Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत २९ ऑगस्ट २०२५ दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील ८ प्रभागांतून तब्बल ४ हजार ०३२ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती ८२२ तर पीओपीच्या ३ हजार २१० मूर्तींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद ठेवताना ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे, याप्रमाणे नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज संकलित होणाऱ्या मूर्तींची नोंद केली…

Read More

सेवानिवृत्तांमध्ये मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर यांचाही समावेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांनी सातत्य,सचोटी व जबाबदारीने केलेल्या सेवेमुळे महानगरपालिका वेगाने मार्गक्रमण करीत असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे माहे ऑगस्ट २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २३ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ९ अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांचा उप आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय भिसे यांची भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली. विजय भिसे यांनी पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या गावात कला, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रुजवात करण्याचा प्रयत्न केला आहे. १९८५ साली युवा कला संवर्धन या संस्थेच्या माध्यमातून शहरभर ,विविध स्तरावरील साहित्य संमेलने आणि व्याख्याने यांचे आयोजन केले होते. तेव्हापासून त्यांचा हा प्रवास सुरू आहे. पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनची स्थापना करून गुणवंत कलाकारांना पिंपरी चिंचवडचा प्रतिष्ठेचा ‘कलाविभूषण पुरस्कार’ सुरू केला आहे. यामध्ये गायिका सावनी रवींद्र, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके व सराव सादर केला. तसेच ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ची शपथ डॉ. वैशाली खेडकर यांनी वाचन करून विद्यार्थ्यांकडून ग्रहण करून घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी आपल्या भाषणातून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. तसेच क्रीडाभावना व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. या उपक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे उप-प्राचार्य प्रा. (डॉ.) सुहास निंबाळकर, कला विभागाच्या उप-प्राचार्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज झाली आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज यांनी क्विक हील फाउंडेशन व सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानात प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गणपती सजावटीतून सायबर सुरक्षेचे संदेश देत जनजागृती केली. हार, दुर्वा, तोरण, सायबर गीता अशा नाविन्यपूर्ण वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करून शासकीय रुग्णालये, पोलीस ठाणे, झोपडपट्टी विभाग तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये वितरित करण्यात आल्या. या उपक्रमातून नागरिकांना फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी, लिंक, कॉल व ईमेलमधील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपचे युवा नेतृत्व सोमनाथ मोहन तापकीर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. आरंभ लॉन्स, काळेवाडी येथे इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्यात हजारो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. या सोहळ्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात प्रथम बक्षीस म्हणून १२८ जीबी टॅब देण्यात आला. तसेच पाच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय बॅग, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित मान्यवरांमध्ये भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, वरिष्ठ सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष कैलास…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकणसह परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या भागातील अतिक्रमणांचा सर्वे करण्यात येत असून संबंधितांनी अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणे तातडीने काढून घेण्याचे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. आगामी आठवड्याभरात या भागातील अनाधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या अतिक्रमानामुळे चाकण एमआयडीसीसह परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून या भागातील प्रस्तावित रस्ता…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी मुख्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव, भक्तीभावासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीसाठी नैसर्गिक फुलांना प्राधान्य देण्यात आले आहे. गुरुवारी ज्ञानप्रबोधिनीने पारंपरिक बर्ची नृत्य तसेच ढोल-ताश्याचे प्रात्यक्षिक सादर करून गणेशोत्सवाच्या उत्साहात भर घातली. या गणेशोत्सवनिमित्त तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने एकदिवसीय शिवकालीन शस्त्रे, चिलखते, अमुक्त आणि मुक्त शस्त्रे यांचे ऐतिहासिक प्रदर्शन पीएमआरडीएमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे रवींद्र जगदाळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून शिवकालीन वारसा, युद्धकला आणि शस्त्रांची ओळख करून…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळं संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या इ 8 वी च्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. कु वैष्णवी बाळासाहेब बांदल हिने मुंबई येथे दि 18 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाच्या वतीने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा शिंदे , माध्यमिक उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक साहेबराव देवरे कोर कमिटी सदस्य छाया ओव्हाळ, मनीषा जाधव यांनी मनःपूर्वक हार्दिक…

Read More

गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व ब प्रभाग अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रिवर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 553 गणेश मूर्तींचे दान मिळाले आणि 3 टन निर्माल्य स्वीकारले. या उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड, प्रभाकर मेरुकर, वसंत दळवी, सायली सुर्वे, संध्या स्वामी, भरत शिंदे, सुप्रिया गायकवाड, पल्लवी नायक, अनुशा पै, अरुण कळंबे, रमेश भिसे, सुशीलकुमार गायकवाड, शब्बीर मुजावर यांनी केले…

Read More