- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
भारतीय साहित्याचा सांस्कृतिक प्रवाह साहित्य परिषद आणखी विस्तृत करेल – गिरीश प्रभुणे ‘कलारंग’च्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘गौरव सोहळा’ थाटात संपन्न; १०० वे साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये व्हावे – आमदार अमित गोरखे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कला, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित ठरलेल्या पदाधिकाऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ शुक्रवार ०३ एप्रिल रोजी निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. योगेशजी सोमण, प्रमुख कार्यवाह मा. स्वातीताई महाळंक आणि कोषाध्यक्ष मा. श्री. प्रदीप निफाडकर यांचा तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २ मोशी येथील गट क्र. २३० मध्ये ॲमिनिटी स्पेस मध्ये मैदान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे असणार आहेत. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, शंकर जगताप यांची…
पिंपरी,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सुलभ, तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन माध्यमाला मोठी पसंती मिळत असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी यावेळी दिली. गेल्या आर्थिक वर्षात, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ७ लाख ८७ हजार १८४ मालमत्ताधारकांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी ९६१.७४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. यापैकी ५ लाख ११ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी तब्बल ६९७.१९ कोटी रुपयांचा कर ऑनलाईन माध्यमातून भरत डिजिटल सुविधेचा वापर केला. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील दिलासा साहित्य संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे त्यांचा यथोचित सन्मान संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. अशोकमहाराज गोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे आणि अभंग गाथा देऊन करण्यात आला. निमित्त होते कवी प्रा. डॉ.नितीन करडेकर यांच्या ” कनिक’ या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाचे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे आयोजन दिलासा साहित्य संस्थेने केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री आणि बाल साहित्यकार डॉ. संगीता बर्वे, साम टीव्हीचे माजी व्यवस्थापक हनुमंत कुंभार, ज्येष्ठ चित्रकार रमेश नावडकर, दिलासा साहित्य संस्थेचे नारायण कुंभार, प्रकाशक सुनील उंब्रजकर, राधाबाई वाघमारे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील निसर्गरम्य पालवी रिसॉर्ट येथे पिंपरी येथील महात्मा फुले कॉलेज कला विकास विद्यार्थी मंचच्यावतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले. निसर्गाच्या सान्निध्यात भरलेल्या या मेळाव्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटलेल्या मित्रमैत्रिणींनी कॉलेजमधील दिवस, कट्ट्यावरच्या गप्पा, वर्गातील किस्से आणि विविध उपक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला. “कॉलेज सोडून कितीही वर्षे झाली तरी त्या आठवणी मनात कायम ताज्याच राहतात,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यात आजी-माजी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड परिसरात आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत भव्य ‘महा आरोग्य शिबिर’ाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. हे आरोग्य शिबिर नगरसेवक विनोद जयंवत नढे यांच्या जनसंपर्क कार्यालय, पवना चौक, नेहरूनगर, काळेवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमात SMD Multispeciality Hospital तसेच YCM (Yashwantrao Chavan Memorial) Hospital यांचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. शिबिरात नागरिकांना डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन, रक्तदाब (BP), BMI, ECG, ब्लड शुगर (Fasting & PP), HbA1c यांसारख्या तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.…
आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश; पोलीस आयुक्तालयाचा राज्य शासनाकडे अधिकृत प्रस्ताव… नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांचाही याबाबत सकारात्मक पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या काही वर्षांत आयटी हब आणि वेगाने विकसित होणारे नागरी क्षेत्र अशी ओळख निर्माण झालेल्या पिंपळे सौदागर परिसराच्या सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपळे सौदागरसाठी आता स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर होण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, पोलीस आयुक्तालयाने तसा अधिकृत प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. आमदार शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागरकरांची ही अनेक वर्षांची मागणी आता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि युनिट ए – ०५३ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, शौर्य आणि दूरदृष्टी या विषयावर आधारित “दुर्गवेध ३.०” या आंतर महाविद्यालयीन भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद…
पीसीयूमध्ये आयइइइचा शपथविधी संपन्न पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तंत्रज्ञान हे जागतिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. आज जागतिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या टप्प्यावर आहे. एआय, जेनरेटिव एआय आणि एजेंटिक एआय हे एआय चे टप्पे आहेत. एआय हे स्पर्धक नसून सहकार्य करणारे साधन आहे. मात्र एआयचा वापर करताना नैतिकतेला महत्व द्या असे मार्गदर्शन ग्लोबल सीआयओ अँड टेक्नॉलॉजी व्हिजनरीचे आनंद कुमार सिन्हा यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठच्या (पीसीयू) स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे आयइइइचा (आय ट्रिपल इ – IEEE) शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयइइइ एसीएम टीम…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील ‘रुद्रंग’ या संस्थेच्या सहकार्याने रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता भरतमुनी रंगघन सभागृह, कामायनी प्रशाला, चिंतामणी मंदिराशेजारी, निगडी प्राधिकरण येथे अनुसंधान कला संस्था या नूतन नाट्यसंस्थेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि वाशी, नवी मुंबई येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी आमदार अमित गोरखे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, चित्रपट निर्माते गणेश शिंदे आणि रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांची प्रमुख उपस्थिती राहील. उद्घाटन सत्रानंतर ज्येष्ठ रंगकर्मी…
