- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘स्वराष्ट्र घडविणे हा आपला स्वभाव झाला पाहिजे; तरच प्रत्येक छोट्यामोठ्या कृतीतून राष्ट्र उभारणीचे कार्य आपल्या हातून घडेल!’ असे विचार ज्येष्ठ समुपदेशिका प्रा. मैत्रेयी शिरोळकर यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित कार्यक्रमात समिती संचलित विविध शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन करताना ‘स्वबोध आणि चिंतन’ या विषयावर प्रा. मैत्रेयी शिरोळकर बोलत होत्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, समिती सदस्य सुहास पोफळे, शाहीर आसराम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. मैत्रेयी शिरोळकर पुढे म्हणाल्या की, ‘महाविद्यालयात असताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला.…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. पण या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. ‘दगडूशेठ’ गणपतीच्या चरणी भक्तीभावाने अर्पण केलेले फुले, हार, नारळ हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत आहे. मागीस नऊ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे युवा या निर्माल्याला नवा अर्थ देत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३३ व्या वर्षी गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे. त्यामध्ये जमा होणारे निर्माल्य डीपी रस्त्यावरील जोशी किचन जवळ उभारलेल्या ‘निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पा’त नेण्यात येते. तेथे निर्माल्याची पावडर करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते आणि ते खत विनामूल्य अन्नदाता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या कृष्णा नगर चौकातील वृत्तपत्र विक्रेते मिलिंद दाभोळकर यांनी वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत बुधवारी दिनांक (3 )25 वे रक्तदान केले आहे. या माध्यमातून त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक भान जपले. दाभोळकर यांनी 1998 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे पहिल्यांदा रक्तदान करून अपघातग्रस्त महिलेला जीवदान मिळवून दिले होते.त्यानंतर वेळोवेळी गरजू रुग्णांना रक्तदान केले. बुधवारी वाय सी एम रुग्णालयातील व्यक्तीकडे रक्तदान केले डॉक्टर नीता पाडगे डॉक्टर गणेश लांडे डॉक्टर जयंत जाधव परिचारिका चव्हाण,पोपट आ रणे,आम्रपाली गायकवाड सुनील आवटे आदी उपस्थित होते. वाढदिवसाच्यानिमित्त तरी जीव वाचावा या येथून रक्तदान केल्याचे दाभोळकर यांनी सांगितले. त्यांच्या…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या नावातच मंदिर आहे आणि तुम्ही सगळे शिक्षक त्यातील देव आहात. शिक्षकांचा सन्मान करण्याचा मान मिळणे, हे माझे भाग्य आहे. मी जे घडलोय, जे आयुष्य जगतोय त्यामागे आई वडिलांसोबतच शिक्षकांचा मोठा हातभार आहे, असे प्रतिपादन अभिनेते भूषण प्रधान यांनी केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. अभिनेते भूषण प्रधान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, संचालक संदीप काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, उपप्राचार्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जन सुरळीत, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे, यासाठी सज्ज झाली आहे. विसर्जन काळात नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण, आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, सुरक्षा असे महापालिकेचे विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत. शहरातील २७ अधिकृत विसर्जन घाटांवर प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची सोय करण्यात आली आहे. मोशी खाण हे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून २३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा पैलू आहे. महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शाळा अतिशय उत्तम कार्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आजचा (दि.०५) पिंपरी-चिंचवडमधील नियोजित दौरा अचानकपणे रद्द करण्यात आला. अजित पवार आज शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देणार होते त्याचबरोबर दर्शनाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. मात्र पावणे दोन वाजता अचानकपणे मुंबईला रवाना झाले. शहरातील जवळपास चाळीस मंडळांना भेटी देऊन दर्शन घेणार होते. मात्र दौरा रद्द झाल्यानं समर्थकांचा हिरमोड झाला. शहरातील अनेक प्रमुख मंडळांनी अजित पवारांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. सजावट, मंडप उभारणी, बॅनर्स-होर्डिंग्ज, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, अजित पवार आपल्या मंडळाला भेट देणार यामुळे वातावरण गजबजले होते. मात्र, दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांनाही…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा होते. यावेळी व्यासपीठावरती शिक्षण तज्ञ धनंजय कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया , संस्थेच्या खजिनदार डॉ .भूपाली शहा, संचालिका डॉ तेजल शहा, प्राचार्या डॉ . क्षितिजा गांधी, डॉ .पौर्णिमा कदम, डॉ. वनिता कुऱ्हाडे, वृंन्दा जोशी, एमबीएचे संचालक डॉ सचिन बोरगावे , आदी उपस्थित होते. डॉ शैलेश गुजर, डॉ . दीपक शहा , डॉ भूपाली शहा यांच्या हस्ते नुकतेच पीएचडी मिळविलेले डॉ रोहित आकोलकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य सरकारने कारखाने अधिनियम १९४८ मधील तरतुदीमध्ये दुरुस्ती करत ज्या कारखान्यात २० पेक्षा अधिक असणाऱ्या कामगारांसाठी आता दिवसाला ८ तासाच्या ऐवजी 12 तास कामाची मर्यादा करण्यात आलेली आहे. किरकोळ आस्थापनामध्ये ९ तासावरून १० तास करण्याचा निर्णय घेण्यात आला, याला कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथील बैठकीत कामगाराने विरोध केला असून हा निर्णय भांडवलधार्जिना असून सरकार स्पष्ट कारखानदारांना भांडवलदारांना कामगारांच्या पिळवणुकीचा अधिकृत परवाना देत आहे का अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महादेव गायकवाड, अनिल कदम, दिलीप डिकोळे, वंदना कदम, राजश्री जोगदंड, अंजना मोरे, विद्या भोसले आदीसह…
कृष्णानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या कृष्णानगर शाखेतील दोन ते सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचा अद्वितीय आविष्कार घडवत, टाकाऊ वस्तूंपासून सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती साकारली. शिक्षणासोबतच सर्जनशीलतेचा संगम साधत या लहानग्यांनी झाडू, रबर, काठ्या, बाहुल्या, कापूस, थर्माकोल यांसारख्या घरगुती फुकट आणि खराब झालेल्या वस्तूंमधून गणरायाची मनमोहक मूर्ती साकारली आहे. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या परिसरात करण्यात आले होते, जिथे स्थानिक नागरिक आणि पालकांसाठी हा उपक्रम खुले ठेवण्यात आला होता. गणपती बाप्पाच्या या आगळ्यावेगळ्या दर्शनाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला आणि मुलांच्या कल्पकतेचं भरभरून कौतुक केलं. या प्रसंगी कृष्णानगर ब्रांचचे चेअरमन कीर्ती मारुती जाधव, तसेच शिक्षक व शिक्षकेतर…
