आण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे समाजातील वंचित आणि शोषित वर्गाचा बुलंद आवाज – बाबासाहेब त्रिभुवन
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील वंचित आणि शोषित वर्गाचा आवाज बुलंद केला. त्यांच्या शाहिरी आणि लेखनाने सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत,” अशा शब्दांत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
साहित्यरत्न, समाजसुधारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्रिभुवन यांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. तसेच, अण्णाभाऊंच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राम मडके, प्रशांत कुंजीर, ब्रम्हा सूर्यवंशी, रत्नदीप राजूरकर, बाबासाहेब नांगरे पाटील, संदेश काटे, प्रमोद शिंदे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, त्रिभुवन यांनी निगडी येथील आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊंच्या साहित्य आणि सामाजिक योगदानावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना त्रिभुवन म्हणाले की, आण्णाभाऊंनी साकारलेल्या “फकिरा” कादंबरीतील नायक फकिरा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होता. जो स्वाभिमानाने अन्यायाविरुद्ध बंड करतो. त्यामुळे ही कादंबरी आण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या कार्याला आदरांजली म्हणून समर्पित केले होते. अशीच प्रेरणा भावी पिढीने या दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रातून घेणे काळाची गरज असल्याचे, त्रिभुवन यावेळी म्हणाले.













