Author: maharashtrabreakingnews.com

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन स्थानिक रहिवाश्यांना मिळणार विविध सोईसुविधा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हा अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र. २३० व २३१ मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स व भिंतींवरील जाहिरातींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स, बॅनर्स, जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व बीट निरीक्षकांना नियमित पाहणी करून असे फलक तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनधिकृत जाहिरातींवर नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे संबंधितांवर थेट कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना संघटनेतील  जे पदाधिकारी पदे घेऊन काम करीत नाहीत. त्यांना पदावर ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. कार्यकारिणी बरखास्त होऊन आताचे पदाधिकारी आजपासून प्रभारी म्हणून काम करतील. पुढील ३० दिवस मतदारसंघातील संघटनेच्या कामाची माहिती घेतली जाईल. चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदांवर कायम ठेवले जाईल. चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. पुणे, मावळचे संपर्कप्रमुख झाल्यानंतर सामंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. पिंपरी,चिंचवड,भोसरी,मावळ विधानसभा मतदारसंघातील  सर्व शिवसेना,महिला आघाडी, युवासेना, युवती सेनेच्या कामाचा आढावा घेतला. थेरगाव येथील मोरया बॅंकेट हॉलमध्ये बैठक पार पडली. शिवसेना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात किती विकास कामे केले, नवीन प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य, स्वच्छता या मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात हे महत्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांपेक्षा मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात देण्यावर भर द्यावा. नागरिकांना पुरेसे, स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. रावेत, निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. त्यामुळे शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात यावे, असे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा आधिकारी प्रविण जैन, उपायुक्त ममता शिंदे,…

Read More

‘पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या महानाटकाचे  पिंपरी – चिंचवड शहरात प्रयोग व्हावेत म्हणून निश्चित मदत करू!’ असे उद्गार उपमहापौर शर्मिला बाबर यांनी (रविवार, दिनांक ०५ एप्रिल) भरतमुनी रंगघन सभागृह, निगडी प्राधिकरण येथे काढले. ‘रुद्रंग’ने आयोजित केलेल्या अनुसंधान कला संस्थेच्या उद्घाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून बाबर बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अ.भा.नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे व नगरसेविका शैलजा मोरे, ‘रुद्रंग’चे अध्यक्ष रमेश वाकनीस आदी मान्यवर उपस्थित होते. अनुसंधानचे उद्घाटन वाशी येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. शिंदे यांनीदेखील या प्रसंगी ‘ताटी उघडा..’चे प्रयोग…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार   शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक व शाश्वत योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून “एक व्यक्ती – एक वृक्ष” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. वाढत्या नागरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना उन्नती सोशल फाउंडेशनचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला असून, शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या संकल्पनेतून पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे संघटनात्मक बळकटीसह कार्यपद्धतीत शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शहरातील विविध प्रभाग, मंडळे आणि विभागांमध्ये कार्यरत असलेल्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना या वेळी अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या नावासह त्याचे पद, संपर्क माहिती आणि संघटनेची ओळख स्पष्टपणे दर्शविणारी ही ओळखपत्रे देण्यात आली. त्यामुळे नागरिकांशी थेट संवाद साधताना आणि विविध…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी आर्थिक स्वरुपात आगाऊ रक्कम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी १५ हजार रुपये सण अग्रिम दिला जाणार  आहे. याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात आगाऊ रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय  स्थायी समिती आणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये अग्रिम अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटप केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा सणासाठी महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना…

Read More

‘शिक्षणाच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘जीवनाचा सकारात्मकतेने विचार केल्याने लेखनात कटूता दिसत नाही, तरीसुद्धा जीवनातील बऱ्या वाईट बाबी साहित्यात आल्या पाहिजेत तरच जीवनातील कठीण प्रसंगी आपण कसा प्रतिसाद दिला हे कळते. जीवन संघर्षावरील उपायच पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असतो.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी शाहीर योगेश रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी काढले. उत्कर्ष प्रकाशन निर्मित आणि श्रीकांत चौगुले लिखित ‘शिक्षणाच्या वाटेवर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. राजा दीक्षित बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डाॅ. न. म. जोशी अध्यक्षस्थानी होते;…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अखेर मोठा दिलासा मिळाला असून, नगरपरिषदेच्या माध्यमातून यशवंत नगर येथे ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात संपन्न झाले. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेच्या सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सत्यकमल कॉलनी, म्हाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंत नगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असून चौराई येथील मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे. स्टेशन भागातील नागरिकांना पाण्यासाठी…

Read More