- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाच्या निमित्ताने चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी डॉक्टर, अत्यावश्यक सेवा कर्मचारी तसेच बस ड्रायव्हर यांच्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधून भावाने तिचे रक्षण करण्याची ग्वाही देण्याची ही परंपरा विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरी केली. मुलींनी रक्षाबंधना साठी राख्या ह्या स्वतःहा बनवलेल्या होत्या. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक संदीप काटे यांनी मार्गदर्शन करत रक्षाबंधनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भाष्य केले. आणि आज आपल्या मुलींनी डॉक्टर, अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि बस ड्रायव्हर यांच्यासोबत राखी बांधून समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करण्याचा आदर्श घालून दिला आहे. राखी ही फक्त दोरा नाही, तर ती…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चालवण्यात येणाऱ्या नेहरूनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारातील लहान मृत प्राण्यांची शवदाहिनी (इन्टर्नेट) येथे विद्युत विभागाच्या वतीने देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाजासाठी पुढील तीन दिवस (९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट) बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने शववाहिनीची ही कामे महत्त्वाची असतात. प्राण्यांच्या शववाहिनीच्या दरवाजाच्या दुरुस्तीसाठी पुढील काही दिवस दुरुस्तीविषयक कामकाजासाठी बंद राहणार आहे. ११ ऑगस्ट पर्यंत विद्युत विषयक कामे पूर्ण होताच शववाहिनी पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. तो पर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशु वैद्यकीय विभागाच्या विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन दिवस पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन विभागासाठी खास ठरला आहे. यावर्षी अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील जवानांना, चिखली येथील इनोव्हेशन वर्ल्ड स्कूल या शाळेच्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. अग्निशमन केंद्राच्या मुख्यालयात आयोजित या विशेष उपक्रमात शाळेच्या ४ ते ८ वयोगटातील सुमारे २० चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यावेळी “ये रक्षाबंधन सबसे बडा त्योहार है” हे गाणं म्हणत, जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या छोट्याशा हृदयस्पर्शी उपक्रमामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले. मुलांमध्ये समाजासाठी कार्य करणाऱ्यांविषयी आदराची भावना लहानपणापासून रुजावी, या उद्देशाने या उपक्रमाची कल्पना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड ॲड. असोसिएशनच्या वतीने विधी व न्याय विभागास केलेल्या पाठपुराव्याला यश व पुढील पिंपरी चिंचवड न्यायालयीन कामासाठी मंत्रालयात बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामध्ये ज्यांची मोलाची कामगिरी राहिली अशा श्रीमती. सुवर्णा किशोर केवले मॅडम ( प्रधान सचिव व विधी परमर्षि ) विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य यांना ॲड. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून आभार व्यक्त केले व सत्कार करण्यात आला. अतिरिक्त दोन सत्र न्यायालय व दोन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सद्याच्या नेहरूनगर न्यायालयामध्ये रिक्त असलेल्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवडगाव येथे ३०० अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. या पुण्यस्मरण अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक सोमनाथ काळभोर यांनी केले होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य आणि समाजसेवक उपस्थित होते. अन्नदान करताना रसिका विलास काळभोर, संभाजी काळभोर, सुभाष मांडेकर, गणेश घुले, सुरेखा जाधव, सारिका मांडेकर, सिद्धी घुले, शितल काळभोर, ऋतुराज काळभोर, महेश व्यवहारे, निखिल दळवी, निलेश जयस्वाल आणि अमोल पुन्नासे यांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि सेवाभाव प्रकर्षाने जाणवला. कै. विलास काळभोर यांची समाजासाठी केलेली सेवा आणि योगदान आजही प्रेरणादायी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सण आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरांजनाने भावाला ओवाळण्याचा’ या उक्तीप्रमाणे जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, ज्युनिअर कॉलेज आणि लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलमधील विद्यार्थ्यांनी विविध कल्पना वापरून वैविध्यपूर्ण राख्या बनविल्या. या राख्या प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रीती पाटील, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पहिली ते दहावी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या महा मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना आता जीवघेणा अनुभव येत आहे. भक्ती-शक्ती चौक, निगडी ते चिंचवड स्टेशन चौक या मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठे खड्डे, धूळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महामेट्रोच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून, माजी नगरसेवक विजय शिंदे यांनी मेट्रो आणि पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष चिंचवड स्टेशन ते निगडी आणि निगडी- आकुर्डी- चिंचवड स्टेशन रस्त्यांची पाहणी केली. तसेच, प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या गंभीर प्रश्नावर आता माजी नगरसेवक विजय…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध उपाय योजनांवर भर दिल्या जात आहे. या भागात नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत असून यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागातील शेतकऱ्यांशी औंध कार्यालयात संवाद साधला. भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकारांचा प्रथम विचार करून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार असल्याचे यावेळी…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आबिटकर यांनी यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश दिले असून, संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. *आमदार सुनील शेळके यांचा ठाम पाठपुरावा: मावळसाठी ठोस निर्णय* या बैठकीत आमदार सुनील शेळके…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील प्रदेश व जिल्हा पदाधिकारी व नगरसेवक यांची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गेल्या दोन महिन्यात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी घेतला.शत्रुघ्न काटे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यशस्वी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. पक्षाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्या बरोबरच त्यांचे संघटनेत मोठे सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे कारण गेल्या चार दिवसात जिल्हा समिती गठीत करण्यासाठी त्यांनी तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या समक्ष मुलाखती घेतल्या व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे काल झालेल्या बैठकीत त्यांनी लाभाची पदे घेणाऱ्या पण संघटनेच्या कामात न येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कान…
