Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी आपल्या मातीची आठवण घेऊन आलेल्या ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा आज, शनिवारी, अत्यंत भावपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी, परंपरेची वीण आणि संस्कृतीचे धागे घट्ट धरून ठेवणाऱ्या खान्देशी समाजाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथे सप्ता पूजन आणि गहू दळण्याचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याला महिला भगिनी आणि सर्व खान्देशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खान्देशाची आठवण करून देणाऱ्या पारंपरिक वेशभूषेत महिलांनी गहू दळताना कानबाई मातेची भक्तिगीते गायली आणि वातावरण…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या इंटर्नशीप कमिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात रोजगार प्रशिक्षण जनजागृती मोहीम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त सहायक आयुक्त अण्णा बोधडे, संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, डिंपल शहा , प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, डॉं. जयश्री मुळे , डॉ .हर्षिता वाच्छानी , आदी मान्यवर उपस्थितांसमवेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी विविध कंपन्याचे मनुष्यबळ विभागाचे…

Read More

वडगाव मावळ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय मिळाला!” महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यात आज घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे भागातील पाच पिढ्यांपासून वन हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना ३/२ प्रकरणांतर्गत कायदेशीर हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय महसूल विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत, आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमधून शक्य झाला असून, या प्रक्रियेला चालना मिळवून देणारे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, तसेच अनेक मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ या निर्णयप्रक्रियेत सहभागी होते. ठाकर समाजाला हक्काची जमीन शेकडो वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेले ठाकर बांधव वनविभागाच्या…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या १०व्या बॅचचा स्वागत समारंभ अर्थात ‘विद्यारंंभ-२५’ची सुरुवात बुधवार (ता.६ ऑगस्ट) पासून तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमासाठी खास उभारण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद सभा मंडपात’ हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा.अभय करंदीकर व आयआयटी जोधपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.सुरेश गोसावी, अखिल भारतीय दहशतवादविरोधी मोर्चाचे (एआयएटीएफ) चेअरमन मनिंदर जीत सिंग बिट्टा यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील गोशाळेतील गोमातांना चारा वाटप, चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सन्मानीय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड, नव मतदार नोंदणी अभियान, मोफत आधार व मतदान स्मार्ट कार्ड वाटप आणि अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमांचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परीवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिं.चिं.नवनगर विकास…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांना घंटागाडीच्या वेळेत पोहोचणे कठीण होऊन बसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. कुठेही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. आता कचराकुंड्या उचलल्याने कचरा कुठेही अस्ताव्यस्त पडणार नाही, अशी महापालिकेची…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली परिसरात झालेल्या निष्कासन कारवाईमुळे विस्थापित झालेल्या लघुद्योजकांचे पुनर्वसन चिखली येथेच विकसित औद्योगिक पार्कच्या माध्यमातून करण्यात यावे, तसेच त्यांना झालेल्या नुकसानीबाबत भरपाई पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र शासनामार्फत मिळावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाद्वारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ बैठक घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, शिवसेना पुणे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि संघटनेचे संचालक संजय सातव उपस्थित होते. उद्योजकांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लेखा विभागातील एक कर्मचारी लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे महापालिकेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. संबंधित व्हिडिओमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून लेखा विभागात पदोन्नतीने एकाच पदावर कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी हेच या भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्ताकडे निवेदना द्वारे केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत राहिल्याने या कर्मचाऱ्यांचे ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून, कोणतीही देयक फाईल लाच दिल्याशिवाय पुढे सरकत नाही, असा आरोप नागरिकांनी निवेदनाद्वारे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केला आहे. सदर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲड.असोसिएशन वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी मान्यवर वकील बांधव यांनी अण्णा भाऊ यांचे आठवणीना उजाळा दिला. यावेळी माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ , माजी अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, मा. उपाअध्यक्ष- ॲड. प्रतिक जगताप , उपाअध्यक्ष- ॲड . योगेश थांबा, ॲड.बी.के.कांबळे ॲड. शेजवाणी, ॲड. घोलप , ॲड. तोडकर व इतर वकील बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अँड.असोशिएशनचे अध्यक्ष- पांडुरंग शिनगारे व कार्यकारिणी यांनी केले , सूत्रसंचालन ॲड. अरुण खरात ( मामा ) यांनी केले तर ॲड.…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून द्वारकनाथ श्री बाबा रामदेव महाराज यांचा जम्मा जागरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात होम हवन, महाआरती, जन्मवृत्तांत कथा आणि बाबा रामदेवजीचा ब्यावला असे पवित्र धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे हैदराबादचे सुप्रसिद्ध पारंपरिक जम्मा गायक ‘जम्मा सम्राट सुशील गोपाल बजाज’ यांचे सादरीकरण! स्थळ:स्व. शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन, शनि मंदिर मागे, थेरगाव हॉस्पिटलजवळ, थेरगाव येथे होणार आहे, तरी सर्व भाविकांनी आपल्या मित्र-परिवारासह उपस्थित राहावे व पुण्य लाभ घ्यावा. हे…

Read More