- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे. नियम डावलून देण्यात येत आहेत पूर्णत्वाचे दाखले… PMRDA कडून काही मोठ्या गृहप्रकल्पांना कोणतीही शहानिशा न करता, नियमनाचे उल्लंघन करत पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याच्या तक्रारी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत मांडल्या होत्या. त्यावरून १९ जून २०२५ रोजी…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड या संघटनांचे अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेण्यात आली. रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रकाश यशवंते आदी उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना…
जुनी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सरस्वती व व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित…
हिंजवडी वाहतूक समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक: आमदार शंकर जगताप यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून तातडीचे आदेश मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. या गंभीर समस्यांकडे विधानसभेत लक्ष वेधत आमदार शंकर जगताप यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१० जुलै) मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाहतूक, मेट्रो, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत अनेक निर्णायक निर्णय घेण्यात आले. ३० मीटर पर्यायी रस्त्यासाठी आमदार जगताप यांचा आग्रह आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत सविस्तर भूमिका…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘‘सिंगल पॉईंट ऑथॅरिटी’’ तयार केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची भेट घेतली. ही महत्त्वपूर्ण बैठक भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केली होती. यावेळी आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप उपस्थित होते. आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रायझिंग स्टार प्री – स्कूल शाळेतील शिक्षिका राणी मोरे व शाळेतील पालक बबीता मटके यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे,दिशा कॉम्प्युटरच्या काजल वाघमारे प्रेरणा सोनी मॅडम व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला. आई-वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असतात. त्यांचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, माता-पित्यांचा विशेष सन्मान करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे महत्वाचे आहे तसेच गुरुजनांचा…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये १०जुन रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर भाषण, गाणी, कविता आणि योग नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी गुरुवंदना गीत गायले. शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले. शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे यांनी विध्यार्थ्यांना संभोधित करताना आपल्या आयुष्यात गुरूंचे किती महत्व आहे हे पटवून दिले. त्याच बरोबर “गुरु हे तेच असतात जे आज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतात” हा…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आईचे पाद्यपूजन आणि औक्षणाचा भावनिक सोहळा श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन. या शाळेत हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कारक्षम व भावनिक उपक्रम मातृ पूजन शाळेत घेण्यात आले.आई पहिला गुरु या संकल्पनेतून मातृ पूजन मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न झाला. यावेळी शिशुविहार व इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाद्यपूजन व औक्षण करून त्यांच्या त्यागाबद्दल व प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .या प्रसंगी उपस्थित सर्व माता पालकांनी साश्रू नयनांनी आपल्या मुलांना शुभ आशीर्वाद दिले. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा काटकर यांनी गुरु म्हणजे जीवनात दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे.आई हा पहिला गुरु त्याचे महात्म्य…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राचीन भारतीय परंपरेनुसार गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरूंच्या आशीर्वादाने शिष्यांचे कल्याण तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व्यायाम आणि अभ्यासाबरोबरच ध्यान साधनाही महत्त्वाची असते. चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना अभ्यास, व्यायाम आणि त्याचबरोबर ध्यान साधना यांची सांगड घालण्याकरिता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव संचालक विजय जाधव यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने संस्कार मार्गदर्शन वर्ग सुरू केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुपौर्णिमेचे वैशिष्ट्य आणि महत्त्व सदर कार्यक्रमांतर्गत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (१२) अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती डॉ.सुनिल भंडगे, ॲड सतिश गोरडे, रवी नामदे यांनी दिली. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे, पद्मश्री रमेश पतंगे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल उपस्थित…
