेक बारणे यांनी पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘ग’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत थेरगाव बोट क्लब परिसराचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नदीपात्रात साचलेला कचरा, प्रक्रीया न करता सोडले जाणारे सांडपाणी आणि औद्योगिक प्रदुषणामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती समोर आली. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, शेती आणि नदीतील जैवविविधता धोक्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यात नदी स्वच्छ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी येथील विविध प्रकल्पांना भेट देत कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी आयुक्त यांनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासोबतच प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प, हॉटेलमधील सेंद्रिय कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प, बांधकाम व पाडकाम (C&D) कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच बायोमायनिंग साईटचीही पाहणी केली. या भेटीदरम्यान मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी आयुक्तांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. तसेच, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती या विविध टप्प्यांबाबत तांत्रिक माहिती समजावून सांगत प्रकल्पाची कार्यपद्धती, कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय परिणाम यांची सविस्तर माहिती दिली. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती…
रासायनिक पाण्यामुळे नागरिक हैराण; उपाय न झाल्यास विशाल काळभोर जनआंदोलनाचा इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १४, काळभोर नगर परिसरात नाल्यात रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन आणि पर्यावरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रसायनयुक्त पाण्यामुळे सूर्योदय अपार्टमेंट, जय टॉवर तसेच ऐश्वर्यम सोसायटी येथील रहिवाशांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांत जळजळ, खोकला, सर्दी अशा विविध आरोग्य समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी…
पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा, अहिंसा पुरस्कार आणि भक्ती संध्या , भक्ती गीत स्पर्धा अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले . महावीर जन्मकल्याणकच्या दिवशी दि ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता ही रॅली सांगवी येथील संस्कृती लॉन येथून निघून सांगवी ,दापोडी, नाशिक फाटा ,पिंपरी, चिंचवडगाव ,बिजलीनगर या ठिकाणी दुचाकी व चार चाकी रॅलीचा समारोप भगवान पार्श्वनाथ चौक या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीर ची प्रतिमा असलेली पालखी अहिंसा पद यात्रेच्या माध्यमातून…
*पिंपरी चिंचवड महानगरपालिक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल १ कोटी १० लाख ६० हजार ४२१ रुपयांचा झोपडपट्टी सेवाकर वसूल करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत एका आर्थिक वर्षात वसूल केलेला हा सर्वात जास्त सेवाकर आहे. महापालिकेच्या नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही कामगिरी शक्य झाली असून सेवाकर भरणाऱ्या नागरिकांचे महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, स्वातंत्र्यसेनानी तसेच राष्ट्र सेवा दलाचे संस्थापकांपैकी एक असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. राजकारणात सक्रिय राहून समाजकारणाची भक्कम बाजू उभी करणारे एस. एम. जोशी हे आमदार, खासदार तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत होते. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठ राजकारणामुळे ते “अजातशत्रू” म्हणून ओळखले जात होते. कामगार चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संरक्षण साहित्य तयार करणाऱ्या कामगारांपासून ते भांडी बनवणाऱ्या कामगारांपर्यंत विविध संघटनांचे त्यांनी नेतृत्व केले. तसेच एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने लढा दिला. या प्रसंगी कामगार नेते…
महानगरपालिका आयुक्तांनी शहराचा अपमान करणारी बेजबाबदार विधाने टाळावीत – आमदार अमित गोरखे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘पिंपरी चिंचवडला जगात कोण ओळखतं?’ असे केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, गैरजबाबदार आणि शहराच्या अस्मितेला धक्का देणारे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली आहे. देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटलेले महत्त्वाचे केंद्र पिंपरी चिंचवड हे केवळ एक शहर नसून, औद्योगिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटलेले एक महत्त्वाचे केंद्र आहे. पिंपरी चिंचवड हे शहर जागतिक स्तरावर औद्योगिक प्रगतीसाठी ओळखले जाते. टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, बजाज ऑटो…
एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा; ठरले महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाला (एमआयटी-एडीटी) डेटा सायन्स कौन्सिल ऑफ अमेरिका (DASCA) यांचे मानांकन प्राप्त झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या मानांकनासह विविध एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी ‘डास्का’ मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरण्याचा मान ‘एमआयटी-एडीटी’ला मिळाला आहे. हे मानांकन ११ पदवी, ३ पदव्युत्तर तसेच पीएच.डी. स्तरावरील संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान या शाखेतील अभ्यासक्रमांना प्रदान करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एसटी महामंडळ प्रवाशांसाठी “एसटी संगे तीर्थाटन” ही विशेष योजना घेऊन आले आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांनी आपल्या गावातील किमान ४०जणांचा ग्रुप तयार करून देशभरातील कोणत्याही तीर्थक्षेत्रकिंवा पर्यटन स्थळी एसटी बसने प्रवास करता येणार आहे. या योजनेत महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५०टक्के सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफतप्रवास देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेतएसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक फायदाहोणार आहे. सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वल्लभ नगर आगारप्रमुख पल्लवी पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात माहिती देताना आगार…
– कर संकलन विभागाकडून माहिती मिळताच भरणा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन प्रक्रियेतील त्रुटींमुळे भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचा मिळकतकर वेळेत भरला गेला नसल्याची बाब समोर आली होती. मात्र प्रशासनाकडून सूचना मिळताच संबंधित कराची रक्कम निर्धारित वेळेत भरण्यात आल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे. महानगरपालिकेकडून मिळकतकर वसुलीसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून पावत्या वितरित केल्या जातात. याच प्रक्रियेत संबंधित कार्यालयाला कर पावती वेळेत प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे कर भरण्यात विलंब झाला. ३१ मार्च हा कर भरण्याचा अंतिम दिवस असल्याने प्रशासनाने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई करत संपूर्ण थकबाकी भरल्याचे काटे यांनी स्पष्ट…
