Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’चे मुकूट पूजन करण्यात आले. शंभूराजांचे मुकूट दर्शन होताच शिव-शंभूप्रेमींच्या जय शिवाजी…जय शंभुराजे… अशा गर्जना आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर दुमदुमला. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे जगातील सर्वांत उंच ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याग, समर्पण आणि बलिदानाची प्रेरणा असलेल्या या पुतळ्याची उंची १४० फूट असून, चौथऱ्याची उंची ४० फूट आहे. या पुतळ्याच्या मुकूट पुजनासाठी शिव-शंभुप्रेमींनी गर्दी केली होती. तसेच, पुतळ्याच्या परिसरात हंबीरराव मोहिते यांचा १० फूट उंच पुतळा, १६ सरदार आणि मावळ्यांचे पुतळे,…

Read More

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘विद्यारंभ-२५’ला प्रारंभ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकविसाव्या शतकात शिक्षणाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. शिक्षण आता केवळ विद्यापीठे, प्रयोगशाळा, पदवी घेण्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे एक साधन बनले आहे. त्यामुळे, विकसित भारत@२०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रात राष्ट्रासमोर असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. धाडसी विचारांनीच भारत देश घडला असून, विद्यार्थ्यांनीही सर्वोत्तम देत आपल्या क्षेत्रात असणाऱ्या समस्यांना सोडविण्याचे धाडस दाखवावे, असे मत भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. डाॅ.अभय करंदीकर यांनी व्यक्त केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या विद्यारंभ-२५ कार्यक्रमात…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी शनाया सोनवणे हिने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून शाळेचा मान उंचावला आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर शनायाने ही कामगिरी साध्य केली. या यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “शनायाची ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”शाळेच्या कॉर्डिनेटर श्वेता कांत यांनीही शुभेच्छा देत सांगितले की, “क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त हे यशाचे गमक आहे. शनायाने ते सिद्ध केले आहे.” तसेच शाळेच्या क्रीडाशिक्षिका कार्तिकला गायकवाड मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शनायाला मिळाले.शाळेच्या सर्व शिक्षकांनी शनायाचे कौतुक करत तिच्या पुढील स्पर्धांसाठी…

Read More

महाराष्ट्रातील सर्वोत्तम ब्रेन-स्टेम-डेथ (बीएसडी) टीम म्हणून गौरव या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट रुग्णालय मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘बेस्ट बीएसडी पुरस्कार’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ‘सर्वोत्तम ब्रेन-स्टेम-डेथ (BSD) टीम’ म्हणून रुग्णालयाचा गौरव करण्यात आला. भारतीय अवयवदान दिनानिमित्त प्रादेशिक सह राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना (ROTTO-SOTTO) (पश्चिम विभाग व महाराष्ट्र) यांनी आयोजित केलेल्या विशेष सत्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री श्री. प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२५ निमित्त भारत सरकारच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ हे जनजागृती अभियान संपूर्ण देशभर राबवले जात आहे. या अभियानात पिंपरी चिंचवड महापालिकेचाही सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे व स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करणे हा आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, यासाठी महापालिकेच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मोफत तिरंगा वितरित करण्यात यावा. सदर उपक्रमासाठी तात्काळ आवश्यक नियोजन करून, सर्व प्रभाग कार्यालयांमार्फत मोफत तिरंगा वाटपाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वर्षभर वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. आज केलेले पर्यावरण रक्षण म्हणजे उद्याच्या पिढिसाठी ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे निसर्गाशी आदराने वागा, आपल्या कुटुंबाप्रमाणे निसर्गावर प्रेम करा, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. गुणवंत कामगार कल्याण मंडळ, मराठवाडा जनविकास संघ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सनफ्लॉवर पब्लिक स्कूल मारुंजी यांच्या संयुक्तपणे सनफ्लॉवर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात १०० देशी फळझाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रविराज इळवे बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त अरूण पवार, डॉ. भारतीताई चव्हाण,…

Read More

– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच रेड झोनमध्ये येणाऱ्या मिळकतधारकांना मालमत्ता करात ५०% सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहरातील हजारो प्रामाणिक कर भरणाऱ्या सोसायटीधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देत ठाम मागणी केली आहे की, “सवलत द्यायचीच असेल, तर शहरातील हजारो सोसायटीधारकांनाही ती दिली गेली पाहिजे. अन्यथा हे निर्णय प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणारे ठरतील.” फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, सोसायट्यांना आजही मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत, नियमित पाणीपुरवठ्याऐवजी टँकरवर अवलंबून रहावे लागते. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे;…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या पर्यावरण क्षेत्रातील स्थितीचा सखोल मागोवा घेणारा “पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल सन २०२४-२५” चे आज पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते स्थायी समितीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. या अहवालात मागील तीन वर्षांचा तुलनात्मक आढावा घेत शहरातील पर्यावरणविषयक स्थितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. क्षेत्र आणि लोकसंख्या, हवामानातील बदल, पर्जन्यमान, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची सद्यस्थिती, जलनि:स्सारण योजना व मैलाशुद्धीकरण प्रकल्प, हवेतील व ध्वनी प्रदूषणाचे स्तर, मृदा गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापर, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्याने, उद्योगधंदे, आपत्ती व्यवस्थापन, शहर नुतनीकरण योजना आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत पिंपरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संरक्षित क्षेत्रातील मालमत्तांना सामान्य करातील सवलत देणे, वैद्यकीय विभागासाठी इंटेन्सव्हिस्ट संवर्गातील पदे ११ महिन्याच्या कालावधी करिता कंत्राटी पद्धतीने भरणे, महापालिका रुग्णालयात कार्डीयाक डोल्पर /…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संघर्ष योद्धा जरांगे पाटील ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्त ३ ऑगस्ट 2025 रोजी पुणे शिवाजीनगर येते रक्तदान शिबीर आयोजित केले होते मार्गदर्शन कार्यवाहक निलेश पिसाळ , प्रबंधक देव मोरे , मनीषा वंजारे त्याच्या मार्गदर्शनाने पुण्यात रक्तदान शिबीर घेतले होते.खुप छान प्रतिसाद मिळाला.रक्तदान शिबिर हे पुणे शहर भागातील आपल्या मराठा बांधवांनी खूप जास्तीत जास्त छान असा प्रतिसाद दिला या मुळे ३४ रक्त बॅग संकलन करण्यात आल्या. या रक्त बॅग गरजू रुग्णांना दिल्या जातील, रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तविरांचे तसेच ज्ञात अज्ञात सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. रक्तदान शिबीर आयोजनासाठी WMO पुणे प्रमुख प्रबंधक धनंजय शेवाळे, अनिकेत जरे ,…

Read More