- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी अस्तित्व आणि आत्मसन्मानासाठी ट्रायबल फोरम, पुणे ही कॅडरबेस संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. या ट्रायबल फोरम मध्ये सहभागी होऊन निस्वार्थीपणे समाजासाठी समर्पित होऊन काम करणारे एकनाथ तळपे यांची ट्रायबल फोरम च्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी आणि कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय गवारी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. ट्रायबल फोरम चे रोहित सुपे, खेड तालुका अध्यक्ष तानाजी भोकटे, खेड बाजार समिती माजी उपसभापती विठ्ठल उनघरे, माजी नगरसेवक राहूल आढारी, बाजार समिती संचालक सुधिर भोमाळे, युवानेता संतोष भांगे यांनी नूतन अध्यक्ष…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांना त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवता यावा, यासाठी महापालिका गेल्या काही वर्षांपासून उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये पुनावळे येथील नव्या रस्त्यांसाठी, चऱ्होलीतील सुधारीत पादचारी मार्गांसाठी निधी देण्यापासून ते रावेतमधील नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आता अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये देखील नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना १५ ऑगस्ट २०२५ पासून त्यांच्या सूचना देता येणार आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आठ प्रभागांतून २ हजार २७९ नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. छाननीनंतर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा, राज्यसभा खासदारांच्या गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविणाऱ्या दिल्लीतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या काॅन्सिटय़ूशन क्लबच्या निवडणुकीत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे विजयी झाले. महाराष्ट्रातून बारणे हे एकमेव उमेदवार होते. ते विजयी झाले. सर्वपक्षीयांशी असलेल्या संबंधांचा बारणे यांना या राजकारण, पक्षविरहित असलेल्या निवडणुकीत फायदा झाला. लोकसभा, राज्यसभेच्या आजी-माजी खासदारांसाठी काॅन्सिटय़ूशन क्लब हा अधिकृत क्लब आहे. लोकसभेचे अध्यक्ष त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या क्लबवर भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांचे वर्चस्व आहे. सर्व पक्षातील खासदारांशी उत्तम संपर्क असलेलाच उमेदवार या निवडणुकीत निवडून येतो. कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या 2025 निवडणुकीत कार्यकारी सदस्यांच्या निवडणुकीसाठी 12 ऑगस्ट रोजी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशसेवा, मानवसेवा आणि संकटसमयी जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या वीरांचा गौरव करण्यासाठी “के ई फायर अँड सेफ्टी” या १९९८ पासून कार्यरत अग्रगण्य संस्थेद्वारे प्रतिष्ठित “सेफ इंडिया हिरो प्लस” पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुंबईतील ऐतिहासिक हॉटेल ताज येथे १३ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. हा पुरस्कार देशातील उत्कृष्ट अग्निशामक, बचावकर्ते आणि संकटसमयी धाडसी कार्य करणाऱ्या अग्निशमन कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दिला जातो. या वर्षीच्या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील फायरमन दिनेश देविदास इंगळकर, मोशी अग्निशामक केंद्राचे वाहनचालक शांताराम पांडुरंग घारे, मुख्य अग्निशमन केंद्राचे लिडिंग फायरमन, हनुमंत धोंडीबा होले, फायरमन संतोष मधुकर सरोटे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाविद्यालयात शिकत असताना उत्तम करियर करण्याची स्वप्नं सर्व युवक, युवती पाहतात, मात्र ही स्वप्नपूर्ती होण्यासाठी प्रथम सर्वांनी आरोग्य जपले पाहिजे. आरोग्य म्हटले की शरीराचा, मनाचा, आत्म्याचा विचार मनात येतो. तसेच सामाजिक आरोग्य, भावनिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन डॉ. सुप्रिया गुगळे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. गुगळे बोलत होत्या. यावेळी मानसिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. मानसी सोंगगिरकर – बोराडे तसेच डॉ. जी. एन. कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. एस.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आजच्या काळात विद्यार्थी मोबाईलचा वापर जास्त करताना दिसतात. मात्र या मोबाईलच दुष्परिणाम आज विद्यार्थ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करावे आणि अभ्यासाबरोबर असपल्या शारिरीक क्षमतेवर देखील लक्ष देण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते दत्तात्रय पाष्टे यांनी व्यक्त केले. कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती पदक विजेते आणि डायमंड पब्लिकेशनचे चेअरमन दत्तात्रय पाष्टे, कॉगे्रसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, माजी नगरसेविका निर्मलाताई कदम, विजया सुतार, संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम, कॅप्टन श्रीपत कदम, कॅप्टन संजय…
चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘भगवा आतंकवाद हे पुराव्याशिवाय केले गेलेले भारताच्या इतिहासातील एक मोठे षडयंत्र होते, हे षडयंत्र तत्कालीन काँग्रेस सरकारचेच असल्याचा घणाघाती गौप्यस्फोट मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले समीर कुलकर्णी यांनी केला. धर्मपरायण राहून राष्ट्रकर्तव्य केल्यास हिंदुधर्म कधीही पराजित होणार नाही!’ असा ठाम विश्वासदेखील त्यांनी (दिनांक १२ ऑगस्ट २०२५) चिंचवड येथे व्यक्त केला. सकल हिंदू समाज, पिंपरी – चिंचवड शहराच्या वतीने इतिहास संशोधक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘भगवा आतंकवाद ना कभी था… ना हैं… ना रहेगा…’ या विषयावर समीर कुलकर्णी यांचीजाहीर प्रकट मुलाखत घेतली. भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक असल्याने पुरुषार्थ हा हिंदू समाजाचा आदर्श असून…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड प्रभाग क्रमांक 18 येथील माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी रक्षाबंधनाच्या शुभ अवसराचे औचित्य साधून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बंद लिफाफ्यातून एक हजारांहून अधिक राख्या पाठवण्यात आल्या. या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि कल्याणासाठी घेतलेल्या विविध सकारात्मक आणि प्रभावी निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या यंत्रणा, सक्षम कायदे आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून चालवलेल्या योजनांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या राख्यांमधून महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक बंधन – सन्मानाचे, विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे – बांधले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.माजी नगरसेवक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने नाव घेतले जाते. या ट्रस्ट अंतर्गत रावेत येथे २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाने अल्पावधीतच स्वायत्तता मिळवली आहे. आता हे महाविद्यालय स्वतंत्र ओळख निर्माण करून आणखी तांत्रिक कुशल मनुष्यबळ करेल असा विश्वास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी बैठकीत व्यक्त केला. पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर मध्ये नियामक मंडळाची २०२५- २६ या शैक्षणिक वर्षाची पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वास्तू रचनाकाराने नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग वास्तू उभारताना कौशल्याने केला पाहिजे. वास्तू उभारताना उपलब्ध जमीन तेथील पाण्याचे स्त्रोत, विविध प्रकारची झाडे झुडपे, पशु पक्षी यांचा अधिवास धोक्यात येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल याचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आधुनिक वास्तू उभी केली पाहिजे, असा कानमंत्र ताओ आर्किटेक्चर चे संचालक मनीष बँकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲन्ड डिझाइन येथे प्रसिद्ध आर्किटेक्ट मनीष बॅंकर यांनी वास्तू रचनेची संकल्पना आणि आर्किटेक्चर मधील नाविन्यपूर्ण प्रयोग या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी…
