- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकरी, कष्टकरी, वंचितांची लढाई यशस्वी लढणारे प्रा. एन.डी.पाटील तसेच कष्टकरी शोषितांचे राज्य यावे यासाठी लढणारे क्रांतिवीर स्वातंत्र्य सेनानी नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ,बांधकाम कामगार समन्वय समिती महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजेश माने, सलीम डांगे भागवत नागपुरे, संदीप कांबळे, संदीप जाधव,अमृत पाटील,शीतल जाधव,रत्नाबाई पोळ,लंका सांगळे,पूजा कोळी,सविता खोकराळे,कविता वागीर,सचिन होमाडे,सुनील काटकर, राजू प्रजापती,कमल गायकवाड आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या लढाईनंतर कामगार,शोषित पीडित, अन्यायग्रस्त जनतेचे नागनाथ अण्णा आधारवड ठरले त्यांनी सहकार चळवळ वाढवली धरणग्रस्त व कोरडवाहू जमिनीच्या पाण्यासाठी संघर्ष केला. हुतात्मा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील क्षेत्राचा प्रारूप सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला होता. उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये सदर प्रारूप सुधारित विकास आराखडा प्रसिदध करून जनतेकडून हरकती/सूचना मागवण्यासाठी शासकीय राजपत्रात व स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.देहू दारूगोळा डेपोच्या २००० यार्ड रेड झोनमधील वैधरीत्या प्राप्त व विकसित मालमतेच्या २०२५ च्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यात समावेशास करण्यात आल्याने मोठ्या हरकत /सूचना प्रभाग क्र. १३ मधून 971 हरकती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये नोंदविल्या गेल्या अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास…
भूसंपादनाची सर्व प्रकरणे ५ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश *पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भूसंपादनाचे अनेक विषय प्रलंबित आहेत. अशी प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी भूसंपादन, भूमिअभिलेख, महानगरपालिका आणि जागेशी संबधित असलेल्या विभागांच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. यामध्ये प्राधान्याने रस्त्यांच्या विषयांचा विचार करून आपसात समन्वय ठेऊन सर्व प्रकरणे येत्या ५ सप्टेंबरपर्यंत मार्गी लावा, असेही आदेश त्यांनी संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांसह विविध विकास प्रकल्पांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासते. यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, भूमी अभिलेख, महानगरपालिका…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अतिक्रमण कारवाईत थेरगाव व रहाटणी येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे १३,३१५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ८ अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. थेरगाव येथील कारवाईमध्ये ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच कारवाई दरम्यान या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निष्कासन कारवाईमध्ये पोकलेन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी महापालिकेने आक्रमक पावले उचलली आहेत. औषध फवारणीपासून ते थेट दंडात्मक कारवाईपर्यंत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तसेच उप आयुक्त सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. घरगुती पातळीपासून औद्योगिक व बांधकाम स्थळांपर्यंत सखोल तपासण्या सुरू असून, यामध्ये डासाच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्वरित कारवाई केली जात आहे. * आठ ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आली कारवाई * घरांची तपासणी: ४ लाख ६० हजारांहून अधिक घरांपैकी सुमारे ८ हजार…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कोणत्याही कार्यात नैतिक आचरण महत्त्वाचे असते! यासाठी आचार आणि विचार शुद्ध असले पाहिजेत!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी काढले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित कविराज उद्घव कानडे आणि डॉ. अशोक शीलवंत स्मृती स्नेहबंध पुरस्कार प्रदान करताना अण्णा हजारे बोलत होते. महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथील प्रभारी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांना स्नेहबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राजू तनवाणी आणि प्रकाश कुंभार यांनाही सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कल्पना शीलवंत, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आई वडिलांमुळे मी घडलो!’ असे कृतज्ञतापूर्वक उद्गार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण बोऱ्हाडे यांना ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी शिर्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, नंदकुमार सातुर्डेकर, डॉ. विश्वास मोरे, अविनाश चिलेकर, संदीप तापकीर, गीतांजली बोऱ्हाडे, अशोकमहाराज गोरे, राधाबाई वाघमारे, मुरलीधर दळवी, दत्ता कांगळे, सुभाष चटणे, डॉ. सीमा काळभोर, शामला पंडित, डॉ. लता पाडेकर, प्रा. विद्यासागर वाघेरे, राजेंद्र गवते, दादाभाऊ गावडे आणि शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधांबाबत राज्य सरकार सर्व संबंधित विभागांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये बैठक घेईल. औद्योगिक क्षेत्रातील वीज, रस्ते, ड्रेनेज, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन याबाबत कालबद्ध नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्राला रस्ते, वीज, ड्रेनेज, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन याबाबत समस्यांचा सामना करावा लागतो. एमआयडीसी आणि महापालिका यांच्यातील अधिकारक्षेत्राच्या विसंवादामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकारात्मक उत्तर दिले. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची…
