Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांची पुणे जिल्ह्यासाठी नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे, तर पुणे शहराध्यक्षपदी महेश टेळे यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी याठिकाणी नामांकित कुणाल हॉटेलमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांना संबोधित करताना राजा माने म्हणाले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षक चौक येथे सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे नागरिकांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून यामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांबाबत त्वरित उपाययोजना करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, ग्रेड सेपरेटरचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून अपघातांची शक्यता देखील वाढली आहे. विशेषतः शाळा, कार्यालयीन वेळांमध्ये या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. यावर तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग, कार्यक्षम ट्रॅफिक व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी काटे यांनी केली आहे. सदर ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आज नवरोजी वाडिया कॉलेज, पुणे यांचा ९३ वा स्थापना दिवस टाटा असेंब्ली हॉलमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. मिलिंद कांबळे (चेअरमन, डिकी) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे ट्रस्टी डॉ. अशोक चांडक, प्रा. सचिन सानप, कॉलेजचे प्राचार्य प्रा. वसंत चाबुकस्वार, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधानभवनात आज रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांनी ठोस पुढाकार घेत योजनांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा व सूचनांचा पुनरुच्चार केला. २ ते ४ सप्टेंबर २०२१ रोजी समितीने चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यानंतर योजनेच्या प्रगतीवर नजर टाकण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्य अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली, तसेच प्रलंबित योजनांना गती देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीत मंजूर कामांमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत, आमदार शेळके यांनी स्पष्ट…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” – हे ब्रीद वाक्य देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एक प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. हे पुष्पांजली अर्पण शाळेच्या आदरणीय शिक्षिका स्वाती वक्टे व गीतांजली दुबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी भावना रायका, तसेच शिक्षिका मोनिका भाजीभाकरे आणि सारिका देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपुढे मांडली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शहरामध्ये विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून महारक्तदान शिबिर, गोशाळेला चारा वाटप तसेच विविध विधायक कार्यक्रम राबवण्यात आले. दरम्यान, वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरातून भोसरी मतदारसंघातून 753 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा. तसेच, राज्यातील वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध होईल त्या अनुषंगाने महा रक्तदान शिबिर आयोजन करावे. सामाजिक उपक्रम आणि समाजातील शेवटच्या घटकाला मदत होईल असे कार्यक्रम गीत होर्डिंग व जाहिरात भाजी वरती अनावश्यक खर्च करू नये,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे. टाकण्यात आलेली आरक्षणे, रेडझोन हद्द यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला असून याबाबत पक्षाची आणि उद्योग मंत्री म्हणून आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी नागरिकांशी संवाद साधावा अशी मागणी उद्योग मंत्री तथा शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये आपण याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे मात्र तरीही पिंपरी चिंचवड शहरात प्रत्यक्ष संवाद साधून नागरिकांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. उद्योग मंत्री तथा शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांना शिवसेना उपनेत्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या पारंपरिक द्वारयात्रेला यंदा २५ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून ते चतुर्थीपर्यंत, म्हणजे चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक यात्रेची घोषणा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी केली. या द्वारयात्रेची परंपरा अनेक दशकांपासून चालू असून, श्रीमोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून यात्रेला दररोज सकाळी ९ वाजता शुभारंभ होतो. यात्रेच्या सुरुवातीला श्री चिंतामणी महाराज यांच्या समाधीस्थळी धूपारती, नंतर सुमारे १०० ते १५० भाविकांचा वाजतगाजत यात्रेचा समुदाय श्री मंगलमूर्ती वाड्यातून मार्गस्थ होतो. यात्रेदरम्यान चारही दिशांना असलेल्या द्वारदेवींच्या मंदिरांना भेट दिली जाते. प्रत्येक ठिकाणी पूजन,…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) : विज्ञान व अध्यात्माच्या एकत्रीकरणातून नव्या विचारांचा समन्वय होईल, आणि या दोन्हीच्या विचारांचा समन्वय म्हणजे नवा भारत असेल. पंतप्रधान सतत म्हणतात की भारत एक महान व चांगले राष्ट्र होणार आहे. याची सुरूवात ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’तून झाली आहे. भारतीय राजकारणाला बदलावयाचे असेल तर अध्यात्मिक विचार मांडले गेले पाहिजे. येथून निघालेले मंथन हे भारतीय संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे.” असे विचार जागतिक किर्तीचे संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड…

Read More

मोशी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आयोजित महा रक्तदान शिबिरा अंतर्गत मोशीत आयोजित रक्तदान शिबिरास सामाजिक बांधिलकीतून रक्तदात्यांनी रक्तदान उत्साहात प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. या शिबिरात ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करीत शिबिरास प्रतिसाद दिला. मोशी येथील निलेश बोराटे यांच्या कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान श्रेष्ठदान वाचावी गरजू रुग्णांचे प्राण आरोग्य सेवेतील सामाजिक बांधिलकीचे कार्यास भाजपाचे नेते निलेश बोराटे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. रक्तदात्यांना सन्मानपत्र…

Read More