- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवात आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भावी नगरसेवक तसेच, इच्छुकांची चमकोगिरी सुरु झाली आहे. शहरात विशेषत: प्रभागात फ्लेक्स, बॅनर तसेच, स्वागत कमानी लावून नागरिकांवर प्रभाव पाडला जात आहे. त्यामुळे शहर विद्रुप होत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. यामुळे शहर विद्रुप होते. वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनधिकृत फलक लावू नयेत, यासाठी सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांना महापालिकेने पत्राद्वारे आवाहन केले. माजी नगरसेवकांसह इच्छुक रिचार्ज झाले आहेत. त्यांनी प्रसिद्धीसाठी सर्व तंत्राचा वापर सुरू केला आहे. प्रसिद्धीची कोणतीही संधी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वतःवरचा आत्मविश्वास आणि कुटुंबाचे पाठबळ हेच माझ्या अविश्वसनीय यशाचे गमक आहे, असा कानमंत्र स्कायडायव्हिंग या साहसी खेळात जागतिक विक्रम केलेल्या पहिल्या भारतीय महिला पद्मश्री शीतल महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त देशभर राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शीतल महाजन बोलत होत्या. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकसित तंत्रज्ञानामुळे औद्योगिक जगतात ऑटोमेशन डेटा संकलन, कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता वाढली आहे. उद्योगांची गरज ओळखून शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन टाटा मोटर्सच्या क्षमतावर्धन विभागाचे प्रमुख रंगा श्रीनिवास गुंटी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आयोजित केलेल्या नवव्या ‘आयसीसीयुबीईए-२५’ आणि चौथ्या ‘आयमेस २५’ आतंरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, संयोजक डॉ. जयश्री कट्टी, डॉ. नरेंद्र देवरे आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशीच्या सत्रात डॉ. तपन गांधी यांनी ‘संवेदनशील एआय, नवोपक्रमासाठी नैसर्गिक स्वायत्त प्रणाली’ या विषयावर तर दुसऱ्या सत्रात…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत गणेशोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने गणपतीचे विसर्जन सुरळीत, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडावे, यासाठी महापालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेतर्फे शहरातील महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन घाटांवर तैनात करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय पथकात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक व सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. या पथकांना मुबलक औषधसाठा, आवश्यक ते सर्व वैद्यकीय साहित्य तसेच सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून, वैद्यकीय विभागाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सेवा देण्याची संपूर्ण तयारी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांचे रक्षण या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विसर्जनावेळी हार, फुले, माळा, पाने आणि अन्य पूजेसाठी वापरलेले साहित्य थेट नदी-नाल्यात किंवा पाण्यात न टाकता या कुंड्यात टाकावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी शहरभरात निर्माल्य संकलन कुंडे बसवण्यात आली…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित मेट्रो विस्तारीकरणासाठी शहरातील लोकप्रतिनिधी व पुणे महा मेट्रोच्या अधिकाऱ्यासमवेत फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भक्ती शक्ती चौक – मुकाई चौक, किवळे – भुजबळ चौक, वाकड साई चौक, जगताप डेअरी – कोकणे चौक, नाशिक फाटा – संत तुकाराम नगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रीक सेंटर, गोडाऊन चौक – चाकण या महत्त्वाच्या मार्गांच्या प्रकल्प अहवालावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस विधासभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,पिंपरी चिंचवड महापालिका…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो विस्तार करताना भक्ती शक्ती निगडी- कॅनबे चौक (तळवडे) ते चाकण एमआयडीसी टप्पा-5 अशी नवीन मार्गिका प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व्हे आणि डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा भक्तीशक्ती चौक निगडी ते चाकण मेट्रो मार्ग आता प्रत्यक्षात वेगाने आकार घेण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की, भोसरी- दिघी परिसरात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात विजेचा बट्ट्याबोळ सुरू असताना, ताथवड्यातील रघुनंदन मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या महावितरणच्या ताथवडे शाखेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे वीजपुरवठा देताना सर्विस वायर महावितरणच्या पोलवर न देता महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवरून पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या पोल शेजारील घरांना आणि नागरिकांना जीवघेणा वीज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या आधीही दोन वेळा अशा प्रकारे पोलवर करंट उतरल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे महानगरपालिकेने त्या पोलवरील लाईट काढून टाकली आहेत. पोल पूर्णपणे काढून टाकण्यासाठी महावितरणला अनेक वेळा सांगण्यात आले, मात्र त्यांनी त्यांच्या वायर न काढल्यामुळे पोल अजूनही तसाच धोकादायक स्थितीत उभा आहे. या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्ग आता प्रत्यक्षात वेगाने आकार घेण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर करण्यात आला असून, फुगेवाडी येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा झाली. या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परंतु या चर्चेत आमदार शंकर जगताप यांनी घेतलेली ठाम भूमिका व सक्रिय सहभाग विशेषतः ठळकपणे जाणवला. शंकर जगताप यांचा पुढाकार शहराच्या सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा व वाहतुकीवरील वाढत्या ताणाचा विचार करता…
शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांच्या तिसऱ्या गणपती आरती संग्रहाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या तिसऱ्या गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. ३१) मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी उपनेत्या सुलभा उबाळे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील हगवणे, उपशहरप्रमुख दिलीप पांढरकर, पुणे जिल्हा रेल्वे समिती सदस्य तथा पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुदर्शन देसले, विशाल राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सौंदणकर यांचा हा तिसरा आरती संग्रह असून याआधी प्रकाशित झालेल्या संग्रहांना गणेशभक्तांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. खासदार…
