Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- श्री गणपती विसर्जनाच्या ७ व्या, ९ व्या, १० व्या व अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रमुख चौकातील बंदोबस्तासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे ११० विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) पोलीस प्रशासनास सहकार्य करणार आहेत. या संदर्भात निगडी वाहतूक विभागात झालेल्या आढावा बैठकीस पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर आणि समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. गणेश तलाव, चिखली घाट, वाल्हेकरवाडी नदी घाट तसेच विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख चौकांमध्ये एसपीओंची नियुक्ती होणार आहे. निरीक्षक पाचोरकर यांनी विसर्जनावेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मदतीचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. पाटील यांनी सांगितले की, यंदा शहरात २२०० हून अधिक सार्वजनिक मंडळे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडमधील प्रतिष्ठित श्रीहनुमान मित्र मंडळ यंदा आपल्या चाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने समाजप्रबोधनपर कार्यक्रम आणि जिवंत देखावे यावर विशेष भर दिला आहे.गणेशोत्सवाच्या कालावधीत २७ ऑगस्टपासून ते ५ सप्टेंबरपर्यंत विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “बेटी बचाव बेटी पढाव”, “कुटुंब एकता”, “पाणी वाचवा देश वाचवा”, “वृद्धाश्रम”, “श्रीगणेश इच्छाशक्ती रात्री” अशा समाजजागृती करणाऱ्या विषयांवर विशेष प्रबोधनपर देखावे साकारले जात आहेत. तसेच लोककला, लोकनाट्याद्वारेही समाजमनावर ठसा उमटविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश आगमन सोहळ्याने झाली असून, समारोप ५ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. याचबरोबर सत्यनारायण महापूजन व दुग्धाभिषेक यांसारखे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मोरवाडी येथे पहिल्याच दिवशी  पुष्पवृष्टी करून  विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आयटीआयचे प्रशिक्षण सत्र २०२५ -२६ नव्याने सुरू झाले असून दिनांक २ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये उपस्थित राहण्याचा पहिलाच दिवस होता. प्रवेशित झालेले सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले व भेटवस्तू देण्यात आली. शशिकांत पाटील प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित राहिलेल्या पालकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे महत्त्व सांगितले.  आयटीआय संस्था,  केंद्र शासन, कौशल विकास व उद्योजकता मंत्रालय, डीजीटी यांच्या अखत्यारीत संपूर्ण कामकाज चालत असल्याबाबत माहिती दिली…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळावा या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे मंडळाचे मुख्य अभियंता  सुनील काकडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२३-२४ व २०२४-२५ मधील डीपीडीसी निधीतून मंजूर कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. यावेळी दुर्गम भागातील वीज समस्या दूर करण्याचा निर्धार करण्यात आला. राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश आमदार शेळके यांनी दिले. “आंदर मावळाला सतत भेडसावणारा वीजेचा लपंडाव आता संपायला हवा,” असे सांगत त्यांनी नव्याने…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद संस्थान लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर असे उद्गार काढले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत एकत्रीत केलेल्या गणेश मूर्तीचें मोशी खाण येथील विसर्जन ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. गणेश विसर्जन काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता अनिल भालसाखळे,उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार,निलेश भदाणे,संदीप खोत, सिताराम बहुरे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी निवेदीता घार्गे,अश्विनी गायकवाड,तानाजी नरळे,किशोर…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेत यासंबंधी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंद्रायणी आणि पवना नदी पुन्हा स्वच्छ, निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. नदी पात्रात थेट येणारे सांडपाणी रोखण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी, नाल्यांमधून नदीकडे जाणाऱ्या दूषित पाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी यासह इतर दूषित पाण्यासाठी सांडपाणी प्रकल्प केंद्राच्या (STP) उभारणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आकुर्डी डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे ३ व ४ सप्टेंबर २०२५ रोजी “IEEE International Conference on Electronics, Computing and Communication Networking Automation Technologies 2025” (IEEE ICEC2NT 2025) ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. ही परिषद IEEE EDS Society च्या सहप्रायोजकत्वाने आणि IEEE पुणे सेक्शन च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमध्ये भारतासह अमेरिका, थायलंड आदी देशांतील मान्यवर तज्ञ, प्राध्यापक व संशोधक सहभागी होणार असून इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, नेटवर्किंग व ऑटोमेशन या क्षेत्रांतील नविन संशोधन व तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास पद्मश्री डॉ. प्रह्लाद रामराव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड मध्ये करण्यात आली. या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित जिल्हास्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धा पिंपरीत उत्साहात पार पडली. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवरील सजावटींनी सहभागी महिलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आयोजक आणि परिक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत पूनम सागर गाढवे यांच्या ‘नारी शक्ती’ या देखाव्याने प्रथम क्रमांक मिळवला. समाजात विविध क्षेत्रांत प्रेरणा देणाऱ्या महिलांचे दर्शन घडवणारा हा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. सुरेखा दीपक कोकणे यांच्या ‘जागरण गोंधळ’ या पारंपरिक देखाव्याने दुसरा, तर सपना सदानंद कांबळे यांच्या ‘नवनाथ जन्म कथा’ या धार्मिक देखाव्याने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण मृणालिनी मोरे आणि विनीता तिवारी यांनी केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव…

Read More