- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे सफाई सेवक हे शहराचे खरे हिरो आहेत. अशा सफाई कर्मचाऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘अवकारिका’ या चित्रपटात सफाई सेवकांचे रोजचे वास्तव, त्यांच्या कार्यातील अडचणी, समाजातील अपप्रवृत्तींशी त्यांचा संघर्ष आणि स्वच्छतेसाठीचे समर्पण याचे प्रांजळ आणि प्रभावी चित्रण करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. ‘अवकारिका’ या चित्रपटाचा स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, अंकुश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर देशी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काही भागात विकसित झालेल्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे दिसून येत नव्हती. त्या अनुषंगाने पावसाळ्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे. निगडी प्राधिकरणाप्रमाणेच शहरातील इतर भागातील बीआरटी तसेच अन्य विकसित रस्त्यावर हिरवेगार वृक्ष असावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील ज्या रस्त्यांवर हरित आच्छादनाचे प्रमाण कमी आहे, अशा रस्त्यांना वृक्षारोपण करताना प्राधान्य देण्यात येत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वाय.सी.एम) पदव्युत्तर शिक्षण संस्थेअंतर्गत बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम ६० विद्यार्थी क्षमतेसह सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत मंजूरी मिळाली आहे. रुग्णालयाच्या आवारातील नव्याने बांधलेल्या अकरा मजली इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या व सहाव्या मजल्यावर ही ‘परिचर्या विज्ञान संस्था’ म्हणजेच ‘इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस’ संस्था सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी २०२२ मध्ये बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय स्थापनेबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतर प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला १० मार्च २०२२ रोजी स्थायी समिती आणि ६ एप्रिल २०२२ रोजी सर्वसाधारण सभेकडून मान्यता मिळाली. तर पदव्युत्तर संस्था…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी आपल्या मातीची आठवण घेऊन आलेल्या ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा आज, शनिवारी, अत्यंत भावपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी, परंपरेची वीण आणि संस्कृतीचे धागे घट्ट धरून ठेवणाऱ्या खान्देशी समाजाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथे सप्ता पूजन आणि गहू दळण्याचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याला महिला भगिनी आणि सर्व खान्देशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खान्देशाची आठवण करून देणाऱ्या पारंपरिक वेशभूषेत महिलांनी गहू दळताना कानबाई मातेची भक्तिगीते गायली आणि वातावरण…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या इंटर्नशीप कमिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात रोजगार प्रशिक्षण जनजागृती मोहीम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त सहायक आयुक्त अण्णा बोधडे, संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, डिंपल शहा , प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, डॉं. जयश्री मुळे , डॉ .हर्षिता वाच्छानी , आदी मान्यवर उपस्थितांसमवेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी विविध कंपन्याचे मनुष्यबळ विभागाचे…
वडगाव मावळ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय मिळाला!” महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यात आज घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे भागातील पाच पिढ्यांपासून वन हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना ३/२ प्रकरणांतर्गत कायदेशीर हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय महसूल विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत, आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमधून शक्य झाला असून, या प्रक्रियेला चालना मिळवून देणारे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, तसेच अनेक मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ या निर्णयप्रक्रियेत सहभागी होते. ठाकर समाजाला हक्काची जमीन शेकडो वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेले ठाकर बांधव वनविभागाच्या…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या १०व्या बॅचचा स्वागत समारंभ अर्थात ‘विद्यारंंभ-२५’ची सुरुवात बुधवार (ता.६ ऑगस्ट) पासून तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमासाठी खास उभारण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद सभा मंडपात’ हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा.अभय करंदीकर व आयआयटी जोधपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.सुरेश गोसावी, अखिल भारतीय दहशतवादविरोधी मोर्चाचे (एआयएटीएफ) चेअरमन मनिंदर जीत सिंग बिट्टा यांची प्रमुख उपस्थिती…
भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील गोशाळेतील गोमातांना चारा वाटप, चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सन्मानीय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड, नव मतदार नोंदणी अभियान, मोफत आधार व मतदान स्मार्ट कार्ड वाटप आणि अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमांचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परीवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिं.चिं.नवनगर विकास…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये काम करणार्यांना घंटागाडीच्या वेळेत पोहोचणे कठीण होऊन बसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. कुठेही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या कचर्यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. आता कचराकुंड्या उचलल्याने कचरा कुठेही अस्ताव्यस्त पडणार नाही, अशी महापालिकेची…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली परिसरात झालेल्या निष्कासन कारवाईमुळे विस्थापित झालेल्या लघुद्योजकांचे पुनर्वसन चिखली येथेच विकसित औद्योगिक पार्कच्या माध्यमातून करण्यात यावे, तसेच त्यांना झालेल्या नुकसानीबाबत भरपाई पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र शासनामार्फत मिळावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाद्वारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ बैठक घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, शिवसेना पुणे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि संघटनेचे संचालक संजय सातव उपस्थित होते. उद्योजकांच्या…
