Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. आजचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. गेल्या २१ वर्षांपासून पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशन विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा गुणगौरव करून समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवीत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. सचिन साठे सोशल फाऊंडेशनतर्फे इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ शुक्रवारी (१५ ऑगस्ट) उत्साहात पार पडला. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विन जगताप, प्रा. गणेश शिंदे आदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पद्मश्री नारायण सुर्वे यांनी मराठी साहित्यात कामगार वर्गाची आणि समाजातील उपेक्षित वर्गांची वाचा फोडली. त्यांच्या कवितांमुळे कामगार जीवन आणि समाजातील विषमतेवर आणि अन्यायावर प्रकाश पडला.त्यांची कविता आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देते. सुर्वेंनी कामगार जीवन मांडले असे मत काम करण्याचे काशिनाथ नखाते व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश माने, सलीम डांगे, सुनील भोसले,मंगेश पालके ,सुनील गायकवाड, सामसुद्दीन शेख, बाळू काळे ,यास्मिन पठाण ,लक्ष्मी बाजवी, सतीश शेंडे, स्वाती मोरे, रंजना शिंदे, सुवर्णा कोरे आदी उपस्थित होते. मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कवी आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या सायली सात्रस, वेदिका सिद्धवगोल, बुह्रानुद्दीन दलाल, शेहजाद शेख या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दहावी-बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला. प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्रदीप सातरस, अनंत सिद्धवगोल, विणा सिद्धवगोल, कौसर शेख, युसुफ दलाल, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आळंदीचे माऊली महाराज (मोठे) कदम यांचे वडील ह.भ.प. निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर यांनी अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवचन सेवा देत वाढदिवस अभिष्टचिंतन केले. वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रंथदान स्वरूपात ७५० ज्ञानेश्वरी ग्रंथ, ९२५ तुकाराम गाथा ग्रंथ, १२५ संविधान प्रत, ५७०० वृक्षांची रोपे, ४०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ अभिनेत्री साक्षी चौधरी व गुरुवर्य माऊली…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील”अभिराज फाउंडेशन ” या दिव्यांग मुलांच्या शाळे मध्ये 15 ऑगस्ट 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, लायन्स क्लब ऑफ रहाटणी पुण्याचे डायरेक्टर लायन अशोक बनसोडे, यशस्वी क्लासेसच्या संचालिका आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसूडगे, पालक संघ सदस्य सिद्धार्थ उघाडे सर, वुई टुगेदरचे सचिव जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद,धनंजय मांडके ,पालक संघाचे सदस्य धनंजय बालवडकर मुख्याध्यापिका अनिता चव्हाण ,पालक, विद्यार्थी, शिक्षक, दादा ,मावशी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व ध्वजगीत झाले. संतोष कोळी या दिव्यांग विद्यार्थ्यांने प्रार्थना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कष्टकरी कामगारांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का ? आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कष्टकरी कामगारांना कामाला लावणे त्यांच्याकडून काम करून घेणे अत्यंत चुकीचे होते.मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये अर्थसाह्य द्यावे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी शासन प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कालच आळंदी येथे उपस्थित असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री यांच्याकडे केले आहे. बीएसएनएलच्या ऑप्टिक फायबरचे काम असल्याचे समजते मात्र कष्टकरी कामगारांच्या व्यथा आणि कथा मांडणारे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते की या आजादी झुटी हे देश…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण प्रख्यात व्यावसायिक अमरीश कक्कड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थितांनी समुह राष्ट्रगीताचे सादरीकरण करून भारतमाताकी जयच्या धोषणा दिल्या . श्री कक्कड याचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला . यावेळी व्यासपीठावरती कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ.भूपाली शहा , संचालिका डॉ .…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘आझादी का अमृत महोत्सव’आणि हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत पिंपळे सौदागर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत तिरंगा वाटप कार्यक्रम तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० पासून या उपक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत,परिसरातील सार्वजनिक ठिकाणी व चौकात तिरंगा फडकावून,देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले आणि म्हणाले की,”‘हर घर तिरंगा’ अभियान आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या उपक्रमातून देशभक्तीचा संदेश प्रत्येकाच्या मनात पोहोचविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रध्वज हा आपल्या स्वाभिमानाचा,एकतेचा आणि बलिदानाचा प्रतीक आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकणे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी प्रत्येक भारतीयाच्या स्वयंशिस्तीतून देशाला वैभव प्राप्त होईल!’ असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुकुंद कुलकर्णी बोलत होते. विश्व हिंदू परिषद, पिंपरी – चिंचवड अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सहकार्यवाह प्रा. डॉ. नीता मोहिते, विश्वस्त मधुसूदन जाधव, नितीन बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गट कार्यवाह हेमंत फुलपगार, तेजस्विनी ढोमसे, जनता सहकारी बँक व्यवस्थापक विनोद देशपांडे, निखिल परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, मुख्याध्यापिका वर्षा जाधव, वासंती तिकोणे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोहम् सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संत तुकारामनगर, पिंपरी येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग उपायुक्त पंकज पाटील, फ विभाग साहाय्यक आयुक्त अतुल पाटील, महानगरपालिका ग्रंथालय विभाग प्रमुख प्रतिभा कुमावत, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चाबुकस्वार, ज्ञानेश्वर कांबळे आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख यावेळी उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झेंडावंदन संपन्न झाले. याप्रसंगी पंकज पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तसेच प्रसन्न व शांत वातावरण आणि स्पर्धा परीक्षांसाठी…

Read More