दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदानाचे आयोजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवडगाव येथे ३०० अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. या पुण्यस्मरण अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक सोमनाथ काळभोर यांनी केले होते.
या प्रसंगी त्यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य आणि समाजसेवक उपस्थित होते. अन्नदान करताना रसिका विलास काळभोर, संभाजी काळभोर, सुभाष मांडेकर, गणेश घुले, सुरेखा जाधव, सारिका मांडेकर, सिद्धी घुले, शितल काळभोर, ऋतुराज काळभोर, महेश व्यवहारे, निखिल दळवी, निलेश जयस्वाल आणि अमोल पुन्नासे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि सेवाभाव प्रकर्षाने जाणवला. कै. विलास काळभोर यांची समाजासाठी केलेली सेवा आणि योगदान आजही प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेतलेली ही सामाजिक जबाबदारी निश्चितच अनुकरणीय आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.













