- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यावर्षी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश वैद्य यांच्या स्नेहसावली आश्रमाला समाजदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. आश्रमासाठी थोडे धान्य देखील देण्यात आले. हा पुरस्कार सुधा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. वैद्य यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन विवेक दिगंबर कुलकर्णी यांनी केले होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, पीसीएमसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, डॉ मनाली अविनाश वैद्य, मीनाक्षी कुलकर्णी उपस्थित होते. साधेपणाने झालेला हा घरगुती सोहळा सर्वांच्या मनाला भावणारा ठरला. डॉ. अविनाश वैद्य हे अनेक वर्षांपासून स्नेहसावली वृद्धाश्रम चालवत असून समाजाने किंवा कुटुंबाने नाकारलेल्या वयोवृद्धांना आधार व मायेचा आश्रय देण्याचे कार्य ते…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – द गार्डन ग्रुपचे सदस्य अब्दुल दस्तगीर पटेल मुंबई पोलीस दलात झाल्याबद्दल गार्डन ग्रुप पिंपरी-चिंचवड च्या वतीने श्री विलास गावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पी एम पी एल चे सेवानिवृत्त अधिकरी भानुदास गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास गार्डन ग्रुप मधील सदस्य रामलिंग कंठेकर,शरीफ इफ्तेकारी,मल्लिनाथ जते, ज्ञानेश्वर मलशेट्टी, बापूसाहेब जाधव, विजय राऊत, हसन पटेल, मनोहर इंगवले,लक्ष्मण काळे,सुभाष महाजन, गजानन वाशीमकर, चंद्रकांत उमदीकर, ताजुद्दीन तांबोळी, बसवराज कानडे,सुरेश होलम, निलकंठ झाडे,दर्शन प्रजापती व गार्डन मधील मित्र मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम ज्योतिबा गार्डन या ठिकाणी संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्री सतिश घरत यांनी केले.
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघात राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि गुजरात प्रदेशाच्या महिला आघाडी अध्यक्ष नीलिमा देसाई यांनी डॉ. भारती चव्हाण यांची राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासोबतच डॉ. महेंद्र काबरा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक महत्त्वाची म्हणजे डॉ. भारती चव्हाण यांना महा ऍग्रो फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली असून, महा ऍग्रो कंपनीच्या डायरेक्टर व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संघटनेच्या विविध विभागांमध्ये इतर १० नियुक्त्याही जाहीर झाल्या आहेत. डॉ.…
दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेश उत्सवानिमित्त (शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025) दापोडीतील अष्टविनायक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबीर, व मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशंभो रक्तपेढी पुणे यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक प्रमाणपत्र तसेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा पाच लाखाचा अपघाती विमा चे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी या शिबिरासाठी ब्लड बँकेतर्फे गणेश जाधव, ज्योतीराम जाधव,अथर्व सारख लता चव्हाण,निकिता घोरपडे यांनी सहकार्य केले. शिबीराचे उद्घाटन सतीश सदाशिव काटे, दिलीप सदाशिव काटे व रमेश आनंद मुसूडगे यांनी केले. यावेळी एकूण 49 जणांनी रक्तदान केले व 52 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या संघटनवाढीच्या ध्येयाला नवी गती देत पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश लालचंद यादव यांची एकमताने निवड झाली आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी त्यांच्या निवडीची नुकतीच घोषणा केली. कुदळवाडी परिसरातून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करून शहरभर युवकांना एकत्रित करणारे दिनेश यादव हे युवकांच्या आशा-आकांक्षांचे नवे प्रतीक ठरत आहेत. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मुशीत तयार झालेले यादव हे त्यांचे संघटन कौशल्य, नियोजनबद्ध कामकाज आणि लोकहितासाठीची धडपड यामुळे या पदास पात्र झाले. युवा मोर्चा ही संघटनेची कणा मानली जाते. शहरातील युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात आणणे, रोजगार व शिक्षण क्षेत्रात त्यांना दिशा…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल यांच्या वतीने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे तीनशे छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. खासदार प्रणिती शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, सचिन आडेकर, आबा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. उल्हासदादा पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षणामुळे व्यक्तीच्या आयुष्याला आकार प्राप्त होतो. अभियांत्रिकी मधील चार वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग त्यावेळची सामाजिक गरज, सार्वजनिक प्रश्न ते सोडविण्यासाठी आवश्यक संशोधन त्याची उपयुक्तता याची सांगड घालून समाजविकासात सहभाग घेतला पाहिजे. शैक्षणिक काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करा, संवाद साधत रहा, वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी द्या असे मार्गदर्शन मुंबई कस्टम विभागाचे आयुक्त गिरीधर पै यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते मावळ येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्या शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘दीक्षारंभ’ समारंभाचे आयोजन करण्यात आले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांतील नागरिक आपल्या परिसरातील स्थानिक गरजा व दीर्घकालीन सुविधा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर अभिप्राय देत आहेत. मागील वर्षांप्रमाणे यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख, सर्वसमावेशक व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाद्वारे रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच हरित उपक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार केला जाणार आहे. नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचे संकलन व छाननी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून हा उत्सव ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात विसर्जन घाटांवर होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता, दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यापक नियोजन केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २७ अधिकृत गणेश विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर जीव रक्षकांसाठी लागणारे साहित्य लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरी, मेगाफोन इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहे. घाटावरील जीव…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात युरोलॉजी विभागातील पहिली मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ६४ वर्षीय रुग्णास मूत्रपिंडात अनेक गाठी असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. या रुग्णास मधुमेहजन्य आम्लता (डायबेटिक केटोअॅसिडोसिस), डाव्या हृदयपिंडाच्या स्नायूंची वाढ (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी) व डायस्टॉलिक डिसफंक्शन अशा गुंतागुंतीच्या तक्रारीही होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची तब्येत स्थिर ठेवण्यासाठी अॅनेस्थेशिया व मेडिसिनविभागाने समन्वय साधून आवश्यक ती पूर्वतयारी केली. या शस्त्रक्रियेसाठी जनरल अॅनेस्थेशिया देण्याची जबाबदारी डॉ. अर्चना गांधी, डॉ. पूजा कुलकर्णी, डॉ. पूनम माने व डॉ. अर्जित रेपुरिया यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण, श्वसन-रक्ताभिसरण संतुलन तसेच शस्त्रक्रियेतील स्थिती यांचा विशेष विचार करून…
