Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑटो-टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत तसेच इतर संघटनांच्या वतीने डॉ. बाबा कांबळे यांनी ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या भांडवलदार कंपन्यांच्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या कंपन्या कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय, मोबाईल ॲप्लिकेशन्सद्वारे बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करत असून, यामुळे सरकारचे हजारो कोटींचे कर बुडत आहेत. याशिवाय, या कंपन्या ऑटो-टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा गंभीर आरोप आहे. उच्च न्यायालयाचे आदेश आणि उबेरला अंतरिम दिलासा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने उबेर कंपनीच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर तात्पुरता दिलासा देताना, या कंपन्यांविरोधातील कथित बेकायदेशीर आणि हिंसक कृतींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात रहाटणीतील आरक्षण क्र. ६५५ मधील सर्वे नं. ४४वर शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तातडीने महापालिकेची प्राथमिक शाळा उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांनी आमदार शंकर जगताप व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील दिलेल्या सदर निवेदनात तांबे यांनी म्हंटले आहे की, रहाटणीतील आरक्षण क्र. ६५५ येथील सर्वे नं. ४४ वर प्राथमिक शाळेचे आरक्षण असून मागील २०-२५ वर्षापूर्वीपासून सदर जागा ही महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी कोणताही विकास झालेला नाही. ज्या ठिकाणी सध्याची महापालिका शाळा आहे. ही शाळा सर्वे नं ४ मध्ये आहे.…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जल शुद्धीकरण केंद्रास अचानक भेट देऊन पाणी पुरवठा सुरळीत आणि योग्य प्रकारे सुरू असल्याची प्रत्यक्ष खातरजमा केली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर हे स्थानी नागरिकांसह भाविक, वारकरी यांना सेवा सुविधा देण्यासाठी सातत्याने विविध उपाय योजना राबवित असतात. या उपक्रमाचा भाग म्हंणून त्यांनी अचानक आळंदी शहरात रात्रीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आळंदी नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्रात भेट देत पाणी पुरवठ्याचे अनुषंगाने जलशुद्धीकरण प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती जानुन घेतली. यावेळी त्यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना पाण्याची गुणवत्ता, नियमितता व वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासह पाण्याचे नमुने घेऊन तपासण्याचे सूचना केल्या. भाविक, वारकरी आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत २००९ मध्ये स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या संस्थेने व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात एक प्रतिष्ठित आणि विद्यार्थी प्रिय एमबीए संस्था म्हणून नाव कमावले आहे. येथून महाराष्ट्रासह देशभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. यूजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे याचा पीसीईटी च्या विश्वस्त मंडळाला सार्थ अभिमान आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न पीएचडी संशोधन केंद्रातून आजपर्यंत ३८ विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे तर ५५ विद्यार्थी हे…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ राष्ट्रवादीचा रोजगार मेळावा “राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तब्बल ४२६ तरुणांना नोकरीची संधी – योगेश बहल यांचा उपक्रम यशस्वी” पिंपरी – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, मा.नगरसेवक अजित गव्हाणे, मा.विरोधी पक्षनेते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात ज्या निवासी किंवा बिगरनिवासी मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे, अशा मालमत्ताधारकांवर महापालिका कठोर कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. शहरात ७ लाख ३१ हजार मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख २६ हजार मालमत्ताधारकांनी चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तसेच, आतापर्यंत एकदाही मालमत्ता कर न भरलेली ३४ हजार २२ इतकी संख्या असून, अशा मालमत्ताधारकांवर महापालिका कठोर कारवाईस सुरुवात करणार असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. महापालिकेने पहिल्या तिमाहीत ५२२ कोटींचे कर वसूल करून विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमता (एआय), ड्रोन सारखे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने महत्त्वाच्या भागीदार संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘भविष्यकालीन तंत्रज्ञानातील कौशल्य संधी – कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान’ या विषयावर निगडी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवाद मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील वाढत्या गरजांसाठी योग्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे विचार संपवू दिले जाणार नाहीत. जनता आजही इथेच आहे. तिच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल, आणि त्यासाठी रस्त्यावर उतरायलाही मागेपुढे पाहू नका,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षकार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष तुषार कामठे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “लाडक्या बहिणीच्या योजनेत सरकारने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखणे ,प्रत्येक वंचित घटकाच्या मदतीसाठी धावून जाणे ही शिवसेनेची खरी ओळख आहे. या माध्यमातून कायमच ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी यांचा आदर राखला आहे. त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करत रस्त्यावर देखील उतरलो. हीच खरी समाजसेवा मानली आणि जपली असे शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या. पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. १३ यमुनानगर येथील जेष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी महिला भगिनी यांचा सत्कार आज (दि.24) करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुलभा उबाळे बोलत होत्या. उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन युवासेना – पुणे जिल्हा (शिरूर लोकसभा) अध्यक्ष अजिंक्य रामभाऊ उबाळे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांची पुणे जिल्ह्यासाठी नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे, तर पुणे शहराध्यक्षपदी महेश टेळे यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी याठिकाणी नामांकित कुणाल हॉटेलमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांना संबोधित करताना राजा माने म्हणाले…

Read More