- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रशासन आणि लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुदळवाडी शाळा आहे. या शाळेची ‘टेक्नोसेव्ही’ शाळा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या प्रत्येक शाळेला डिजिटल बनवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पब्लिक स्कूल, कुदळवाडी क्र. ८९ या डिजिटल शाळेमध्ये ‘प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड’ या उपक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावे, तसेच पूर्वी बाजारपेठे मध्ये दुचाकीवरील मार्शल राऊंड मारून पोलीस पहारा देत होते, ते पुन्हा सुरू करावे. पिंपरी मंडई जवळ पोलीस चौकी आहे. तेथे असणारा लँडलाईन फोन मागील पाच वर्षांपासून बंद आहे, तो ताबडतोब सुरू करावा. एखादी दुर्घटना, चोरी, मारामारी, पाकीटमारी, अपघात अशा घटना घडल्या की संपर्क करणे सोपे होते. यापूर्वी या पोलीस चौकीमध्ये देखील तक्रार नोंद करून घेतली जात होती ते आता होत नाही. बाजारपेठेपासून पिंपरी पोलीस स्टेशन हे पुणे मुंबई महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर लांब आहे. तेथे तक्रार नोंद करायला गेलो की तेथील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच शहरासाठी सुधारित प्रारुप विकास आराखडा सादर केला आहे. या आराखड्या विरोधात तब्बल पन्नास हजार हरकती नागरिकांनी घेतल्या आहेत. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमतता आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महापालिकेवर महामोर्चा काढण्यात आला. या विरोधातील निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त शेखर सिंह पालिका प्रशासकीय इमारतीत उपस्थित नसल्यामुळे विधानसभा व सभापतींना पालिकेच्या पायऱ्यांवर बसावे लागले. दरम्यान शिष्टमंडळ आयुक्तांना निवेदन देणारा आहेत हे माहीत असताना सुद्धा आयुक्त जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. त्यांच्या या वागणुकीबद्दल थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. आणि डीपी प्लॅन विरोधातील निवेदन आता मुख्यमंत्र्यांकडेच देणार असल्याचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चाचे उद्दिष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मांडणे आणि डीपी रद्द करण्याची मागणी करणे हे होते. तथापि, या मोर्चामध्ये स्थानिक नेतृत्वाने केवळ स्वतःचे वैयक्तिक हित साधण्यासाठी आणि राजकीय प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप कष्टकरी जनता आघाडीचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील डीपी रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी दीर्घकाळापासून प्रयत्न केले असून, यासंदर्भात कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्यासह अनेक संघटनांनी महानगरपालिकेकडे हरकती…
नवी सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे देखरेखीखाली ठेवून त्यावर सातत्याने पाठपुरावा करावा, प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास शहरातील प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन नवी सांगवी येथे गुरुवार (दि. ७ ऑगस्ट) रोजी सकाळी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार जगताप म्हणाले की, “महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्य, वाहतूक, ड्रेनेज अशा समस्यांचे गांभीर्याने देखरेख करावी आणि त्यावर वेळोवेळी पाठपुरावा करत अडचणींचा ठोस उपाय शोधावा. आमदार म्हणून आम्ही आमच्या पातळीवर हा पाठपुरावा करत असतो. मात्र प्रशासन आणि पदाधिकारी एकत्रितपणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथे चिंचवड पोलीस चौकीचे शिवाजी कडलक यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कडलक यांचे शिक्षक प्राध्यापक शहाजी माने, निवृत्त प्राचार्य संपतराव जगताप, सरस्वती पेट्रोल पंपाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काटे, लक्ष्मण पाटील, एकनाथराव नवले, विलास पावडे,अनिल गबाट आदी उपस्थित होते.
मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करुन डीपीआर लवकर पूर्ण करावा. हा प्रकल्प मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि प्रवाशांना सुलभ करणारा ठरणारा आहे. दोन्ही शहरांमधील वाढती वाहतूक आणि रेल्वेवरचा ताण लक्षात घेता, फास्ट ट्रॅक सेवा ही काळाची गरज आहे. तसेच पुणे-लोणावळा ते पुणे ही दुपारी दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. दीड वाजताची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि वेगाने प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीमुळे पिंपरी चिंचवड विद्यापीठ वेगाने प्रगती करीत आहे.पीसीयू आणि यूजीसी करारामुळे फॅकल्टी डेव्हलपमेंट आणि बहुविषयक शिक्षणाला निश्चित चालना मिळेल असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे – एचआरडीसी संचालक डॉ. राजेश कुमार दुबे यांनी व्यक्त केला.तसेच विकासाचा टप्पा साध्य करण्यासाठी इतर विद्यापीठांना वीस वर्षे लागली तो टप्पा पीसीयू विद्यापीठाने अवघ्या दोन वर्षात गाठला आहे असे गौरवोद्गार डॉ. दुबे यांनी काढले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी), मानवी संसाधन विकास केंद्र (एचआरडीसी) यांच्या मध्ये सोमवारी (दि. ४) सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर पीसीईटीचे…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — महाराष्ट्र विधानभवन येथे रोजगार हमी योजना समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, ६ ऑगस्ट रोजी समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनरेगा योजनेंतर्गत सुधारणा, पायलट प्रकल्प आणि ग्रामीण मजुरांच्या हितासाठी ठोस उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत २१ ते २३ एप्रिल २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या दौऱ्याचा आढावा घेण्यात आला. विभागीय सचिवांकडून साक्ष घेण्यात आली आणि अनुपालन अहवालावर विचारमंथन करण्यात आले. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी नव्या उपक्रमांवर भर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनरेगा जॉब कार्डधारकांना मिळणाऱ्या वेतनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा स्वातंत्र्यदिन केवळ एक राष्ट्रीय सण म्हणून नव्हे, तर भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत आगामी कार्यक्रमांची सविस्तर आखणी करण्यात आली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्णपणे यशस्वी झाले आहे. दहशतवादी शक्तींना धडा शिकवल्याबद्दल भारतीय लष्कराचा गौरव करण्यासाठी हा विजयोत्सव साजरा करणार आहोत.” पंतप्रधान मोदींनी संसदेत दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत, हा विजयोत्सव साजरा…
