- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) अनेक वर्षांपासून भरला गेला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदार मे. सिंग कंपनीने कामगारांची फसवणूक करत त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना शहर संघटक निलेश हाके यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आरोग्य प्रमुख सचिन पवार यांना निवेदन देण्यात आले. कामगारांच्या हक्कासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत PF भरण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे. कंपनीच्या अनामत ठेवीतून कामगारांना तातडीने PF देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू नागरिकांसाठी, कामगारांसाठी १० हजार घरांची निर्मिती करावी, रावेत येथील पात्र लाभार्थी यांना निश्चित किमतीत म्हणजे ६ लाख ९५ हजार रु. किमतीत किवळे गृहप्रकल्पात घरे देण्यात यावीत,लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर घरांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिलाध्यक्ष वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, मनपा सदस्य किरण साडेकर सलीम डांगे,नरसिंग माने,माऊली भोसले, गजानन बाजड, कालिदास गायकवाड,सुनील भोसले, राजेश माने, संभाजी वाघमारे, जरीता वाठारे, तुकाराम माने, सखाराम केदार, अंबादास जावळे,अंजुबाई राठोड, जितेंद्र महाजन,…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडमधील स्वरत रंग क्लासेस मध्ये एक आगळा-वेगळा कार्यक्रम पार पडला. आपल्या संस्कृतीचा वारसा जपत व गुरुशिष्य परंपरेला साजेशी अशी एक अद्वितीय संगीत मैफल विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये क्लासेसचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी एकत्र येत आपले निस्वार्थी गुरु – हार्मोनियम, तबला, बासरी व गायन यांचे शिक्षण देणारे विश्वनाथ झावरे यांना सांगीतिक गुरुदक्षिणा अर्पण केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, बासरी, हार्मोनियम आणि तबला यांच्या संगमातून विविध रचना सादर करून झावरे सरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. दोन तास चाललेल्या या सुरेल मैफिलीत श्रोते संपूर्णपणे तल्लीन झाले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण समिती सदस्य व…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आळंदीत साजरा होत आहे. या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाच्या पावन पर्वावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांचे निमंत्रणाचा स्वीकार करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळा रविवार ( दि.२० ) सायंकाळी पाचचे सुमारास आळंदीत हरिनाम गजरात एक दिवसाचे मुक्कामासाठी प्रवेशनार आहे. या ऐतिहासिक संतभेटीचे साक्षीदार व्हा आणि या अनुपम सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – JEE (Mains) परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन करणाऱ्या कु.सुबोध भगवान भोसले व कु.वेदांत भगवान भोसले या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनावरील माहिती पुस्तिका देऊन भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु.सुबोध भगवान भोसले यांनी JEE (Mains) या परीक्षेत 99.64% (AIR 5580) मिळवून IIT बेंगलोर या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तसेच कु.वेदांत भगवान भोसले यांनी JEE (Mains) या परिषद 99.68%(AIR 4959) व JEE (Advanced) परीक्षेत (AIR 5347) मिळवून IIT हैद्राबाद या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला या विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास, सातत्य व आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टोलनाक्यांच्या अनियमिततेवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोमाटणे आणि वरसोली या दोन टोलनाक्यांमध्ये फक्त ३१ किलोमीटरचे अंतर असून नियमानुसार हे अंतर किमान ६० किलोमीटर असावे लागते. अशा परिस्थितीत हे दोन्ही टोलनाके कायद्यानुसार वैध आहेत का, असा थेट प्रश्न आमदार शेळके यांनी उपस्थित केला. या दोन्ही टोलनाक्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात, टोल वसुली करताना मनमानी केली जाते आणि नागरिकांना वेळेचा व मानसिक त्रास सहन करावा लागतो. आयआरबी कंपनीकडे संपूर्ण रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असूनही रस्त्यांची अवस्था खराब आहे. २०२० ते २०३० या कालावधीसाठी केवळ दोन वर्षांतून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रामराजे जी. भोसले – पाटील यांना पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी, सचिव ॲड. उमेश खंदारे, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी – दाभाडे, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. फारुख शेख, यांनी ॲड. रामराजे भोसले यांच्या कार्यालयात जाऊन हा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ॲड. शंकर घंगाळे, ॲड. विकास शर्मा, ॲड. आसावरी फडके, ॲड. पूजा बदे, ॲड. अजिंक्य लोमटे यांचीही उपस्थिती होती. सत्काराला उत्तर…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कलाकारांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आणि त्यांना वैद्यकीय आधार देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेने पुढाकार घेतला आहे. आज पुण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर येथे रुग्ण हक्क परिषदेच्या ‘कलाकार आघाडी’ शाखेचे थाटात उद्घाटन झाले. या शाखेच्या स्थापनेमुळे सततच्या दौऱ्यांमुळे आणि जागरणामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्या कलाकारांना वैद्यकीय आर्थिक मदत मिळणे सोपे होणार आहे. “ही शाखा कलाकारांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरेल,” असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले. बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावर शाखेच्या नामफलकाचे अनावरण मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहराध्यक्ष अपर्णाताई साठ्ये मारणे, कलाकार…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत चिंचवड मतदारसंघातील वाकड भागातील नागरिकांच्या समस्या थेट आमदारांच्या उपस्थितीत आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत ऐकल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा पुढील टप्पा वाकड येथील प्रभाग क्र. २५ व २६ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वाकडमधील हॉटेल बर्ड व्हॅली येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. उपलब्ध सेवा आणि सुविधा कार्यक्रमामध्ये खालील शासकीय सेवा व समस्या निवारणासाठी नागरिकांना मदत करण्यात येणार आहे: * शासकीय योजना आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन *…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यावर आमदार सुनील शेळके यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाम भूमिका घेत निदर्शने केली. त्यांच्या सोबत आमदार बाबाजी काळे (खेड) व माऊली कटके (शिरूर) यांनी देखील सहभाग घेत रस्त्याच्या डागडुजीसाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. आमदार सुनील शेळके म्हणाले की, या रस्त्यांसाठी सुमारे ३२०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला किमान तीन ते चार महिने लागणार असून काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाईल. या दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईडपट्ट्यांचे मुरमीकरण करणे, आणि अपघात प्रवण ठिकाणी सूचना…
