- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अलीकडेच पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे, खड्डे तसेच अपुऱ्या निचऱ्यामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिक, वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी तातडीने या परिस्थितीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तात्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. तात्काळ उपाययोजना : शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- समाजवादी विचारवंत माजी गृहमंत्री भाई वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे चिंचवड येथे भाई वैद्य आणि कामगार या विषयावर मार्गदर्शन झाले. भाई वैद्य यांनी मोठ-मोठे पदे भूषवून सुद्धा त्यांच्यातले सामान्यपण कधी गेलेलं नाही, निरपेक्ष भावनेतून उतुंग काम केले भाई वैद्य आणि पिंपरी चिंचवडचे मोठे नाते होते भाई वैद्य एक प्रगल्भ विचार होते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. यावेळी श्रमश्री बाजीराव सातपुते, कामगार कवी प्रभाकर वाघोले, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक सखाराम केदार, राजेश माने, शारदा तांबे, शीतल अनुसे, नौसीन तांबोळी, सुमैय्या पठाण अंबिका घुमटे, शिला सरदार, निलावती पचारे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर कक्षात आज उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी स्थानिक इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिज्ञासेला चालना देण्यासाठी आयोजित या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची ओळख करून देण्यात आली. या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासाची माहिती दिली. औद्योगिक विकास, स्थलांतरित लोकसंख्या, तसेच नियोजनबद्ध नागरीकरणामुळे शहराने कशाप्रकारे प्रगती साधली, याचे त्यांनी सोप्या भाषेत विवेचन केले. महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजना, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सेवा यांचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने संवादात…
पायाभूत सुविधा, स्वच्छता व सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यावर देणार भर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील करदात्यांच्या भक्कम सहकार्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका विविध विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शहरातील नागरिकांनी वेळेत कर भरून आपली जबाबदारी सजगपणे पार पाडली, ही बाब महापालिकेसाठी अत्यंत प्रेरणादायी असून मी सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. महापालिकेला कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे…
अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई; ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे निष्कासन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील वृंदावन कॉलनी, रहाटणी तसेच तापकीर मळा चौक, तापकीर नगर, रहाटणी या परिसरांमध्ये आज अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण अंदाजे ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, त्या अनुषंगाने ही कारवाई राबविण्यात आली. सदर कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तर ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आली. कारवाईदरम्यान उप अभियंता जयवंत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मधील बी.एस्सी. न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स शाखेतील विद्यार्थी अथर्व अविनाश भागवत याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये पुरुष विभागात ८५ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले. अलिगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठ येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पीसीयू क्रीडा संचालक डॉ. विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व भागवत याने हे यश संपादन केले. त्याचे अभिनंदन करताना पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी सांगितले की, पीसीयू मधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम बरोबर क्षेत्रातच क्रीडा क्षेत्रासाठी देखील प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ मध्ये पाणीकर वसुलीत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला आहे. एकूण ८० कोटी ७४ लाख ९ हजार ८१० इतकी पाणीकर वसुली करण्यात आली असून, मागील सर्व वर्षांच्या तुलनेत हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरला आहे. क्षेत्रनिहाय वसुलीमध्येही उल्लेखनीय कामगिरी झाली असून, सांगवी क्षेत्राने ७ कोटी ६५ लाख ७२ हजार २४३ इतकी सर्वाधिक वसुली करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आढावा बैठका, थकीत मिळकतधारकांवर नियमानुसार कारवाई, डिजिटल नोटिसा तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पारदर्शक व सुलभ कार्यपद्धतीमुळे…
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कर संकलन विभागाची ९६१ कोटींची वसुली, ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी भरला कर महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मानले करदात्यांचे आभार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात तब्बल ९६१ कोटींहून अधिक रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेने सलग दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार करत कर वसुलीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ७ लाख ३२ हजार मालमत्ताधारकांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह…
सारस्वतांच्या गौरव सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय – कलारंग अध्यक्ष तथा आमदार अमित गोरखे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कला, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यशील असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील नामांकित ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन’ व ‘परिवर्तन उत्कर्ष’ आघाडीच्या माध्यमातून दैदिप्यमान विजय मिळवून १ एप्रिल रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून व कलारंग संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. हा भव्य ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ येत्या शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात विकासाचे चांगले काम करण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी ठेवावी. चांगल्या कामाला आमचा पाठिंबा आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेला, अस्मितेविषयी कोण बोलत असेल तर तेवढ्याच आक्रमकपणे शिवसेना म्हणून विरोध केला जाईल, असा इशारा महापालिकेतील शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी दिला आहे. आपण चुकला आहात हे आयुक्तांनी मान्य करावे, असेही ते म्हणाले. गटनेते विश्वजित बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली अन् चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या नगरीला लाभला आहे. औद्योगिक, कामगारनगरी म्हणून हे शहर उदयाला…
