- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत मा. अप्पर तहसीलदारकार्यालयावर काळ्या फिती लावून शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधेयकाच्या विरोधात घोषणा देत हे विधेयक लोकशाही, वैचारिक स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांसाठी घातक असल्याचे सांगितले. या निदर्शनानंतर मा. तहसीलदार यांना निवेदन सादर करून खालील मागण्याकरण्यात आल्या :- वादग्रस्त आणि असंवैधानिक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ त्वरित मागे घ्यावे. या विधेयकाच्या नावाखाली राजकीय विरोधक, कामगार चळवळी, विद्यार्थी चळवळी, सामाजिक कार्यकर्ते यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न बंद करावा. विधेयकावर व्यापक जनचर्चा आणि सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी. काँग्रेस कमिटीचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यूपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या परंतु निवड न झालेल्या उमेदवारांसाठी “प्रतिभा सेतू” सारखा प्रकल्प राबवावा. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमातीतील धर्मांतरित नागरिकांच्या सवलती बंद कराव्यात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची माहिती देणारा अभ्यासक्रम सीबीएससी च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, पिंपरी चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात त्रुटी असल्यामुळे तो रद्द करावा. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील पोलीस स्टेशनचे आरक्षण रद्द करून तेथे असणारे नियोजित माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक विकसित करावे. राज्य सरकारमधील खेळाडूंना सन्मानपूर्वक बढती मिळावी. तसेच राज्यात इ गव्हर्नन्स द्वारे रिक्त पदे भरून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान करणाऱ्या माथेफिरूला त्वरीत अटक करा अशी मागणी पिंपरी चिंचवड धनगर समाजाने पोलीस आयुक्तालायाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल फेसबुक या सोशल मिडिया माध्यमावर अत्यंत घाणेरड्या प्रकारचे अपशब्द वापरून धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या आमच्या या परमपूज्य मातेचा अपमान करणाऱ्या सुनील गोपाळराव उभे या मुळशी येथील समाजकंटकाला शोधून त्वरीत अटक करावी. त्याच्यावर गंभीरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला कडक शिक्षा करावी. अशी विनंती आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने आपणास या निवेदनाद्वारे करीत आहोत. या गंभीर प्रकरणाची…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सायबर पत्रकारिता करतांना तंत्रज्ञानात होत असलेली स्थित्यंतरे अपरिहार्य असून बदलत्या प्रवाहात तंत्रज्ञानाचा विवेक आणि प्रभावी उपयोग केल्यास शाश्वत मूल्यांना धरुन पत्रकारिता केली जाऊ शकते असा आशावाद ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग, पुणे आयोजित जिल्हास्तर मीडिया संमेलनातील वक्त्यांनी केला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे पिंपरी सेवाकेंद्र आणि माऊंट आबू येथील मीडिया प्रभागामार्फत सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी या विषयावर मीडिया संमेलनाचे आयोजन केले गेले. मीडिया संमेलनाचे उद्घाटन ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू , डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, जेष्ठ संपादक , नाना…
वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘आमदार आपल्या दारी’ या जनसंपर्क उपक्रमांतर्गत वाकड परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. हॉटेल बर्ड व्हॅली येथे झालेल्या या कार्यक्रमात ४८५ नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यावर आमदार शंकर जगताप यांनी जागेवरच निर्णय घेत अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या स्पष्ट सूचना दिल्या. या बैठकीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग सुविधा, वाकड सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन व नदी-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजना, दत्त मंदिर रस्त्यासह प्रभागातीलआठवडे बाजार बंद करणे, अतिक्रमणमुक्त फूटपाथ व तसेच संपूर्ण वाकड परिसरातील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण यावर चर्चा झाली. अंडरपास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली पोलीस स्टेशन येथे मोरेवस्ती परिसरातील हातभट्टी दारू व अनधिकृत हॉटेलमधून चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी चिखली पोलीस स्टेशनला निवेदन दिले.. मोरेवस्ती परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध दारू विक्री ही युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारी ठरत आहे तसेच परिसरातील महिलांना व कुटुंबांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तत्काळ आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. 8 दिवसायच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर स्वराज्य पक्षाच्या वतीने तोडफोड करण्यात येईल आणी याला सर्वस्वी जबाबदार पोलीस…
शिवशक्ती भिमशक्तीचा पिंपरीमध्ये आनंदोत्सव! – शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीचे स्वागत – पिंपरीमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत केला जल्लोष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली आहे. याची घोषणा मुंबईमध्ये झाल्यानंतर राज्यभरामध्ये कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी येथे शुक्रवारी (दि 18 जुलै) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवले. युतीचा जल्लोष केला आणि आगामी महापालिका निवडणुकीत ‘ एक दिलाने’ काम करण्याचा संकल्प सोडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आणि सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ किवळे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तरुणींसाठी एक महत्त्वाकांक्षी कौशल्यविकास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पात्र तरुणींना दोन प्रकारचे मोफत निवासी डिप्लोमा कोर्सेस करण्याची संधी दिली जात असून यामुळे विद्यार्थिनींचे आयुष्य बदलू लागले आहे. हा कोर्स केल्यानंतर तरुणींना मॅन्युफॅक्चरिंग व वाहन उद्योगांमध्ये केवळ रोजगाराची संधीच मिळत नाही, तर त्या आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभा राहत असून हा उपक्रम एकप्रकारे त्यांचे भविष्यच उज्ज्वल करणारा ठरत आहे. कौशल्यविकास उपक्रमांतर्गत ‘डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ हा दहावी नंतर तर ‘डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन’ हा बारावी…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथे तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १९४ मंडळे व शाळांपैकी १०६ मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे कोषाध्यक्ष…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले. फ्लॉवर ग्रोवर कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात पारंपरिक फुलउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाजारपेठेत कृत्रिम फुलांना मिळणाऱ्या वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक फुलउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी त्यांचे उत्पादन खर्च वाढले असून विक्री घटली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत शासनाकडे कृत्रिम फुलांवरील नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. या आंदोलनाला आमदार, मंत्री आणि शेतकरी नेत्यांचा मोठा पाठिंबा लाभला. या वेळी मंत्री भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन करत…
