Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  हिंजवडी, चाकण, तळेगाव, खेड सह पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगत असणाऱ्या परिसरात वाहतुकीच्या समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या समस्या पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे उद्भवल्या आहेत. ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार मा. राज्यपाल यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीला विश्वासात घेऊन नियमित बैठका घेऊन कामकाज करावे अन्यथा पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल असा इशारा पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी दिला. सोमवारी (दि.१४) चिंचवड येथे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे आणि दिपाली हुलावळे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगाव येथील स्व. बाळासाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेल्या दोन महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीत बंद होता. या समस्येची दखल घेत महावितरण समिती सदस्य व वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे तसेच भारत केसरी पै. विजय गावडे सोशल फाउंडेशन यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तलाव वेळेत सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, क्रीडा उपायुक्त पंकज पाटील यांनी काही तांत्रिक अडचणी सांगत थोडा वेळ मागितला. मधुकर बच्चे यांनी उपोषण थांबवून पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अखेर जलतरण तलाव 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मधुकर बच्चे आणि पै. विजय गावडे यांच्या हस्ते जलपूजन, नारळ फोडून आणि पहिल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिव शाहू फुले आंबेडकर विचार धारेवर काम करणारे.महाराष्ट्र राज्यातील मराठा व बहुजन समाजासाठी करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक भ्याड हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी युवक, मराठा सेवा संघ छावा संघटना,मराठा क्रांती मोर्चा,संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी मागणी केली गेली. यावेळी बोलताना युवकशहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे. नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृतीकरण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिं चे वतीने वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय सेक्टर २५ निगडी प्राधिकरण येथे  १० वी  व १२ वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जेष्ठ लेखक व व्याख्याते विवेकजी वेलणकर व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी, माजी महपौर आर.एस. कुमार, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सलीम शिकलगार, अतुलजी इनामदार,राजेंद्र बाबर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांचा फुलस्केप वह्यांचा सेट व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समजातील काही होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात हातभार लावण्यासाठी शिष्यवृत्ती चे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा समाज विकास विभागाच्याकडे शहरातील १ लाख दिव्यांग यांची माहिती असताना सुद्धा पुन्हा दिव्यांग व्यंक्तीच्या सर्वेक्षणावर दोन कोटीचा खर्च कशासाठी ? तोच खर्च दिव्यांग बांधवांच्या योजना मध्ये वर्ग करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहूल कोल्हटकर यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतात प्रथमच २१ प्रकारच्या मान्यताप्राप्त दिव्यांगत्वासाठी समर्पित आधुनिक पुनर्वसन केंद्राची उभारणी केली. तो खरच अभिमानाचा निर्णय होता. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि दिव्यांग भवन अग्रेसर आहेत त्यातूनच १७ जानेवारी ते…

Read More

हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक! – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची कार्यवाही – भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीमध्ये पहिली आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये संबंधित सर्व शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी होतील, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सिंगल पॉईंट एथॉरिटी हिंजवडीचे प्रश्न मार्गी लावतील, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु केली…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो. पुण्यातील प्रकृती आणि लोकं याबद्दल आपुलकी वाटते. इथे काय आणखी सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते. ते देखील पुण्याकडे लक्ष देतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी केले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतिप्रित्यर्थ २०२५ सालाचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्या डॉ. निवेदिता एकबोटे, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचेअध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजकीय व्यासपीठावर मोठ्या बदलांची नोंद घेत असताना, आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवड महानगरासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करत नेतृत्वाच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी  प्रकाश जरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत शहराच्या राजकारणात अनुभव असलेल्या तसेच कार्यक्षमतेने सिद्ध झालेल्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाचे संघटन बळकट करणे, आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखणे आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे, या हेतूने ही नियुक्ती केली गेली आहे. पक्षाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्या कार्यकर्त्यांमधील जोश वाढवण्यासोबतच, स्थानिक पातळीवर पक्षाची छबी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या 29 वर्षात आरक्षित केलेली आरक्षणे महापालिकेला अद्याप विकसित करता आलेली नाहीत. अनेक आरक्षणे संबंधित शेतकरी मालकांना मोबदला, टीडीआर देऊनही पडून आहेत. १९९५-९६ पासूनची आरक्षणे विकसित झालेली नाहीत. असे असताना आता नव्याने आरक्षणे टाकून गोंधळ वाढवून ठेवला आहे. त्यामुळे पूर्वीची आरक्षणे विकसित केल्यानंतरच नवीन आरक्षणे टाकण्यात यावीत असा सवाल माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. जुन्या विकास आराखड्यातील ८०% जागा ताब्यातच घेतल्या नाहीत : १९९५-९६ च्या विकास आराखड्यानुसार मूळ जागा मालकांकडून २५ रुपये स्क्वेअर फूट ते १५० रुपये स्क्वेअर फूट दराने म्हणजे कमी किमतीत जागा मोबदला दिला. यातील ८० टक्के आरक्षणाच्या…

Read More