Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक व सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री तथा पुणे लोकसभेचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. सतीश दत्तात्रय कांबळे यांची “वैद्यकीय सहायता प्रमुख” या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी वैद्यकीय मदतीसाठी कार्यरत असलेले डॉ. कांबळे हे मूळचे पुण्याचे असून “सनराईज मेडिकल फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील हजारो रुग्णांना मोफत उपचार व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. २०१५ साली त्यांच्या बहिणीला चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्यानंतर आलेल्या वैयक्तिक संघर्षाने प्रेरित होऊन त्यांनी आपले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दीड कोटींपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये पुण्याची गनणा होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याची मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे केली आहे. खासदार बारणे यांनी कायदा मंत्री मेघवाल यांची दिल्लीत भेट घेतली. पुण्यात खंडपीठ स्थापन होण्याबाबतची गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीचे सविस्तर निवेदन त्यांना दिले. खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे, पिंपरी-चिंचवडसह लगतच्या अहिल्यानगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. पुणे महानगर क्षेत्राची लोकसंख्या आजमितीला दीड कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. औद्योगिक,…

Read More

“जग बदल घालूनी घाव” या ब्रीदाने प्रेरित होऊन अण्णाभाऊंना अभिवादन! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शोषित, वंचित, पीडित आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लेखणी आणि समाजकार्याच्या माध्यमातून आयुष्यभर लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे करण्यात आले. या कार्यक्रमात रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष ॲड. धम्मराज साळवे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी मंचाचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे, योगेश कांबळे, प्रगती कोपरे, प्रणाली कावरे, अतुल वाघमारे, प्रा. विक्रांत शेळके, अभिषेक चक्रनारायण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अ‍ॅड.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाज परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करत पारंपरिक लोककलांचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नाना कसबे,संजय ससाणे,अरूण जोगदंड,सतिश भवाळ,नितीन घोलप,युवराज दाखले,भगवान भगवान शिंदे,आशाताई शहाणे,केसरताई लांडगे, चंद्रकांत लोंढे ,डी.पी.खंडाळे, आण्णा कसबे,शिवाजी साळवे,विशाल कसबे,शांताराम खुडे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *जगद्गुरू तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,त्यांचे मावळे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या हुबेहूब सादर केलेल्या व्यक्तिरेखा..*…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ती त्वरित नष्ट करणे, डासनाशक फवारणी करणे, अशा मोहिमा व्यापकपणे राबवण्यासोबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास देखील प्राधान्य दिले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी यासोबतच जनजागृती व दंडात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘संकल्प परिवर्तनाचा, ध्यास विकासाचा’ या विचारातून चिंचवड स्टेशन ते निगडीदरम्यान सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे उद्भवणाऱ्या वाहतूक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नागरिकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना देखील अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काही सूचनांचे पत्र युवा नेते विशाल काळभोर यांनी तयार करून पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांना प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले. त्यांनी या सर्व सूचना सकारात्मकतेने ऐकून घेतल्या असून, लवकरच योग्य त्या पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. या पत्रात पुढील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड व पुणे शहरांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या अनधिकृत झाडतोडीच्या विरोधात आम आदमी पार्टीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत जनजागृतीचा नवा संदेश दिला. शहरातील हरित पट्टा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर ‘झाडांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा’ काढून आम आदमी पार्टीने प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. झाडांचे मुखवटे, फाटकी पानं, आणि शवपेटीच्या स्वरूपात झाडे घेऊन शोकसभा आणि मिरवणुकीद्वारे झाडांच्या होत असलेल्या विनाशाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. झाडांची अनधिकृत तोड केवळ हिरवाईचा नाश करत नाही, तर येत्या काळात पुण्यासारख्या शहराला उष्णता, कोरडी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून जाती अंतासाठी जागृती केली!’ असे विचार सेवानिवृत्त साहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रभाकर वंजारी यांनी संत तुकारामनगर, पिंपरी येथे (शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट) व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वंजारी बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, अमीर शेख, रामेश्वर राऊत, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाकर वंजारी पुढे म्हणाले की,’अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक, लोकशाहीर व समाजसुधारक होते. त्यांचे साहित्य भारतातच नव्हे तर रशियातही लोकप्रिय झालेले आहे. जगन्नाथ नेरकर यांनी,…

Read More

माथाडी कामगारांच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी मिळवून देणाऱ्या दोन्ही पतसंस्थांची कार्यक्षमता व विश्वासहर्ता अधोरेखित झाली शिवसेनेचे धोरण कायम कामगार वर्गाच्या हिताचे राहील – शिवसेना उपनेते इरफान सय्यद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे ३ ऑगस्टला मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. आणि रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडली. रायरेश्वर पतसंस्थेचा ३२ वा अहवाल अध्यक्ष सतिश कंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1270 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने खालील आर्थिक प्रगती साधली आहे: वसूल भाग भांडवल: ₹7 कोटी 45 लाख ठेवी: ₹2 कोटी 5 लाख कर्जवाटप: ₹12…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील वंचित आणि शोषित वर्गाचा आवाज बुलंद केला. त्यांच्या शाहिरी आणि लेखनाने सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत,” अशा शब्दांत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. साहित्यरत्न, समाजसुधारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्रिभुवन यांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. तसेच, अण्णाभाऊंच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राम मडके, प्रशांत कुंजीर, ब्रम्हा सूर्यवंशी, रत्नदीप…

Read More