Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागातर्फे नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त जाधववाडी येथील सावतामाळी सभागृह येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ५५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात आकुर्डी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने नागरिकांना वजन, उंची, बीएमआय (शरीर वस्तुमान निर्देशांक), रक्तदाब मोजणी, संपूर्ण रक्त तपासणी (सीबीसी), पीबीएस, अकस्मात रक्तातील साखर तपासणी (बीएसएल-आर), सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, नियमित लसीकरण, छातीचा एक्स-रे, थुंकी तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड नोंदणी यांसह विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालरोग, स्त्रीरोग,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘जीवन की बगीयाँ महकेगी…’ या किशोरकुमार यांनी गायलेल्या वैविध्यपूर्ण हिंदी – मराठी गीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, संचालक विजय कांबळे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, विलास गादडे, महीपत वरपे, मोहन भस्मे, विकास जगताप, डॉ. किशोर वराडे, उदय काळे, वंदना केदार, सुवर्णा जोशी, देवेंद्र जोशी, जैबुनिसा शेख, अनिता बिंगेवार, शरद चव्हाण, अस्मिता कुलकर्णी, अंकित गुप्ता, शरद शेजवळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी यांच्यावतीने विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनी विविध शाळेच्या आर्थिक दुर्बल घटकातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना मिळून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गेली तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या वर्षी आदर्श बालक मंदिर – बिजलीनगर, जयवंत प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय – दळवीनगर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे खिंवसरा पाटील शिक्षण संकुल – थेरगाव, बाल विकास शिक्षण संस्था – कुर्ला मुंबई या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक अर्थसाह्य देण्यात आले. याप्रसंगी ‘महाराष्ट्राचे कुलदैवत साक्षात श्री खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे,…

Read More

पिंपरी,( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांनी योग्य मित्रपरिवार निवडावा. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निरोगी शरीर व स्वस्थ मन आवश्यक आहे. करियर ची मोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चारित्र्य व नेतृत्व गुण महत्वाचे आहेत, असे वडोदरा येथील केंद्रीय कर आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या साते, वडगाव मावळ पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची दीक्षारंभ सोहळ्याने सुरुवात झाली. मानकोसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी स्मार्ट केम टेक्नॉलॉजीचे माजी संचालक विजय कुमार पाटील, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी विभागीय संचालक डॉ. अमरेंद्र साहू,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी सोहळा अतिशय उत्साहात आणि दणदणीत वातावरणात पार पडला. गोविंदा पथकांच्या थरारक कलाबाज्या, श्रीकृष्ण जयघोषांचा गजर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर रंगून गेला. या अविस्मरणीय सोहळ्याला मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून अजित फाटके (कार्याध्यक्ष, आप महाराष्ट्र प्रदेश), सिद्धेश भैय्या भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष, युवा आघाडी), अमित भाऊ म्हस्के (महाराष्ट्र राज्य समन्वयक) व मयूर दौंडकर (युवक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अभियांत्रिकी मधील तांत्रिक शिक्षण तसेच उद्योगाला सद्य परिस्थितीत व भविष्यकाळात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ मिळाले तर उद्योगांची भरभराट होईल. त्यामुळे देशाच्या जीडीपी मध्ये वाढ होऊन जास्त प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील. त्यासाठी औद्योगिक आस्थापना व शैक्षणिक संस्थांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. यासाठी “मॉडेल बेस्ट सिस्टीम इंजीनियरिंग” सारखी परिषद (एमबीएसई) मार्गदर्शक ठरेल, असे मत इंटरनॅशनल कौन्सिल ऑन सिस्टीम इंजीनियरिंग इंडिया चे (आयएनसीओएसई) मुदित मित्तल यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) येथे एमबीएसई ही शिखर परिषद आयएनसीओएस इंडिया चॅप्टरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी पीसीसीओई आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. यावेळी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, विभाग समन्वयक दर्शना कामत, सुश्री पृथा वैद्य, वंदना सांगळे, अर्चना प्रभुणे, नयना तारू, सुप्रिया नितीन व सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक शिक्षक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारकडून मराठीसह पालीला ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला. यामुळे पाली भाषेचे अभ्यासक आणि निष्ठावान प्रचारक असलेल्या महेंद्र भारती यांना मनापासून आनंद झाला. बालपणापासून पाली भाषेविषयी त्यांना वाटणारी आत्मीयता उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असताना शासकीय पातळीवर झालेल्या या निर्णयाने महेंद्र भारती यांच्या मराठी – पाली साहचर्य चळवळीला एकप्रकारे बळकटी प्राप्त झाली आहे. उरण – इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील मूळ रहिवासी असलेले महेंद्र भारती हे सुमारे चाळीस वर्षांपासून पुण्यात कर सल्लागार आणि सरकारमान्य लेखा परीक्षक म्हणून कार्यरत असून पिंपरी – चिंचवड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पाली भाषाप्रेमाविषयी शोध घ्यायचा असेल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथील बी. व्होक. मास कम्युनिकेशन या विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सोहळा महाविद्यालयाच्या संभाजीनगर चिंचवड येथे शनिवार दि.16 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट क्षेत्रातील छायाचित्रण दिग्दर्शक रणजीत माने व सजना या मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेता आकाश सर्वगोड उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भोसले म्हणाले की गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे व वंचित घटक शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. गरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजनेची सुरुवात केली. मुलांनी परिस्थिती नाही म्हणून शिक्षण थांबवण्यापेक्षा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळभोरनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दि.१० ऑगस्टपासून कीर्तन – प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . या सप्ताहात प्रत्येक दिवशी नामवंत कीर्तन कारांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तिमय वातावरण केले होते . या कीर्तन सप्ताहाचा सांगता समारंभ सोहोळा शनिवार दिनांक.१६ ऑगस्ट रोजी गोपाल काला निमित्त काल्याचे कीर्तन ह. भ. प. गणेश महाराज साळुंखे ( कराड ) यांनी केले. यावेळी विशेष उपस्थिती श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त अँडव्हॉकेट रोहिणी पवार , श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू विश्वस्त ह .भ .प माणिक महाराज मोरे – इनामदार , खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव काळभोर ,नंदू साळुंखे ( पत्रकार…

Read More