- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्वप्नील शिवाजी चव्हाण(सहाय्यक पोलीस निरीक्षक), संतोष पाटील (पोलीस निरीक्षक)व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे मानसिक, शारीरिक व सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “Say No to Drugs, Yes to Life” हा संदेश देत विद्यार्थ्यांना अंमली…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण कुमार सिन्हा, उद्योजक श दर्शन धामणकर साहेब, विद्यालयाचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव , उपाध्यक्ष अमित बच्छाव साहेब, त्याचप्रमाणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे प्रमुख डॉक्टर दिलीप देशमुख , महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी अनिल लोंढे साहेब, उद्योजक राजशेखर चावला साहेब, मावळचे माजी सरपंच एकनाथ शिर्के, उपसरपंच अनंता घुले, त्याचप्रमाणे पालक संघाचे अध्यक्ष ऍडवोकेट युवराज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही देश आहे. भारतदेशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याच्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत माता की जय, वंदे मातरम्… अशा घोषणांचा जयघोष, पारंपारिक वेशामध्ये नटलेले चिमुकले, मॅनेट कॅडेट्सची अभूतपूर्व कवायत आणि हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘मॅनेट’ इमारतीच्या प्रांगणात भारताचा ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नौदल कर्मचाऱ्यांचे माजी उपप्रमुख, व्हाइस अॅडमिरल मुरलीधर एस. पवार हे समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह, व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस., प्रोवोस्ट प्रा.डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चिंचवडगावातील रस्टन कॉलनी, अहिर सुवर्णकार समाज आणि शिवसेना वेताळ नगर शाखा अशा तीन विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वेताळनगर शाखा येथे शहर संघटक संतोष सौंदणकर, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, सागर चिंचवडे , इमरान पानसरे, सागर चिंचवडे, शाखाप्रमुख मजीद शेख, कय्युम पठाण, किशोर सातपुते, रफिक बेग, कुदरत खान, राजू मासाळकर, शिवाजी तांबे, पत्रकार बाप्पू गोरमाळे, सपना बनसोडे, कलावती नाटेकर, माया कुलथे, यास्मिन पठाण, रूपाली तेलंगी, रेखा गायकवाड, अंजना करांडे, अश्विनी धावरे, राणी काळभोर, शितल काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. रस्टन कॉलनी येथे अध्यक्ष डी. एम.…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकाशामध्ये डौलाने फडकणारा तिरंगा आणि दुसरीकडे ‘ऐ वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू’, ‘दिल दिया है, जान भी देंगे ये वतन तेरे लिये’, ‘आय लव्ह माय इंडिया’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वंदे मातरम्’ यांसारख्या हृदयाला भिडणाऱ्या देशभक्तिपर गाण्यांचे सादरीकरण… असा देशप्रेम, शौर्य आणि ऐक्याचा अद्वितीय संगम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती येथे आयोजित केलेल्या ‘झेंडा उंचा रहे हमारा’ या कार्यक्रमात पाहायला मिळाला. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा ७८ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वंदे मातरम, भारत माता की जय… अशा देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून गेलेला परिसर, हातात तिरंगा, मनात उत्साह, आणि ओठांवर जयघोष — अशा उत्साहाच्या वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड ते लोणावळा या तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश वेगाच्या पंखांवर वाहत नेणारी ही तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला जणू नवचैतन्य देऊन गेली. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका व होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरी शोरूम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची…
पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशन आणि इंडो ऍथलेटिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२५ उत्साहात संपन्न झाली. “Pedal for Green India” या घोषवाक्यासह हरित भारताचा संदेश देत सकाळी ७ वाजता उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. मुकाई चौक, रावेतपर्यंतचा २० किमीचा प्रवास पूर्ण करून पुन्हा उन्नती सोशल फाउंडेशन येथे रॅलीचा समारोप झाला. या उपक्रमात सहभागी सर्व सायकलस्वारांना टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, बीआयबी व जवळजवळ 1,50,000 झाडांचे बिया वाटून नागरिकांना ते लावावे असे सांगितले व तसेच अल्पोपहाराची सुविधा देण्यात आली. लकी ड्रॉद्वारे तीन सायकल आणि पाच हेल्मेटची बक्षिसे देण्यात आली. या माध्यमातून…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात, देशभक्तीच्या वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, नृत्य आणि लघुनाटिकांनी सर्वांचे मन भारावून टाकले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुजित डोंगरजाल यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरश्रीपूर्ण बलिदानांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हेच उद्याचे देशाचे नेते आहेत. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेम या मूल्यांचा अंगीकार करून देश प्रगतीपथावर नेणे ही आपली जबाबदारी आहे.” शाळेचे संचालक संदीप काटे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच चारित्र्य घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले…
