तंत्रज्ञानाचा विवेकी आणि प्रभावी वापर सायबर पत्रकारितेत आवश्यक -ब्रह्माकुमारीज् आयोजित पुणे मीडिया संमेलनात माध्यम तज्ज्ञांचा आशावाद
सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी विषयावर विचार मंथन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सायबर पत्रकारिता करतांना तंत्रज्ञानात होत असलेली स्थित्यंतरे अपरिहार्य असून बदलत्या प्रवाहात तंत्रज्ञानाचा विवेक आणि प्रभावी उपयोग केल्यास शाश्वत मूल्यांना धरुन पत्रकारिता केली जाऊ शकते असा आशावाद ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग, पुणे आयोजित जिल्हास्तर मीडिया संमेलनातील वक्त्यांनी केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे पिंपरी सेवाकेंद्र आणि माऊंट आबू येथील मीडिया प्रभागामार्फत सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी या विषयावर मीडिया संमेलनाचे आयोजन केले गेले.
मीडिया संमेलनाचे उद्घाटन ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू , डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, जेष्ठ संपादक , नाना कांबळे, संजय चांदेकर, माजी रेडिओ विभाग प्रमुख, तथा एआय शिक्षक, एफ. टी. आय. पुणे, बी.के. सोमनाथ म्हस्के, जिल्हा समन्वयक, मीडिया प्रभाग, पुणे, दत्ता धामनस्कर ज्येष्ठ पत्रकार, पुणे, बी.के. सुरेखादीदी, संचालिका पिंपरी सेवाकेंद्र, बी.के. डॉ. दिपक हरके यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन झाले.
विषय प्रास्ताविक करतांना ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी म्हटले की, जगात सर्व क्षेत्रात नैतीक मूल्यामध्यें होत असलेली घसरण पाहता ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी भरीव कार्य केले आहे. चुकीच्या बातम्या क्षणात सर्वदूर पसरता मात्र सकारात्मक बातम्या लोकांपर्यंत पोहचत नाही याबद्दल चिंता व्यक्त करतांना त्यांनी सायबर युगातील पत्रकारितेची जबाबदारी वाढल्याचे स्पष्ट केले. ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे माध्यमक्षेत्रासाठी होत असलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा त्यांनी या प्रसंगी आढावा घेतला.
सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य आव्हाने आणि संधी या विषयावर बीज भाषण करतांना डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव यांनी पत्रकारितेच्या प्रवाहात तंत्रज्ञानाच्या व्यापारी करणामुळे पत्रकारितेचे सत्य, नि:पक्षता आणि पारदर्शिता हे तत्व हरवत चालले असल्याचे म्हटले. टीआरपीचा पत्रकारांवर पडत असलेल्या दबाव मूल्यनिष्ठ पत्रकारिता करण्यास मुख्य अडसर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाच्या फेक न्यूज, युजर फिडबँक मधील अफारातफर, क्लिक बेट, सायबर पत्रकारितेतील लुप्त पावत असलेल्या मानवी संवेदना, माध्यम साक्षरता, मीडिया आचारसंहिता बरोबर त्यांनी कृतिम बुद्धीमत्ता अर्थात एआयने बनविलेल्या वृत्तपत्रांपर्यंत सायबर पत्रकारितेतील मूल्य, आव्हाने आणि संधी या विषयावर विस्तृत भाष्य केले.
जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारीतेतील स्थित्यंतराचा आढावा घेतांना पत्रकारिता करतांना तुरंगावास भोगलेल्या संपादक आणि स्वातंत्र्यसैनिकांचे उदाहरण दिले. सध्या वृत्तपत्रांच्या झगमगाटात पत्रकरितेचा आत्मा विकला जात असल्याचे प्रतिपादन त्यांनीकेले.
नाना कांबळे, संपादक पवना समाचार, पिंपरी पुणे यांनी सायबर पत्रकारितेमुळे छोटी आणि मध्यम वृत्तपत्रांसमोरील निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. मात्र कालानुरुप तंत्रज्ञानाचे फायदेही त्यांनी विषद केलेत.
संजय चांदेकर, माजी रेडिओ विभाग प्रमुख, तथा एआय शिक्षक, एफ. टी. आय. पुणे यांनी सायबर पत्रकारितेच्या या युगात तंत्रज्ञानाच्या आव्हानावरच स्वार होऊन होऊ घातलेल्या संकटावर मात करण्याबद्दल आपले परखड विचार व्यक्त केलेत.
बी.के. सोमनाथ म्हस्के, जिल्हा समन्वयक, मीडिया प्रभाग, पुणे यांनी स्थानिक क्षेत्रात ब्रह्माकुमारीज् मार्फत होत असलेल्या माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित कार्यक्रम, उपक्रमांचा आढावा घेतला.
दत्ता धामनस्कर ज्येष्ठ पत्रकार, पुणे यांनी नागरीक पत्रकारितेवर आपले समायोचित विचार व्यक्त केले.
तत्पूर्वी प्रभू स्मृती ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. रिया हीने स्वागत नृत्य केले. स्वागत संबोधन – ब्रह्माकुमारी सुरेखादीदीजी, संचालिका, पिंपरी सेवाकेंद्र, यांनी केले. विभाग प्रमुख आणि संघटनांचे अध्यक्ष यांचा सन्मान या प्रसंगी आयोजित केला. बी.के.डॉ. शांतनुभाई यांना ग्लोबल बुक ऑफ इक्सलेन्स, इंग्लड यांचे तर्फे डॉ. दिपक हरके यांनी सर्टिफिकेट ऑफ हॉनर देऊन सन्मान केला, राजयोग अभ्यास मार्गदर्शन बी.के. शितलदीदी यांनी केले .आभार प्रदर्शन ब्र.कु. अनुप भाई, यांनी तर सूत्रसंचलन – ब्र.कु. प्रा. संजय शिंदे, पिंपरी यांनी केले.













