Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त काळेवाडी येथील न्यू जिजामाता रुग्णालयातर्फे ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये २०० हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला. महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उदघाटन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले. याप्रसंगी डॉ. अलवी नासेर, डॉ. शीतल शिंदे, डॉ. जतीन होतवानी, बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती विसपुते व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संगीता कोकणे, अनिता पांचाळ तसेच जिजामाता रुग्णालय…

Read More

चिखली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच मुंबई येथे झालेल्या स्टेम नॅशनल चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेत चिखलीतील स्वराज भोसले यांनी आदित्य मुंडे व हर्षद शिंदे या सहकाऱ्यांसह सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे चिखली व परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुदळवाडी-चिखली ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते दिनेश लालचंद यादव यांनी स्वराज भोसले यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते. सत्कार प्रसंगी दिनेश यादव म्हणाले की, “चिखलीतील मुलांनी देशपातळीवर केलेली कामगिरी ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. स्वराजसारखे तरुण हे भविष्यातील आदर्श आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या ग्रामस्थांकडून सदैव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतात ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर केला जात आहे. समाजोन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास केल्यामुळे लोक कल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत मिळते. गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित होत असून यामुळे देश प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. नव तंत्रज्ञान विकसित भारतासाठी उपयुक्त ठरते आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि आयईईई यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या पाचव्या ‘एशियाकॉन -२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक डॉ.…

Read More

काळेवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी विजय नगर येथील खेळाच्या मैदानावर आज काळेवाडी सोसायटी फेडरेशनच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी आणि अनेक सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान विभाग अधिकारी देखील उपस्थित होते. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे परिसरातील हरित पट्टा वाढवणे, पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना व तरुण पिढीला निसर्गाची ओळख करून देणे हे होते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विजय सुतार, सचिन काळे, मल्लेश कद्रापुरकर, विजया सुतार, संतोष कदम, प्रकाश लोहार, भरत ठाकूर, सुधाकर नलवडे, प्रदीप शिंदे, संदीप शिंदे, राहुल रोकडे, ओम क्षीरसागर आणि देवेंद्र जाधव यांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदू संस्कृती मध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणात विविध धार्मिक व्रत वैकल्ये केली जातात. तसेच महिला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून निसर्ग आणि परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून पुढच्या पिढीसाठी संस्कृती जतन करण्यासाठी मार्गदर्शन मिळते असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्ष चिंचवड प्राधिकरण मंडलाच्या वतीने सावरकर भवन येथे श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन स्पर्धा, मंगळागौर खेळ, जेष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक १५ मधील गणेश तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन प्रसंगी सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, असे पिंपरी – चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार यांनी प्रशासन अधिकारी, अ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, निगडी प्राधिकरण यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक १५ मधील गणेश तलाव, निगडी प्राधिकरण येथे प्राधिकरण, निगडी, आकुर्डी परिसरातील गणेशभक्त मूर्तिविसर्जन करतात. सदर ठिकाणी गणेशभक्तांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृह यासारख्या सोयीसुविधा पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात. गणेश तलाव प्राधिकरण, निगडी या पवित्र ठिकाणी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून गणेशभक्तांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारले जाते.…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ३२ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत त्रिंबक बिनीवाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, सचिव माधुरी ओक, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, आर. एस. कुमार, पी. के. पाटील, नंदकुमार मुरडे, रमेश वाकनीस, रजनी अहेरराव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकऱ्यांना ३६५ पैकी ३२२ दिवस संकटाशी झगडावे लागणार आहे, इतकी संकटे आहेत की झालेले नुकसान भरून येण्याची शक्यता नाही, अनिश्चितता, अतिवृष्टी दुष्काळ, गारपीट हे शेतकऱ्यांचा अविभाज्य भाग झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी . सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे संताप जनक वक्तव्य करणारे भाजप नेते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना पदाचा उपयोग जमत नसेल तर दुरुपयोग न करता पद सोडून द्यावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली. वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ, नापिकीमुळे, अतिवृष्टीमुळे, गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना महाराष्ट्राच्या…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे सौदागर परिसरात उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “इको-फ्रेंडली श्री गणेशा कार्यशाळेला” लहान मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी उन्नतीच्या कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल चारशेहून अधिक मुलांनी सहभागी होऊन शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी घडविल्या. गेल्या पाच वर्षांपासून उन्नतीकडून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून यंदाही मुलांच्या कल्पकतेला व कलागुणांना वाव मिळाला. कार्यशाळेत वैष्णवी शेगावकर यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे मुलांसोबत काही पालकांनीही उत्साहाने सहभाग घेत गणपतीच्या मूर्ती तयार केल्या. उपक्रमाबाबत बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “लहान मुलांमध्ये कलागुणांचा विकास घडवून आणणे तसेच…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी गणपती आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना तानाजीनगर, पोदार शाळा, श्री शिवाजी उदय मंडळ रोड, विवेक वसाहत, काकडे पार्क, केशवनगर ते गणेश विसर्जन घाट या मुख्य रस्त्यांवर झाडांच्या फांद्या रस्त्यावर वाकल्या असून, मोठ्या गणपती मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी अडथळा निर्माण झाला आहे.महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी उद्यान विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका प्रशासन वेळेत झाडकटाई करत नाही, याबाबत अनेक वेळा निवेदन व पाठपुरावा करूनही फारसा परिणाम झालेला नाही. ऐनवेळी फक्त काही ठिकाणी झाडकटाई करून वेळ मारून नेली जाते, अशी तक्रार नागरिक व मंडळांनी केली आहे. महावितरण…

Read More