Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वर्षभर धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. आज बुधवारी (दि.२७) “श्रीं”ची प्रतिष्ठापना करून रात्री ९ वाजता, प्रसिद्ध दिग्दर्शक व सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष विनायक कुलकर्णी व मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त प्रवीण कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. मंडळाची धार्मिक व सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखत या वर्षी गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे भजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, युवती व महिला भगिनींचे मर्दानी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. जीवनाचा प्रवास हा न थांबणारा आहे. परंतु प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी हा त्याच्या जीवनातील महत्त्वाचा ठेवा असून शालेय आठवणी हा तर अनमोल ठेवा असतो.पन्नास वर्षांपूर्वी एकत्र खेळले बागडलेले अनेक विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे जीवन अनुभवले हा एक अद्भुत सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीं पन्नास वर्षांनी एकत्र येऊन सुवर्ण महोत्सवी स्नेही मिळावा साजरा केला. या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वत्र गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकीत संस्था सुरू करण्याचा ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील देत ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा हा ‘‘ड्रीम प्रोजेक्ट’’ आता दृष्टीक्षेपात आला आहे. शहरातील मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय गायरान जमिनीवर आयआयएमची शाखा उभारली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिकेच्या ग, ड आणि ह प्रभागातील तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अ, ब प्रभागातील महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधांचा सखोल आढावा घेतला. शहरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी घाटांवर येतात. यंदाही या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने विशेष तयारी केली आहे. त्याअंतर्गत विविध घाटांवरील सुविधा, स्वच्छता व सुरक्षा यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी ग प्रभागातील सुभाषनगर घाट, पवनेश्वर घाट, महादेव मंदिर घाट, दत्त मंदिर घाट, ड प्रभागातील पुनावळे राम मंदिर शेजारील घाट, पिंपळे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळांमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाडू माती आणि कागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे, पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देणे, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. कार्यशाळेत शिक्षक व मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. मूर्ती घडवताना कोणती काळजी घ्यावी, आकारनिर्मिती करताना कोणते बारकावे पाळावेत, मूर्तीची सुरक्षित देखभाल कशी करावी, तसेच मूर्ती विसर्जन करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून पारंपरिक विसर्जन सोहळ्यामुळे शहरातील नदीकाठ, तलाव व कृत्रिम जलकुंडांवर भाविकांची मोठी गर्दी होत असते मात्र, या काळात अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, सजावटीचे साहित्य व इतर विघटन न होणारा कचरा थेट पाण्यात किंवा नदीकाठावर टाकला जातो. यामुळे जलप्रदूषण वाढून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे वारंवार दिसून येते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नदीकाठावर कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक कचरा अथवा विघटन न होणारे साहित्य टाकू नये. यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी विशेष कुंड्या ठेवण्यात आल्या असून, फुले, माळा, पूजेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या संस्थांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ या महाकाव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समग्र क्रांतीकारी चळवळीच्या अभ्यासक, जेष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके, तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध निवेदिका कवयित्री सीमा गांधी यांची निवड झाली आहे. तसेच संमेलनामध्ये होणाऱ्या ‘सावित्रीची काव्यफुले’ या काव्यमहोत्सवाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रिया माळी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदे‌चे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. संगीता झिंजुरके यांच्या ‘श्रृंगार मराठीचा’ या कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्र‌मात अंतर्भाव झाला असून, त्यांनी…

Read More

वाकड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देण्यासाठी वाकड येथे द्रौपदा लॉन्समध्ये पर्यावरणपूरक विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. युवा नेते विशाल वाकडकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा घाट उभारण्यात आला असून, नागरिकांनी व गणेश मंडळांनी या घाटाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) गणेश मूर्तींचे प्रमाण वाढले आहे. या मूर्तींचे विसर्जन थेट नदी, नाले, ओढे, विहिरीत केल्यामुळे जलप्रदूषणात वाढ होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रदूषणमुक्त विसर्जनाची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी वाकडमध्ये हा घाट उभारण्यात आला आहे. विशाल वाकडकर म्हणाले,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घरकुल आयोजित भव्यदिव्य अशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 वी जयंती अतिशय थाटामाटात जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये घरकुल परिसरामध्ये साजरी करण्यात आली. घरकुल स्थापनेपासून पहिल्यांदा यावर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने गौरव माझा महाराष्ट्राचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घरकुल मधील समाज बांधवांनी व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच घरकुल मधील सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व तरुणांचे व तरुणींचे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे पुस्तक देऊन सन्मान सोहळा करण्यात आला. यावेळी आमदार महेश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी-गणपतीच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झाले असून, अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन देखील सुरू झाले आहे. यानंतर गौरी आणि इतर गणपतींचे विसर्जन होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर, केशवनगर गणेश विसर्जन घाटावर आरतीसाठी योग्य चौथऱ्याची तातडीने गरज आहे, अशी मागणी महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी केली आहे. मधुकर बच्चे हे दरवर्षी केशवनगर घाटाची पाहणी करतात आणि भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करतात. या वर्षी सुद्धा त्यांनी घाटाची पाहणी करून आरतीसाठीच्या व्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षी आरतीसाठी चौथऱ्याची योग्य सोय नसल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी रस्त्यावर उभे राहून आरती…

Read More