- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माझ्यावर वैयक्तिक हल्ला झाला असता तर मी विचार केला असता. मात्र माझ्यावर केलेला हल्ला हा शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर हल्ला आहे. त्यामुळे आपण त्याला काय प्रतिक्रिया देतो हा विचार मी करतोय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह फुले शाहु आणि आंबेडकर यांची न्याय सत्ता होती. ही सत्ता आणि मानवता, परिवर्तन, बुद्धाकडे जाईल असा निर्धार केला पाहिजे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने”महाराष्ट्र धर्मासाठी ” या मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे केले होते.या वेळी गायकवाड बोलत होते.या वेळी सिने अभिनेते किरण माने समाज प्रबोधनकार गणेश महाराज फरताळे मानव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सद्यस्थितीत नागरिकांना व रास्तभाव दुकानदारांना अन्नधान्य वितरणाशी संबंधित कामांसाठी थेट पुणे कार्यालयात जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत, असे लांडगे यांनी नमूद केले आहे. पिंपरी-चिंचवडसह देहू कॅन्टोनमेन्ट, देहू नगरपंचायत व काही भागांतील एकूण लोकसंख्या ३० लाखांच्या घरात असून, भोसरी, चाकण, तळेगाव, हिंजवडीसारख्या औद्योगिक पट्ट्यांमुळे स्थलांतरितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी, फक्त तीन परिमंडळ अन्नधान्य कार्यालयांवर कामकाजाचा वाढता भार पडत असल्याने नागरिक व दुकान चालकांना पुण्यात जावे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स म्हणजेच आयआयएमएसमध्ये संगणक तंत्रज्ञानातील जगप्रसिद्धआयबीएम कंपनीच्यावतीनं डेटा सायन्स अभ्यासक्रमाला सुरवात करण्यात आली. आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेतील बीसीए, बीबीए आणि एमसीए विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुकूल असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आधारित डेटा सायन्सच्या विविध आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी आयबीएमचे प्रशिक्षक साहिल टोंगळे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी रोजगार आणि नोकरीच्या संधीच्या स्पर्धेत सक्षमपणे टिकाव लागण्यासाठी युवा पिढीने या इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा अंगीकार करणे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात नुकताच पार पडलेला “आनंद-यात्री” हा सुरेल संगीत कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि संगीतप्रेमींनी भरलेल्या सभागृहात संपन्न झाला. डॉ. अविनाश देविदास देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात १९६० ते १९९० दरम्यानच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट तसेच रंगीत चित्रपटांतील गाण्यांचा मोहक संगम रसिकांनी अनुभवला. एकूण 29 गाण्यांचे नृत्यासह सादरीकरण करण्यात आले. १५ हून अधिक गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.आमदार उमा खापरे यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे निवेदन मयुर देशमुख आणि रुपाली यांनी त्यांच्या खास शैलीत केले, तर व्हिडिओ-व्हिज्युअल्सची भव्य सजावट विक्रम क्रिएशन्सने, आणि ध्वनीव्यवस्था राजेंद्र किरवे यांनी अतिशय सुंदर रीतीने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जलदिंडी च्या माध्यमातून पवना नदीचा उगम शोधताना लक्षात आले की, या नदीत शहरी भागात सांडपाणी सोडले गेल्याने ती प्रदूषित झाली आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे नदी प्रदूषणासारख्या अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आता वास्तू विशारद यांनी सर्व बाजूंनी विचार करून, सर्व समावेशक विकास प्रकल्प सादर करावे अशी अपेक्षा जलदिंडी या नदी सुधार क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे संचालक राजीव भावसार यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा…
शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पुर्वतयारीचा झाला प्रारंभ पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी तसेच कामगारांची, कष्टकऱ्यांची नगरी म्हणून देखील आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि समृद्ध शहर आपल्याला बनवायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये या शहराला अव्वल स्थान मिळवण्यासाठी महापालिकेसोबत लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले,यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कलारंग सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने the folk परंपरा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समता, न्याय आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, यामध्ये अण्णा भाऊ साठे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नाटक हे मराठी माणसांचा श्वास आहे, मराठी माणसांनी संस्कृती जपली आहे. कामगार, औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक नगरी म्हणून झपाट्याने विकास होत आहे, यामध्ये नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचा मोलाचा वाटा आहे, मी त्यांनी मागणी केल्या प्रमाणे शहरात नाट्य संकुल करण्यास अनुकूल असून त्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घ्यावी, मी त्यांना फोनवर बोलून जागा उपलब्ध करून देण्याची सूचना देतो असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात नाट्य संकुल उभारण्याची घोषणा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सौरऊर्जेच्या माध्यमातून भारतात उर्जासाक्षरता वाढवण्यासाठी आणि स्वच्छ उर्जेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘सुखाई सोलर एनर्जी’ या कंपनीच्या ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) ऑफिसचे उद्घाटन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते, तर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडले. या कंपनीचे संस्थापक कु. अविष्कार हजारे हे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री. पोपटराव हजारे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अमेरिका येथून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन, सौरऊर्जेच्या क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प केला. घराघरात सोलर बसवून समाजात ऊर्जा बचतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटनप्रसंगी आमदार महेशदादा…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा बैलगाडा मालक प्रतिष्ठान संचालक पदासाठी गणेश किसन आप्पा यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे बैलगाडा मालक व शौकिन वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवकांमध्ये लोकप्रिय असलेले व सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे श्री. यादव यांची निवड झाल्याने बैलगाडा मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारंपरिक खेळ संवर्धनासाठी नवे दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संचालक पदावर निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गणेश किसन आप्पा यादव यांच्या बिनविरोध निवडीमुळे संस्थेचे कार्य अधिक प्रभावी व गतीमान होईल,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
