- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही केवळ एक इमारत नसून नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता अबाधित राखत हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा. कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम व्हावे, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेत विविध कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे मागील काही दिवसांपासून आचारसंहिता व इतर कारणामुळे पथ विक्रेता कायद्याचे काम थांबलेले होते ते आता सुरू करू यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व पथ विक्रेता समिती शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत फेरीवाला प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, अलका रोकडे, सलीम डांगे, महासंघाचे कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मनोज यादव, सलीम शेख, सुनील भोसले, विशाल…
सांडपाणी सोडणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “एकवेळ नदी सुशोभित केली नाही तरी चालेल; मात्र ती प्रथम प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे मांडली. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केवळ नदी पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारे स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. तत्पूर्वी, मंत्री मुंडे यांनी तळवडे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व इंद्रायणी नदीची सद्यस्थिती,…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आम आदमी पार्टीने महाराष्ट्र राज्यातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून रविराज काळे यांची ‘आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवक आघाडी’च्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. रविराज काळे यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, जनसंपर्क आणि युवकांमध्ये असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि युवक धोरणाबाबत पक्षाची भूमिका तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना रविराज काळे म्हणाले की: पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अरविंद केजरीवाल आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बोगस उपसूचनांच्या आधारे सुमारे ५२ कोटी रुपयांची देयके नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा व बीआरटी विभागाशी संबंधित सुमारे ७० कामांची बिले कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता ठेकेदारांना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना ‘उपसूचना’ दाखवून ही देयके अदा करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत भोईर यांनी दिलेल्या निवेदनात नगरसेवकांची दिशाभूल करून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या तसेच विभाग प्रमुखांना माहिती…
कष्टकरी रिक्षा – टॅक्सी संघर्ष महासंघाची परिवहन अधिकारी यांच्याकडे मागणी पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा चालक व टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ व्हावे यासाठी संघटनानी अनेक वेळा आंदोलने केले आता राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मात्र जास्त शुल्क आणि संपर्क अभावाने राज्यात नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे म्हणून परिवहन विभागाकडून नोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणात होण्यासाठी स्वतंत्र अभियान राबवावी अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे कष्टकरी रिक्षा – टॅक्सी संघर्ष महासंघ तर्फे आज करण्यात आली. महाराष्ट्र राज्यांमध्ये केवळ मागील महिन्यात केवळ १ ३३३ नोंद केल्याचे चित्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणी साठी बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदांसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे. या अभियानाचा अहवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सादर करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी यांनी दिली. गुरुवारी (दि. ९) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुलतानपूरी बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव दाहर मुजावर, आमदार जयंत आजगावकर, निरीक्षक आनंद सिंग, एआयसीसी सचिव पृथ्वीराज साठे, निरीक्षक भानुदास माळी, सचिव मनोज कांबळे, बाबू नायर, कौस्तुभ नवले, सायली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सध्या देशात टप्प्याप्प्याने सुरू असलेले संघटन सृजन अभियान हे आज पिंपरी येथे एक हॉटेल मध्ये पार संपन्न झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केंद्रीय कार्यकारणीत झालेल्या निर्णयाप्रमाणे हे वर्ष काँग्रेसचे संघटन सक्षमीकरण वर्ष असणार आहे या अंतर्गत संघटन सृजन अभियान हे नव नेतृत्व निवडीसाठी अमलात आणलेले काँग्रेसचे अभियान आहे जे जिल्हास्तरावर निरीक्षकांना पाठवून कार्यकर्त्यांची, नागरिकांची, समाजातील, विविध स्तरातील मान्यवरांची मते जाणून घेतील, त्यांचा पक्षातील अनुभव, पक्षाशी असणारी एकनिष्ठता, भविष्यकालीन धोरण आणि एकंदरीतच सर्व क्षमता असणारे नेतृत्व याची पाहणी करत आणि बहुमत पसंतीने जिल्हाध्यक्ष, तालुका, ब्लॉक, अध्यक्ष, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस, विद्यार्थी…
महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन;गरजू मुला-मुलींसाठी ‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची संधी भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये संघटन सुजन अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची पक्ष बांधणी, संघटना मजबुतीकरण हा उद्देश लक्षात घेता या माध्यमातून शहराध्यक्ष व ब्लॉक अध्यक्ष निवडीचे मुख्य काम या अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे त्यानंतर विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व मेळावे घेण्यात येणार आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने या संघटन सृजन अभियानाची सुरुवात झाली असून यामध्ये विविध राज्यांमधील निरीक्षक व त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सह निरीक्षक असे एकत्रित रित्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडतील. या…
